LSG vs RCB : समोर विराट नव्हता, पण भारताचाच खेळाडू होता, अनुष्काने थोडं मोठ मन दाखवल असतं, तर..

LSG vs RCB : काल आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्सचा सामना झाला. या मॅचमध्ये अनुष्का शर्माची एक Reaction सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. क्रिकेटमध्ये भले प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूने शतक झळकावलं, तर मोठ्या मनाने त्याचं कौतुक केलं जातं. हा खिलाडूवृत्तीचा भाग असतो.

LSG vs RCB : समोर विराट नव्हता, पण भारताचाच खेळाडू होता, अनुष्काने थोडं मोठ मन दाखवल असतं, तर..
Anushka Sharma
Image Credit source: Pankaj Nangia/Getty Images/pti
| Updated on: May 28, 2025 | 12:45 PM

IPL 2025 च्या लीग स्टेजच्या शेवटच्या 70 व्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्सचा कॅप्टन ऋषभ पंतने शानदार प्रदर्शन केलं. तो या सामन्यात शतक झळकवण्यात यशस्वी ठरला. ऋषभने त्याच्या तुफानी इनिंगने सर्वांच लक्ष आपल्याकडे वेधून घेतलं. त्याच्या या इनिंग दरम्यान प्रेक्षक स्टँडमध्ये RCB चा स्टार विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मा उपस्थित होती. तिची Reaction सोशल मीडियावर खूप व्हायरल होतेय.

ऋषभ पंतने या सामन्यात 61 चेंडूंचा सामना करत नाबाद 118 धावा फटकावल्या. त्याने 193.44 च्या स्ट्राइक रेटने 11 फोर आणि 8 सिक्स मारले. 54 चेंडूत त्याने शतक झळकावलं. पंतने इनिंगच्या 18 व्या ओव्हरमध्ये भुवनेश्वर कुमारच्या पाचव्या चेंडूवर चौकार मारुन शतक पूर्ण केलं. पंतच आयपीएल करिअरमधील हे दुसरं शतक आहे. त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या गोलंदाजांची शाळा घेतली.

तिची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली

ऋषभ पंतने शतक झळकवल्यानंतर आपला आनंद खास स्टाइलमध्ये साजरा केला. त्याने दोन्ही हात उंचावून कोलांटी उडी मारली. त्यावेळी स्टँडमध्ये उपस्थित असलेल्या अनुष्का शर्माने अशी रिएक्शन दिली की, फॅन्सच लक्ष तिच्याकडे गेलं. अनुष्का शर्मा अनेकदा पती विराट कोहलीला सपोर्ट करण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित असते. पंतच्या शतकानंतर तिच्या चेहऱ्यावर हताशा, उदासी दिसली. तिची ही प्रतिक्रिया कॅमेऱ्यात कैद झाली. लगेचच सोशल मीडियावर ही रिएक्शन व्हायरल झाली. तिचा चेहरा पडलेला.


181.08 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी

RCB च्या कॅप्टनने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. लखनऊच्या फलंदाजांनी दमदार प्रदर्शन केलं. ऋषभ पंतशिवाय मिचेल मार्शही दमदार इनिंग खेळला. त्याने 37 चेंडूत 67 धावा केल्या. मार्शने 181.08 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी केली. त्याने चार फोर आणि पाच सिक्स मारले. लखनऊ सुपर जायंट्स टीमने 20 ओव्हरमध्ये 3 विकेट गमावून 227 धावा फटकावल्या.