AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kapil Dev : गौतम गंभीर यांच्या कोचिंगबद्दल कपिल देव यांचं स्पष्ट मत, त्याला तुम्ही…

Kapil Dev : कपिल देव स्वत: ज्यावेळी खेळायचे त्या अनुभवाबद्दल ते बोलले की, "जे यश मिळवायचे त्यांच्यापेक्षा जे खेळाडू फॉर्मसाठी झगडायचे त्यांच्यावर माझं जास्त लक्ष असायचं. जे चांगलं खेळत नाहीयत, त्यांना टेन्शन येऊ नये ही तुमची जबाबदारी आहे. जर कोणी शंभर केले, तर त्याच्यासोबत मला ड्रिंक किंवा डिनर करायला नाही आवडणार" असं कपिल देव म्हणाले.

Kapil Dev :  गौतम गंभीर यांच्या कोचिंगबद्दल कपिल देव यांचं स्पष्ट मत, त्याला तुम्ही...
Kapil dev-Gautam GambhirImage Credit source: PTI
| Updated on: Dec 19, 2025 | 11:14 AM
Share

भारताचे माजी कर्णधार कपिल देव यांनी मॉर्डन डे हेड कोचच्या मुद्यावरून डिबेट सुरु केली आहे. पारंपारिक दृष्टीने गौतम गंभीर कोच बनू शकत नाही. त्यापेक्षा त्यांना टीम मॅनेजर म्हणणं चुकीच ठरणार नाही असं कपिल देव यांनी म्हटलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टेस्ट सीरीजमध्ये 0-2 ने पराभव झाल्यामुळे गौतम गंभीर यांच्यावर दबाव वाढला आहे. त्यावेळी कपिल देव यांनी ही कमेंट केली आहे. कोच म्हणून गौतम गंभीर यांच्या पद्धती, खेळाडूंची अदला-बदली आणि पार्ट टाइम खेळाडूंवरील अवलंबित्व या रणनितीवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. मॉर्डन क्रिकेटमध्ये कोचिंगचा अर्थ कसा बदलत चाललाय, त्यावर कपिल देव यांनी डिबेट सुरु केली आहे.

कपिल देव इंडियन चेम्बर ऑफ कॉमर्समध्ये बोलत होते. आंतरराष्ट्रीय खेळाडूंना पारंपारिक कोचिंगची आवश्यकता नाही हा मुद्दा कपिल देव यांनी मांडला. “सध्या कोच हा शब्द खूप कॉमन झालाय. गौतम गंभीर कोच असू शकत नाहीत, त्यांना आपण मॅनेजर म्हणू शकतो” असं कपिलदेव म्हणाले. तळागाळातील कोचिंग आणि एलिट लेव्हल मॅनेजमेंट यातला फरक त्यांनी समजावून सांगितला. कपिल देव म्हणाले की, “तुम्ही कोच म्हणता, तर कोच म्हणजे जिथे शाळेत, कॉलेजमध्ये मी शिकलो. तिथे माझे कोच होते. ते मला हाताळायचे”

हेड कोचचं काम काय?

‘जे उच्च क्षमतेचे खेळाडू आहेत, त्यांना टेक्निकल मार्गदर्शन हेड कोच कसं करु शकतो?’ यावर कपिल देव यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलं. लेग स्पिनर किंवा विकेट किपरला गौतम गंभीर कसं कोचिंग करु शकतो असं सवाल कपिल देव यांनी विचारला. हेड कोच म्हणजे व्यक्ती व्यवस्थापन आणि प्रोत्साहन यावर कपिल यांनी भर दिला. “तुम्हाला मॅनेज केलं पाहिजे, ते जास्त महत्वाचं आहे. मॅनेजर झाल्यानंतर तुम्ही त्यांची हिम्मत वाढवू शकता. हो, तुम्हाला हे जमू शकतं. तुम्ही मॅनेजर बनल्यानंतर तरुण मुलं तुमच्याकडे पाहतात” असं कपिल देव म्हणाले. “सर्वांना टीममध्ये चांगलं, सहजता वाटली पाहिजे. ते कॅप्टनच काम आहे. तुम्ही चांगलं करु शकता हे कॅप्टन आणि मॅनेजरच काम आहे. मी त्याकडे याच दृष्टीने पाहतो” असं कपिल देव म्हणाले.

प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.