
भारताचा प्रसिद्ध क्रिकेटर सचिन तेंडुलकर याचा मुलगा अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा थाटात पार पडलाय. या साखरपुड्याची काही फोटोही पुढे आली आहेत. सर्वांना प्रश्न पडलाय की, सचिन तेंडुलकर याची होणारी सुनबाई नेमकी कोण आणि काय करते. सचिनच्या सुनेचे नाव सानिया चंडोक आहे. विशेष म्हणजे दोघेही लहानपणीपासूनचे चांगले मित्र आहेत. अगदी कमी लोकांच्या उपस्थितीमध्ये अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा पार पडलाय. अर्जुन आणि सानिया दोघांचेही वय 25 चं असल्याचे रिपोर्टमध्ये सांगण्यात आलंय.
जवळचे मित्र आणि काही मोजके नातेवाईक यांच्या उपस्थितीत अर्जुन आणि सानिया यांचा साखरपुडा झाला. वडील सचिन तेंडुलकर यांच्याप्रमाणेच अर्जुन तेंडुलकर याने कमी वयात क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. क्रिकेटच्या माध्यमातून त्याने मोठी कमाई देखील केलीये. अर्जुनच्या नेटवर्थमध्ये सातत्याने वाढ होतंय. आयपीएलमध्ये तो मुंबई इंडियन्स संघाकडून खेळतो. अर्जुन हा मोठ्या संपत्तीचा मालक आहे.
आई वडिलांसोबत मुंबईमध्ये तो एका आलिशान घरात राहतो. यासोबतच लंडनमध्येही त्यांचे मोठे एक घर आहे. रिपोर्ट्सनुसार, अर्जुन तेंडुलकरची एकून संपत्ती ही 22 कोटी आहे. यामध्ये त्याने सर्वाधिक पैसे हे आयपीएलमधून कमावले आहेत. आयपीएलमध्ये पहिल्यांदाच 2021 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्यासोबत करार करत 2o लाखात खरेदी केले. अजूनही तो मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे. 2022 मध्ये 30 लाखात करार केला. अर्जुन तेंडुलकर रणजी ट्रॉफीमध्ये गोव्याकडून खेळतो. याशिवाय तो विजय हजारे ट्रॉफीमध्येही खेळतो.
या स्पर्धांमध्ये खेळून तो चांगली कमाई करतो. अर्जुन दरवर्षी देशांतर्गत क्रिकेट खेळून सुमारे 10 लाख रुपयांची कमाई करतो. अर्जुन तेंडुलकर याच्या खासगी लाईफबद्दल कायमच चर्चा रंगताना आता त्याने थेट साखरपुडा केलाय. लवकरच अर्जुन आणि सानिया लग्न करतील, असे सांगितले जातंय. सानिया ही एका प्रसिद्ध बिझनेसमॅनची मुलगी आहे. अनेक वर्षांपासून अर्जुन आणि सानिया एकमेकांना ओळखतात. शेवटी त्यांचा साखरपुडा पार पडलाय. कोट्यावधी संपत्तीची मालकीन सानिया ही आहे.