
भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मॉर्डन डे हेड कोचच्या मुद्यावरून डिबेट सुरु केली आहे. पारंपारिक दृष्टीने गौतम गंभीर कोच बनू शकत नाही. त्यापेक्षा त्यांना टीम मॅनेजर म्हणणं चुकीच ठरणार नाही असं कपिल देव यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये 0-2 ने पराभव झाल्यामुळे गौतम गंभीर यांच्यावर दबाव वाढला आहे. त्यावेळी कपिल देव यांनी ही कमेंट केली आहे. कोच म्हणून गौतम गंभीर यांच्या पद्धती, खेळाडूंची अदला-बदली आणि पार्ट टाइम खेळाडूंवरील अवलंबित्व या रणनितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मॉर्डन क्रिकेटमध्ये कोचिंगचा अर्थ कसा बदलत चाललाय, त्यावर कपिल देव यांनी डिबेट सुरु केली आहे.
कपिल देव इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये बोलत होते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पारंपारिक कोचिंगची आवश्यकता नाही हा मुद्दा कपिल देव यांनी मांडला. “सध्या कोच हा शब्द खूप कॉमन झालाय. गौतम गंभीर कोच असू शकत नाहीत, त्यांना आपण मॅनेजर म्हणू शकतो” असं कपिलदेव म्हणाले. तळागाळातील कोचिंग आणि एलिट लेव्हल मॅनेजमेंट यातला फरक त्यांनी समजावून सांगितला. कपिल देव म्हणाले की, “तुम्ही कोच म्हणता, तर कोच म्हणजे जिथे शाळेत, कॉलेजमध्ये मी शिकलो. तिथे माझे कोच होते. ते मला हाताळायचे”
हेड कोचचं काम काय?
‘जे उच्च क्षमतेचे खेळाडू आहेत, त्यांना टेक्निकल मार्गदर्शन हेड कोच कसं करु शकतो?’ यावर कपिल देव यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. लेग स्पिनर किंवा विकेट किपरला गौतम गंभीर कसं कोचिंग करु शकतो असं सवाल कपिल देव यांनी विचारला. हेड कोच म्हणजे व्यक्ती व्यवस्थापन आणि प्रोत्साहन यावर कपिल यांनी भर दिला. “तुम्हाला मॅनेज केलं पाहिजे, ते जास्त महत्वाचं आहे. मॅनेजर झाल्यानंतर तुम्ही त्यांची हिम्मत वाढवू शकता. हो, तुम्हाला हे जमू शकतं. तुम्ही मॅनेजर बनल्यानंतर तरुण मुलं तुमच्याकडे पाहतात” असं कपिल देव म्हणाले. “सर्वांना टीममध्ये चांगलं, सहजता वाटली पाहिजे. ते कॅप्टनच काम आहे. तुम्ही चांगलं करु शकता हे कॅप्टन आणि मॅनेजरच काम आहे. मी त्याकडे याच दृष्टीने पाहतो” असं कपिल देव म्हणाले.