Video : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला आलं रडू! मुंबई इंडियन्स संघात नेमकं काय चाललंय?

आयपीएल 2024 स्पर्धेतील 55 सामने पार पडले आहेत. मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना पार पडला. हा सामना मुंबई इंडियन्सने जिंकला. मात्र या सामन्यात रोहित शर्माच्या एक कृतीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर चर्चांना उधाण आलं आहे.

Video : हैदराबादविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माला आलं रडू! मुंबई इंडियन्स संघात नेमकं काय चाललंय?
Image Credit source: video grab
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 2:36 PM

आयपीएल 2024 स्पर्धेत मुंबई इंडियन्सचं प्लेऑफमधील स्थान संपुष्टात आलं आहे. मात्र असं असलं तरी पुढील प्रत्येक सामना आत्मसन्मानासाठी लढला जाईल हा पवित्रा आहे. आता मुंबई इंडियन्सला साखळी फेरीत फक्त दोन सामने खेळायचे आहे. आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यापैकी 4 सामन्यात विजय आणि 8 सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. सलग पराभव होत असताना सनरायझर्स हैदराबादला हरवण्यात मुंबईला यश आलं आहे. मुंबईने हैदराबादला 7 गडी राखून पराभूत केलं आहे. सूर्यकुमार यादवच्या शतकी खेळीच्या जोरावर मुंबईने 17.2 षटकात 174 धावांचं आव्हान गाठलं. मात्र असं असताना माजी कर्णधार रोहित शर्मा मात्र उदास असल्याचं दिसून आलं. ड्रेसिंग रुममध्ये त्याच्या रडतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रोहित शर्मा हैदराबादविरुद्धच्या सामन्यात वानखेडे मैदानावर पुन्हा एकदा अपयशी ठरला. पाच चेंडूंचा सामना केला आणि एक चौकार मारत पॅट कमिन्सच्या गोलंदाजीवर क्लासेनला झेल देऊन बाद झाला.

टी20 वर्ल्डकप जवळ असताना रोहित शर्माच्या फॉर्मची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. आयपीएलमध्ये सुरुवातीला चांगली कामगिरी करणाऱ्या रोहित शर्माची गाडी रुळावरून घसरल्याचं दिसत आहे. रोहित शर्माने पहिल्या सात सामन्यात 297 धावा केल्या होत्या. यात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध 49, चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध नाबाद 105 या खेळींचा समावेश आहे. मात्र पुढच्या पाच सामन्यात एकून 34 धावाच केल्या. राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स, लखनौ सुपर जायंट्स, कोलकाता नाईट रायडर्सनंतर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध फेल झाला. या पाच सामन्यात त्याचा सर्वोत्तम स्कोअर हा 11 आहे. त्यामुळे हाच संदर्भ पकडून रोहित शर्माला ड्रेसिंग रुममध्ये अश्रू अनावर झाले असावे असं चाहत्यांचं म्हणणं आहे.

रोहित शर्माला वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत असेच अश्रू अनावर झाले होते. पॅट कमिन्सच्या नेतृत्वातील ऑस्ट्रेलिया संघाने पराभवाचं पाणी पाजलं होतं. त्यामुळे जेतेपदाचं स्वप्न भंग झालं होतं. त्यामुळे नेटकरी हा संदर्भही जोडत असून कमेंट्स करत आहेत. दुसरीकडे, रोहित शर्माला आपल्या फलंदाजीची ताकद दाखवण्यासाठी आणखी दोन संधी आहेत. उर्वरित दोन सामन्यात चांगली फलंदाजी केली तर नक्कीच वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी बुस्टर मिळेल.

Non Stop LIVE Update
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल
गुन्हेगारांचं सोशल मीडियावर उदात्तीकरण, गजा मारणेचा तो व्हिडीओ व्हायरल.
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य
शिंदेंना मुख्यमंत्री करण्यास हरकत नव्हती, पण... पवारांचं मोठं वक्तव्य.
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ
पण मी गमछा उडवते, पंकजा मुंडेंकडून उदयनराजेंची नक्कल, बघा व्हिडीओ.
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या...
राऊतांनी ठाकरेंना धमकी दिल्याचा राणेंचा गौप्यस्फोट, तर मातोश्रीच्या....
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.