विवाहित महिलांनी या 3 दिवशी केस धुणे टाळावे; अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं

हिंदू मान्यतेप्रमाणे ज्योतिषशास्त्रानुसार असे अनेक दिवस आहेत ज्या दिवशी केस धुणे टाळण्यास सांगितले गेले आहे. विशेषत: महिलांनी काही ठराविक दिवशी केस धुण्यास मनाई केली गेली आहे. अन्यथा आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते.

विवाहित महिलांनी या 3 दिवशी केस धुणे टाळावे; अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकतं
Married women should avoid washing their hair on these 3 days
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 26, 2025 | 7:35 PM

सनातन धर्मात आपल्या दैनंदिन जीवनाशी संबंधित अनेक नियम आहेत. असे मानले जाते की या नियमांचे पालन केल्याने आपल्या घरात शांती राहते. याशिवाय, आपल्या कुंडलीतील ग्रहांचाही याचा खूप परिणाम होतो. जर नियमांचे पालन केले तर ग्रहांची स्थिती योग्य राहते तसेच त्यामुळे आपले जीवनही सुरळीत होते. तथापि, या नियमांकडे दुर्लक्ष केल्याने आपल्या जीवनात अनेक समस्या उद्भवू शकतात. दरम्यान या मान्यतांना कोणताही वैज्ञानिक आधार नाही, परंतु हे नियम किंवा परंपरा शतकानुशतके पाळले जातात. या मान्यतांवर काही लोक हे शास्त्रानुसार विश्वास ठेवतात. त्यातील एक नियम म्हणजे केस धुण्याबाबत.

हिंदू धर्मातही केस धुण्याबाबत अनेक नियम आहेत. विशेषत: महिलांबाबत. विवाहित महिलांनी ठराविक दिवशी केस धुणे टाळावे. त्यामागे शास्त्रात काही कारणे सांगण्यात आले आहेत.घरातील मोठ्यांना अनेकदा असं म्हणताना देखील ऐकलं असेल की गुरुवारी केस धुवू नयेत. नक्की या मागे काय सत्य आहे हे जाणून घेऊयात.

गुरुवारी केस का धुवू नयेत?

गुरुवारी केस धुण्यास मनाई आहे. घरातील वडीलधारी मंडळी या दिवशी केस धुण्यास मनाई करतात. हिंदू मान्यतेनुसार, या दिवशी चुकूनही केस धुवू नयेत. ज्योतिषशास्त्रानुसार, गुरुवार हा गुरु ग्रहाचा दिवस आहे. असे मानले जाते की या दिवशी केस धुण्याने गुरु ग्रह कमकुवत होतो. असेही म्हटले जाते की या दिवशी केस धुण्याने गुरु ग्रह कोपतो आणि त्यांचे आशीर्वाद मिळत नाहीत. यामुळे मोठे आर्थिक नुकसान होते. तसेच अनेक कामे उशिरा होतात.

या दिवशीही केस धुवू नयेत

गुरुवार व्यतिरिक्त, असे काही दिवस आहेत जेव्हा केस धुवू नयेत हे लक्षात घेतले पाहिजे. शास्त्रांनुसार, सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुणे टाळावे. केस धुण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे शुक्रवार. असे म्हटले जाते की या दिवशी केस धुण्याने शुक्र ग्रहाचे आशीर्वाद नेहमीच आबाधित राहतात. शुक्राच्या आशीर्वादाने जीवनात सुख आणि समृद्धी वाढते.

विवाहित महिलांनी ही चूक करू नये

विवाहित महिलांनी देखील केस धुताना विशेषतः काळजी घ्यावी. विवाहित महिलांनी मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी केस धुणे टाळावे. त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता असते. महिलांसाठी देखील शुक्रवारी केस घुणे योग्य मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आली आहे. तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही, अंधश्रद्धेला दुजोरा नाही)