विराट कोहलीने KLराहुलला लग्नात दिलेलं गिफ्ट काय? एम एस धोनीचाही हात मोठाच म्हणाल….

के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा शाही विवाहसोहळ्यात फक्त 100 च्या आसपास पाहुण्यांना बोलावण्यात आलं होतं.

विराट कोहलीने KLराहुलला लग्नात दिलेलं गिफ्ट काय? एम एस धोनीचाही हात मोठाच म्हणाल....
Image Credit source: social media
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 5:24 PM

नवी दिल्लीः टीम इंडियाचे स्टार ओपनर केएल राहुल (K L Rahul) याचं नुकतंच लग्न झालं. सोशल मीडियावर (Social Media) या लग्नाची जोरदार चर्चा आहे. बॉलीवूड अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्यासोबत के एल राहुलने (K L Rahul) लग्नगाठ बांधली. या शाही सोहळ्याचे छायाचित्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. के एल राहुलने या लग्नासाठी क्रिकेटमधून थोडासा ब्रेक घेतला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरीजमध्ये के एल राहुल पुन्हा एकदा मैदानावर उतरणार आहे.

या लग्नानिमित्त के एल राहुलच्या मित्रांकडून डोळे दिपवणारे गिफ्ट मिळाले आहेत. यात कोट्यवधी रुपये किंमतीची कारदेखील आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, विराट कोहलीने के एल राहुलला एक BMW कार गिफ्ट दिली आहे.

माध्यमांतील दाव्यानुसार, के एल राहुलला विराट कोहलीने जी BMW कार गिफ्ट दिली आहे. तिची किंमत २.१७ कोटी रुपये एवढी सांगण्यात येतेय. तर महेंद्र सिंग धोनीनेही के एल राहुलला एक बाइक गिफ्ट केली आहे.

एम एस धोनीने दिलेल्या बाईकची किंमत जवळपास ८० लाख रुपये असल्याचं सांगण्यात येतंय. महेंद्र सिंग धोनीला बाइकचं खूप आकर्षण आहे. त्यामुळे मित्र के एल राहुलच्या लग्नात त्याने Kawasaki Ninja बाइक गिफ्ट दिली आहे.

के एल राहुलने सध्या लग्नासाठी क्रिकेट स्पर्धांमधून ब्रेक घेतला आहे. न्यूझीलंडविरोधात वन डे आणि टी-२० सीरीजमध्ये त्याने सहभाग घेतला नाही.

के एल राहुल आणि अथिया शेट्टी यांचा शाही विवाहसोहळ्यात फक्त 100 च्या आसपास पाहुण्यांना बोलावण्यात आलं होतं.

यात काही प्रमुख क्रिकेट पटूंचा समावेश होता. महेंद्र सिंह धोनी, वरुण एरॉन, ईशांत शर्मा आदींचा समावेश होता. आयपीएलनंतर के एल राहुल एक जंगी रिसेप्शन देणार असल्याचं सांगण्यात येतंय. यात सगळ्याच क्रिकेटर्सचा आमंत्रण देण्यात येणार आहे. सध्या तरी इतर खेळाडूंनी के एल राहुल आणि अथिया शेट्टीच्या जोडीला सोशल मीडियाद्वारेच शुभेच्छा दिल्या आहेत.

Non Stop LIVE Update
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार
बच्चू कडूचा राजकारणात कोणी बाप नाही, बच्चू कडू यांचा जोरदार प्रहार.
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास
मविआ 48 जागा लढणार आणि त्या जिंकणार, संजय राऊत यांचा आत्मविश्वास.
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?
काँग्रेसच्या 5 जागी मैत्रीपूर्ण लढती ? कोणत्या जागांवर काँग्रेस ठाम?.
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?
आगे आगे देखो..., अंबादास दानवे यांचा उल्लेख करत काय केलं सूचक वक्तव्य?.
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप
संजय राऊत आघाडीत बिघाडी करीत आहेत, प्रकाश आंबेडकर यांचा थेट आरोप.
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले
प्रकाश आंबेडकर यांची मोठी रणनिती, नव्या आघाडीबद्दल दिले संकेत; म्हणाले.
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?
उदयनराजे यांच्या विरोधात पवार कोणाला देणार तिकीट ? काय म्हणाले पवार ?.
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?
वसंत मोरे वंचितच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढणार?.
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?
'अजित पवार गट फ्रॉड 420 गँग, फार काळ सत्तेत...', कुणाची खोचक टीका?.
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार
आता नाही तर कधी ? हातकणंगलेतून लढण्याचा राहुल आवाडे यांचा निर्धार.