Photo : अवघ्या 12 महिन्यांत 402 कोटी खिशात, जपानच्या महिला टेनिसपटूची तुफान कमाई!

जपानच्या महिला टेनिसपटूने केलेली ही कोट्यावधींची कमाई आतापर्यंत कोणत्याही महिला खेळाडूने केलेली सर्वांत मोठी कमाई आहे.

1/4
naomi osaka
जपानची महिला टेनिसपटू नाओमी ओसाकाने नुकतीच एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. तिने अवघ्या 12 महिन्यांत 50 मिलीयन डॉलर अर्थात 402 कोटी कमावत इतिहास रचला आहे. कोणत्याही महिला खेळाडूकडून करण्यात आलेली ही सर्वाधिक कमाई आहे.
2/4
naomi osakas
नुकतीच पार पडलेल्या अमेरिकन ओपन 2020 आणि ऑस्ट्रेलियन ओपन 2021 या दोन्ही स्पर्धेत नाओमीने विजय मिळवत जेतेपदावर आपलं नाव कोरलं. याशिवाय टेनिस विश्वातील मानाचा चषक असणारे 4 ग्रँडस्लॅम ही नाओमीन मिळवले आहेत.
3/4
naomi-compressed
दरम्यान लागोपाठ दोन मोठ्या स्पर्धांमध्ये नाओमीनं विजय मिळवल्याने अनेक बड्या कंपन्यांनी तिच्याशी करार करण्याची इच्छा दर्शवली. नाओमीने बऱ्याच कंपन्यांसोबत करार केला असून यात नाईकी (Nike), सिटीझन वॉच (Citizen Watch), निस्सान ( Nissan) या कंपन्याचाही समावेश आहे. या करारांमधूनच नाओमीने 12 महिन्यांत तिनं 402 कोटींची कमाई केली.
4/4
naomi o
नाओमी ओसाका