WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना तसंच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उद्या म्हणजेच 2 जून रोजी इंग्लंडसाठी टेकऑफ करेल. (India vs New Zealand World test Championship Final 2021)

WTC Final : भारत विरुद्ध न्यूझीलंड मॅचमध्ये कोण वरचढ ठरणार?, ब्रँडन मॅक्यूलमचा मोठा दावा
WTC Final 2021

मुंबई : भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (WTC Final 2021) होणार आहे. येत्या 18 जून ते 23 जूनदरम्यान इंग्लंडमधील साऊथहॅम्प्टनमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी न्यूझीलंडचा संघ इंग्लंडमध्ये दाखल झाला आहे. तर भारतीय संघ उद्या म्हणजेच 2 जून रोजी इंग्लंडसाठी टेकऑफ करेल. जगभरातील क्रिकेट रसिक प्रेक्षकांना या सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे. तशी उत्सुकता खेळाडूंना देखील लागून राहिली आहे. याच सामन्याविषयी न्यूझीलंडचा माजी खेळाडूब्रँडन मॅक्यूलमने (Brendon mcCullum) मोठा दावा केलाय. (Brendon mcCullum India vs New Zealand World test Championship Final 2021)

कोण वरचढ ठरणार?

न्यूझीलंडचा सामना विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाशी होतोय. 18 जूनपासून या रंगतदार सामन्याला साऊथॅम्प्टन येथे सुरुवात होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना अतिषय चुरशीचा होईल. अशा परिस्थितीत इंग्लंडमधील वातावरण पाहता किवींचा संघ जरा उजवा ठरेल किंबहुना या सामन्यात न्यूझीलंडचं पारडं जड असेल, असं मत माजी किवी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलमने व्यक्त केलंय.

इंग्लडच्या वातावरणाचा न्यूझीलंडला फायदा

“वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळण्याअगोदर न्यूझीलंडला इंग्लंडबरोबर दोन कसोटी मालिका खेळायच्या आहेत. तेथील परिस्थितीशी एकरुप होण्यासाठी या सामन्यांची न्यूझीलंड संघाला मोठा फायदा होईल. तसंच गेल्या अनेक दिवसांपासून येथील परिस्थितीचा, विविध खेळाडूंच्या तंत्राचा आम्ही अभ्यास करत आहोत. याचाही आम्हाला फायदा होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना इतका चुरशीचा असेल की 60-40 होईल… म्हणजेच दोन्हीही संघ तितकेच तुल्यबळ आहेत. भारताचा मी सन्मान करतो. त्यांच्याकडे शेवटपर्यंत लढण्याची भावना आहे…”, असं मॅक्यूलम म्हणाला.

“एवढं मात्र नक्की की एखाद्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासारखा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना रंगेल. दोन्ही संघ उत्कृष्ठ खेळ दाखवतील. यातील सर्वोत्तम खेळ दाखवणारा संघ जिंकेल”, असं सरतेशेवटी ब्रँडन मॅक्यूलम म्हणाला.

भारताचं 2 जूनला टेकऑफ

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल सामना तसंच इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी विराटच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ उद्या म्हणजेच 2 जून रोजी इंग्लंडसाठी टेकऑफ करेल. सध्या भारतीय संघाचे सगळे खेळाडू मुंबईत क्वारन्टाईन आहेत. सगळ्या खेळाडूंना अंतिम सामन्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

(Brendon mcCullum India vs New Zealand World test Championship Final 2021)

हे ही वाचा :

ऑस्ट्रेलियन दिग्गज मायदेशी परतताच गर्लफ्रेंडकडून गोड बातमी, म्हणते ‘कुणी तरी येणार येणार गं…!’

IPL 2021: परदेशी खेळाडूंना खेळवण्यासाठी BCCI ची धडपड, ‘या’ खास रणनीतीचा वापर

WTC Final : ‘या’ खेळाडूची अनुपस्थिती भारतासाठी मोठा तोटा, माजी बीसीसीआय सिलेक्टरची प्रतिक्रिया

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI