Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड सोडा, ‘जेठालाल’ने 6 चेंडूत 8 षटकार ठोकले

ऋतुराज गायकवाडने मारले षटकार, पण तरीही 'जेठालाल' होतोय या कारणामुळे व्हायरल; सोशल मीडियावर कमेंटचा महापूर

Ruturaj Gaikwad: ऋतुराज गायकवाड सोडा, जेठालालने 6 चेंडूत 8 षटकार ठोकले
पण तरीही 'जेठालाल' होतोय या कारणामुळे व्हायरल
Image Credit source: twitter
| Updated on: Nov 29, 2022 | 9:47 AM

मुंबई: काल विजय हजारे ट्रॉफीच्या (vijay hazare trophy 2022) कॉटर फायनलमध्ये ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) जबरदस्त पारी खेळली. त्यामुळे त्याची कालपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरु आहे. विशेष म्हणजे त्याने मारलेल्या षटकाराचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. उत्तरप्रदेश (Uttarpradesh) विरुद्धच्या कालच्या मॅचमध्ये त्याने 159 चेंडूत 220 धावा काढल्या आहेत. त्यामुळे त्याची तारिफ सोशल मीडियावर जोरदार होत आहे. कालच्या खेळीत त्याने 10 चौकार आणि 16 षटकार लगावले.

विशेष म्हणजे सहा बॉलमध्ये सात षटकार कसे मारले अशी चर्चा आहे. परंतु एक नो बॉल पडला, त्यावर सुध्दा ऋतुराज गायकवाडने षटकार मारला आहे. एका ओव्हरमध्ये 43 धावा काढल्या आहेत. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘मधले जेठालाल सुद्धा व्हायरल झाले आहेत.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा‘मधील एका एपिसोडमध्ये जेठालालने एका ओव्हरमध्ये आठ षटकार मारले आहेत. एका ओव्हरमध्ये 50 धावा काढण्याचा विक्रम त्यांच्या नावावरती आहे. विशेष म्हणजे टीम राजस्थान रॉयल्सच्या अधिकृत ट्विटर हॅंडलवरून एक व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

सोशल मीडियावर जेठालालचा तो रेकॉर्ड कोणी तोडू शकत नाही अशी चर्चा सुरु आहे. युवराज सिंग, ऋतुराज गायकवाड यांना सुद्धा तो रेकॉर्ड तोडता आला नाही अशा मजेशीर कमेंट सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.