केस धुतल्यानंतर ‘या’ 5 सामान्य चुका आवर्जून टाळा, अन्यथा…
केस निरोगी आणि मजबूत ठेवण्यासाठी फक्त धुणे पुरेसे नाही. तर केस धुतल्यानंतर त्यांची योग्य काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. परंतु केस धुतल्यानंतर लोकं काही सामान्य चुका करतात, ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या निर्माण होतात. तर आजच्या या लेखात आपण केस धुतल्यानंतर कोणत्या 5 चुका करू नयेत ते जाणून घेऊयात.

बदलत्या जीवनशैलीचा तसेच हवामानाचा आपल्या सर्वांच्या केसांवर परिणाम होत असतो. ज्यामुळे आजकाल प्रत्येकजण केसांच्या समस्येने त्रस्त झालेले आहेत. त्यात संशोधक आणि केस तज्ञांचा असा विश्वास आहे की जेव्हा तुम्ही केस धुतल्यानंतर केसांची निगा राखता तेव्हा तुमच्या अशा काही सवयी आहेत ज्या केसांच्या मुळांना हळूहळू नुकसान पोहोचवतात आणि केस गळणे, कोंडा आणि केस पातळ होणे यासारख्या समस्या निर्माण करतात. फक्त केस धुणे पुरेसे नाही. केस धुतल्यानंतर तुम्ही तुमचे केस कसे योग्यरित्या सांभाळतात किंवा काळजी घेतात याकडे देखील लक्ष देणे आवश्यक आहे.
आजच्या धावपळीच्या जीवनात केस धुतल्यानंतर वेळेअभावी आपण अशा अनेक गोष्टी करू लागतो ज्या आपल्या केसांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात, ज्यामुळे केस कमकुवत, कोरडे आणि तुटण्याची शक्यता असते. चला तर मग या लेखात जाणून घेऊया केस धुतल्यानंतर लगेच कोणत्या 5 गोष्टी करू नयेत.
1. टॉवेलने ओले केस जोरात चोळणे
केस धुतल्यानंतर काही महिला या केसांमधील अतिरिक्त पाणी काढुन टाकण्यासाठी टॉवेलने जोरदारपणे केस चोळतात, जेणेकरून ते लवकर सुकतील. पण ही सवय केसांची सर्वात मोठी शत्रू आहे. हेल्थलाइनच्या मते , तुम्ही जेव्हा केस धुता तेव्हा ओले केस सर्वात कमकुवत असतात आणि ते जोरात चोळण्याने तुटण्याची शक्यता अधिक असते. अशावेळेस तुम्ही मायक्रोफायबर टॉवेल किंवा मऊ कॉटन टी-शर्टने तुमचे केस हळूवारपणे वाळवा, त्यांना चोळू नका.
2. ओले केस विंचरणे
केस धुतल्यानंतर अनेकजण लगेचच केस विंचरण्याचा प्रयत्न करतात. तेव्हा असे करणे टाळा कारण ओले केस मुळापासून कमकुवत असतात. त्यामुळे बहुतेक केस तुटतात. कारण तुम्ही जेव्हा हे ओले केस विंचारता तेव्हा धुतलेले केस गुंतलेले असतात. अशावेळेस चुकूनही ओले केस कंगव्याने विंचरू नयेत. त्याऐवजी, केस थोडे कोरडे होऊ द्या, नंतर मोठे दात असलेल्या कंगव्याने केस विंचरा.
3. हीट स्टाइलिंग टूल्स वापरणे
काहीजण केस धुतल्यानंतर लगेचच हेअर ड्रायर किंवा स्ट्रेटनर वापरण्यास सुरुवात करतात, ज्यामुळे केसांमधील ओलावा तर निघून जातोच पण केसांमध्ये कोरडेपणा आणि फ्रिजी होतात. केस सुकेपर्यंत त्यावर हीटिंग टूल्स वापरू नका आणि केस नैसर्गिकरित्या सुकू द्या.
4. घट्ट केस बांधणे
बऱ्याचदा काही महिला ओल्या केसांमध्ये बन किंवा पोनीटेलसारखे हेअरस्टाईल करतात, ज्यामुळे केसांच्या मुळांना सर्वात जास्त नुकसान होते. ओले केस बांधल्याने केसांच्या मुळांवर दबाव येतो, ज्यामुळे केस तुटतात आणि केस गळतात. म्हणून, केस पूर्णपणे कोरडे झाल्यानंतरच कोणतीही हेअरस्टाईल किंवा केस विंचरणे.
5. कंडिशनर लावल्यानंतर लगेच धुणे
रोजच्या ऑफिस तसेच इतर कामांच्या घाईघाईत केसांना कंडिशनर लावल्या लगेच काही मिनिटांत धुवून टाकतात किंवा कधीकधी कंडिशनर जास्त वेळ तसेच ठेवतात, ज्यामुळे स्कॅल्पवर सूज येऊ शकते. कंडिशनर केसांच्या लांबीपर्यंत लावा आणि 23 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.
( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)
