
Lionel Messi India Tour : दिग्गज फुटबॉलपटू लयोनेल मेस्सी शनिवारी (13 डिसेंबर) तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आला होता. या दरम्यान त्याने कोलकाता, हैदराबाद, दिल्ली, आणि मुंबई या चार शहरांचा दौरा केला. विश्वकप विजेता लियोनेल मेस्सी (Lionel Messi) हा या वेळी विविध क्षेत्रातील दिग्गजांसोबत दिसला होता. मात्र त्याच्या लाखो चाहत्यांना अपेक्षा होती की भारतात आल्यावर मेस्सी निदान एखादी मॅच, निदान थोडा वेळ तरी फुटबॉल खेळेल, पण त्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. त्याचं कारण म्हणजे मेस्सीची इन्शुरन्स पॉलिसी..
काय आहे मेस्सीची इन्श्योरन्स पॉलिसी ?
हो हे खरं आहे. खरंतर 38 वर्षांचा मेस्सी हा भारतात ‘मीट अँड ग्रीट’ दौऱ्यावर आला होता. पण या तीन दिवसांत कोणतीही क्लब मॅच किंवा कोणताही आंतरराष्ट्रीय सामना नव्हता, तरीही भारत दौऱ्याच मेस्सी एकदाही फटुबॉल मॅच खेलला नाही. त्याच्या मागे इन्शुरन्स हे एकमेव मोठं कारण आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मेस्सीकडे जगातील सर्वात महागड्या खेळाडू विमा पॉलिसींपैकी एक आहे. या सुपरस्टार फुटबॉलपटूच्या डाव्या पायाचा अंदाजे 900 दशलक्ष डॉलर्सचाचा विमा उतरवण्यात आला आहे.कोणत्याही गंभीर धोकादायक दुखापतीमुळे खेळाडूच्या कारकिर्दीत होणाऱ्या आर्थिक नुकसानापासून हा विमा संरक्षण देतो. मात्र त्यात एक अट आहे, त्यामध्ये असेही म्हटले आहे की, लियोनेल मेस्सी हा त्याचा देश किंवा क्लब व्यतिरिक्त इतर कोणत्याही संघाकडून खेळू शकत नाही. म्हणूनच तो इतर देशात गेल्यावर फुटबॉल खेळत नाही.
अर्जेंटिना आणि मेजर सॉकर लीग (एमएलएस) क्लब इंटर मियामीकडून खेळणाऱ्या मेस्सीचे भारतात कोणतेही अधिकृत सामन्यांचे वेळापत्रक आखण्यात आलं नव्हतं. याव्यतिरिक्त, या विमा पॉलिसीमध्ये कोणत्याही प्रकारच्या प्रदर्शनीय सामन्यांचा समावेश नाही. त्यामुळे, जर मेस्सी अशा अनधिकृत सामन्यात जखमी झाला तर त्याला लाखो डॉलर्सची भरपाई मिळू शकते. यामुळे, इतक्या मोठ्या विमा पॉलिसीमुळेच, लिओनेल मेस्सी भारतातील त्याच्या चाहत्यांसाठी एकही सामना खेळू शकल नाहबी, ज्यामुळे चाहत्यांची मोठी निराशा झाली होती.