सामन्यात विजय मिळवूनही 10 लाखांचा दंड, महिला खेळाडूला एक चूक पडली महागात!

ही महिला खेळाडू जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाका आहे. ती सध्या फ्रेंच ओपन स्पर्धा खेळत आहे.

सामन्यात विजय मिळवूनही 10 लाखांचा दंड, महिला खेळाडूला एक चूक पडली महागात!
नाओमी ओसाका

पॅरिस : जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाका सध्या जगातील अव्वल क्रमाकांची महिला टेनिसपटू म्हणून ओळखली जाते. सध्या ती फ्रेंच ओपन स्पर्धा खेळत आहे. पहिल्याच सामन्यात तिने अप्रतिम विजय मिळवला. मात्र विजयानंतर केलेल्या एका चूकीमुळे तिला तब्बल 15 हजार डॉलर्स म्हणजेच 10 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. तसंच चूक पुन्हा केल्यास स्पर्धेतून बाद करण्यात येईल असंही सांगण्यात आलं आहे. नाओमी सध्या टेनिस विश्वातील एक महत्त्वाची स्पर्धा असणारी फ्रेंच ओपन खेळत आहे. स्पर्धेतील प्रत्येक सामन्यानंतर खेळाडूला माध्यमांशी बोलून सामन्याबाबतच्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतात. दरम्यान पहिल्या फेरीत विजयानंतर ओसाकाने माध्यमांशी बोलणे टाळले. त्यामुळे तिने नियमांचा भंग केल्याने तिला 15 हजार डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला आहे. (Japan Tennis Player Naomi Osaka fined for not Talking to Media at French Open Tournament)

फ्रेंच ओपनच्या पहिल्या फेरीत नाओमीने शानदार सुरुवात केली. तिने रोमानियाच्या पेट्रिशिया मारिया टिगचा पराभव करून दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. ओसाका आणि पेट्रिशिा यांच्यातील हा सामना अत्यंत चूरशीचा झाला. तब्बल १ तास ४७ मिनिटे चाललेल्या सामन्यात नाओमीने पहिल्या फेरीत ६-४ आणि दुसऱ्यात फेरीत ७-६ च्या फरकाने विजय मिळवत दुसरी फेरी गाठली.

काय आहे नियम?

कोणत्याही सामन्यानंतर तिथे उपस्थित माध्यमांशी बोलणे, संवाद साधणे प्रत्येक खेळाडूला अनिवार्य असते. पत्रकार परिषदेत हा संवाद साधायचा असतो. दरम्यान स्पर्धेच्या नियमांनुसार जर खेळाडू माध्यमांशी बोलण्यास नकार देत असेल तर त्याला 15 ते 20 हजार डॉलर्सपर्यंत दंड ठोठावला जाऊ शकतो.

ओसाकाचे वार्षिक उत्पन्न कोटींत

टेनिसपटू नाओमी ओसाका सध्या जगात अव्वल क्रमाकांवर आहे्. तिने नुकतीच एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ओसाकाने केवळ 12 महिन्यांत 50 मिलीयन डॉलर अर्थात 402 कोटी कमावत इतिहास रचला आहे. कोणत्याही महिला खेळाडूकडून करण्यात आलेली ही सर्वाधिक कमाई आहे. नुकतीच पार पडलेल्या अमेरिकन ओपन 2020 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2021 या दोन्ही स्पर्धेत नाओमीने विजय मिळवत जेतेपदावर आपलं नाव कोरलं. याशिवाय टेनिस विश्वातील मानाचा चषक असणारे 4 ग्रँडस्लॅम ही नाओमीन मिळवले आहेत. दरम्यान लागोपाठ दोन मोठ्या स्पर्धांमध्ये नाओमीनं विजय मिळवल्याने अनेक बड्या कंपन्यांनी तिच्याशी करार करण्याची इच्छा दर्शवली. नाओमीने बऱ्याच कंपन्यांसोबत करार केला असून यात नाईकी (Nike), सिटीझन वॉच (Citizen Watch), निस्सान ( Nissan) या कंपन्याचाही समावेश आहे. या करारांमधूनच नाओमीने 12 महिन्यांत तिनं 402 कोटींची कमाई केली.

हे ही वाचा :

Photo : अवघ्या 12 महिन्यांत 402 कोटी खिशात, जपानच्या महिला टेनिसपटूची तुफान कमाई!

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

ऑस्ट्रेलियन दिग्गज मायदेशी परतताच गर्लफ्रेंडकडून गोड बातमी, म्हणते ‘कुणी तरी येणार येणार गं…!’

(Japan Tennis Player Naomi Osaka fined for not Talking to Media at French Open Tournament)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI