फक्त तीन वनडे खेळला अन् घरी बसला, आता बीसीसीआयनं थेट कोच बनवलं, आहे तरी कोण?

BCCI Coach: फक्त तीन वनडे सामने खेळल्यानंतर ज्यांचे करिअर संपले. आता तेच आता एका संघाची जबाबदारी सांभाळणार असून बीसीसीआयने त्यांना एक मोठा संधी दिली आहे.

फक्त तीन वनडे खेळला अन् घरी बसला, आता बीसीसीआयनं थेट कोच बनवलं, आहे तरी कोण?
| Updated on: Sep 25, 2026 | 11:55 AM
फक्त तीन वनडे सामने खेळल्यानंतर ज्यांचे करिअर संपले. आता तेच आता एका संघाची जबाबदारी सांभाळणार असून बीसीसीायने त्यांना एक मोठा संधी दिली आहे. बंगालचे मुख्य प्रशिक्षक लक्ष्मी रतन शुक्ला यांची ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा संघ १ ते ५ ऑक्टोबर दरम्यान श्रीनगर येथे इराणी कप सामन्यात जम्मू आणि काश्मीरचा सामना करणार आहे. शुक्ला गेल्या काही हंगामांपासून बंगालचे मुख्य प्रशिक्षक होते आणि गेल्या रणजी ट्रॉफी हंगामाच्या उपांत्य फेरीत संघाला जम्मू आणि काश्मीरकडून पराभव पत्करावा लागला होता.

केवळ तीन एकदिवसीय सामने खेळून कारकिर्दीचा शेवट
४६ वर्षीय बंगालचे माजी कर्णधार शुक्ला यांनी १९९९ मध्ये भारतासाठी तीन एकदिवसीय सामने खेळले होते. ते आयपीएल विजेत्या कोलकाता नाईट रायडर्स संघाचाही भाग होते आणि खेळाडू म्हणून आपल्या शेवटच्या आयपीएल हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळले होते. शुक्ला यांनी १९९७-९८ हंगामात महाराष्ट्राविरुद्ध आपला पहिला रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. ते खूप लहान वयातच प्रसिद्धीस आले आणि दक्षिण आफ्रिकेत झालेल्या १९९८ च्या युवा विश्वचषकासाठी त्यांची भारतीय १९ वर्षांखालील संघात निवड झाली होती.

२००० च्या दशकाच्या सुरुवातीला, शुक्ला यांची राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झाली, परंतु दुखापतींमुळे त्यांना अकादमी सोडावी लागली. लवकरच त्यांनी पेप्सी कपमध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय पदार्पण केले, ज्यात त्यांनी चार षटकांत ३२ धावा दिल्या. कोका-कोला सिंगापूर चॅलेंजमध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या त्यांच्या पुढच्या सामन्यातील कामगिरी थोडी चांगली होती, पण त्यानंतर निवड समितीने त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली.

बीसीसीआयमधील पहिली भूमिका
लक्ष्मी रतन शुक्ला भारतीय क्रिकेट नियामक मंडळात (बीसीसीआय) पहिल्यांदाच एक भूमिका स्वीकारत आहेत. देवाशीष मोहंती हे ‘रेस्ट ऑफ इंडिया’ संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक असतील, तर मिलाप मेवाड क्षेत्ररक्षण प्रशिक्षक असतील. लक्ष्मी रतन शुक्ला हे सौरव गांगुली यांचे जवळचे मित्र मानले जातात.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us