फ्रेंच ओपन स्पर्धेतून नाओमी ओसाकाची माघार, मानसिक आरोग्याचे दिले कारण

जगातील अव्वल क्रमाकांची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाला फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीनंतर माध्यमांशी न बोलल्याने 10 लाखांचा दंड ठोठावण्यात आला होता.

फ्रेंच ओपन स्पर्धेतून नाओमी ओसाकाची माघार, मानसिक आरोग्याचे दिले कारण
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 5:02 PM

पॅरीस : जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाका जगातील अव्वल टेनिसपटूंमध्ये येते. नुकतेच तिने अमेरिकन ओपन 2020 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2021 या दोन्ही स्पर्धेत विजय मिळवत जेतेपदावर नाव कोरलं. दरम्यान सद्या सुरु असलेल्या फ्रेंच ओपनमधून पहिल्या फेरीत विजय मिळवल्यानंतर नाओमीने तडकाफडकी माघार घेतली आहे. नुकतंच तिला 15 हजार डॉलर्स अर्थात 10 लाख भारतीय रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता. पहिल्या फेरीतील सामन्यानंतर माध्यमांशी बोलणे टाळल्याने हा दंड ठोठावला असून आता नाओमीने त्याच घटनेनंतर मानसिक आरोग्याचा मुद्दा देत माघार घेतली आहे. (Japan Tennis Player Naomi Osaka withdraws herself from French Open Tennis Tournament)

नेमकं काय म्हटली नाओमी?

स्पर्धेतून माघार घेत नाओमीने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली. ज्यात तिने लिहिलय. ”मी काही दिवसापूर्वी माध्यमांशी बोलणार नसल्याचं सांगितलं होत तेव्हा अशी परिस्थिती येईल असं मला वाटलं नव्हतं. स्पर्धा सुरुळीत चालावी आणि इतर खेळाडूंचे लक्ष विचलित होऊ नये म्हणून मी स्पर्धेतून माघार घेत आहे. मी जास्त बोलकी नसल्याने प्रसारमाध्यमांशी बोलल्याने मला मानसिक ताण येतो. ज्याचा परिणाम माझ्या खेळावर होतो. म्हणूनच मी माध्यमांशी बोलणे टाळत होते. पण माझा संदेश योग्यरित्या पोहोचला नाही. त्यामुळे अशी परिस्थिती आली. माझ्यासाठी मानसिक आरोग्यही तितकच महत्त्वाचं असल्याने मी माघार घेत आहे लवकरच परत भेटू.” नाओमीने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने पॅरिसमधील पत्रकारांची माफी मागितली. ‘मी एक बोलकी व्यक्ती नसल्याने मला माध्यमांशी बोलणे जड जात होते. त्यामुळे माझ्या निर्णयामुळे मी ज्या पत्रकारांना दुखावलं त्यांची मी माफी मागते.’ असं लिहिलं आहे.

फ्रेंच टेनिस फेडरेशनने मागितली माफी

फ्रेंच टेनिस फेडरेशनचे अध्यक्ष गिलेस मोरेटन यांनी नाओमीच्या स्पर्धेतून माघार घेण्यावर प्रतिक्रिया दिली. नाओमीच्या या निर्णयाचा आम्हाला त्रास झाला असून आम्ही याबद्दल माफी मागतो असं मोरेटन यांनी म्हटलं आहे.

नाओमीचे वार्षिक उत्पन्न कोटींत

टेनिसपटू नाओमी ओसाका सध्या जगात अव्वल क्रमाकांवर आहे्. तिने नुकतीच एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ओसाकाने केवळ 12 महिन्यांत 50 मिलीयन डॉलर अर्थात 402 कोटी कमावत इतिहास रचला आहे. कोणत्याही महिला खेळाडूकडून करण्यात आलेली ही सर्वाधिक कमाई आहे. नुकतीच पार पडलेल्या अमेरिकन ओपन 2020 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2021 या दोन्ही स्पर्धेत नाओमीने विजय मिळवत जेतेपदावर आपलं नाव कोरलं. याशिवाय टेनिस विश्वातील मानाचा चषक असणारे 4 ग्रँडस्लॅम ही नाओमीन मिळवले आहेत. दरम्यान लागोपाठ दोन मोठ्या स्पर्धांमध्ये नाओमीनं विजय मिळवल्याने अनेक बड्या कंपन्यांनी तिच्याशी करार करण्याची इच्छा दर्शवली. नाओमीने बऱ्याच कंपन्यांसोबत करार केला असून यात नाईकी (Nike), सिटीझन वॉच (Citizen Watch), निस्सान ( Nissan) या कंपन्याचाही समावेश आहे. या करारांमधूनच नाओमीने 12 महिन्यांत तिनं 402 कोटींची कमाई केली.

हे ही वाचा :

सामन्यात विजय मिळवूनही 10 लाखांचा दंड, महिला खेळाडूला एक चूक पडली महागात!

Photo : अवघ्या 12 महिन्यांत 402 कोटी खिशात, जपानच्या महिला टेनिसपटूची तुफान कमाई!

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

(Japan Tennis Player Naomi Osaka withdraws herself from French Open Tennis Tournament)

Non Stop LIVE Update
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे
चाललय काय? दत्ता भरणेंनी शिवीगाळ केलेल्या कार्यकर्त्याच्या भेटीला सुळे.
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त
मतदान करायला गेले पण ईव्हीएममध्ये कमळाचं चिन्ह नसल्यानं आजोबा संतप्त.
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ
दत्तात्रय भरणे यांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल, पाहा व्हिडीओ.
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'
'सुनेत्रा पवार यांची दया येते, अजित पवारांनी त्यांचा बळीचा बकरा केला'.
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?
मतदान केलं अन् सुप्रिया सुळे तडकाफडकी अजित पवारांच्या घरी, कारण काय?.
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल
उमेदवारी न दिल्याने नाराजी? उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत नॉटरिचेबल.
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ...
कुटुंबियांची साथ नाही? दादांचं विरोधकांना उत्तर; म्हणाले, मेरी माँ....
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बजावला मतदानाचा हक्क, कुठं केलं मतदान?.
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा
महाराष्ट्रात 3 ऱ्या टप्प्यातील मतदान, राज्यात या 11 हायव्होल्टेज जागा.
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत
भावूक, भावकीनंतर मडकं अन् मिमिक्रीमुळे बारामतीच्या प्रचार सभा चर्चेत.