Mohammed Shami Wife : एका म्हाताऱ्यानं घोटाळा करुन…शमीनं निवृत्ती घेताच पत्नी हसीन जहाँचा गंभीर आरोप
Mohammad Shami Wife On His Retirement: मोहम्मद शमीने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली आहे. यानंतर आता त्याच्या पत्नीने त्याच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

भारतीय संघाचा स्टार खेळाडू मोहम्मद शमीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तब्बल १३ वर्षांची कारकिर्द गाजवल्यानंतर त्यानं हा निर्णय घेतला आहे. तो आता टी-२० आणि वनडे क्रिकेटसाठी अजूनही उपलब्ध आहे.
शमीने निवृत्तीचा व्हिडिओ शेअर करताच त्याची एक्स पत्नी हसीन जहाँने इन्सटाग्रामवर पहिली प्रतिक्रिया शेअर केली आहे. हसीन जहाँने या स्टोरीमधून शमीवर टोला लगावला आहे. तिने शमीचे नाव घेतले नाही पण अप्रत्यक्षरित्या टोला लगावला आहे.
हसीन जहाँ म्हणाली की," एका म्हाताऱ्यानं घोटाळा करुन मार्कशीटमधून आपलं वय कमी करुन घेतले होते, आता स्वत:च म्हातारेपणा तो सिद्ध करतोय." असं म्हणतं तिने टोला लगावला आहे.
याआधीही शमीवर हसीन जहाँने असा आरोप केला होता. तो वय लपवून टीम इंडियासाठी क्रिकेट खेळला आहे. शमीचे जे वय आहे ते आता जे आहे त्यापेक्षा जास्त आहे. असं तिचं म्हणणं आहे.
मोहम्मद शमी आणि हसीन जहाँ यांचा निकाह २०१४ मध्ये पार पडला होता. त्यांना एक मुलगीही आहे. लग्नाच्या चार वर्षांनी शमीवर हसीनने विवाहबाह्य संबंध, कौटुंबिक हिंसाचार, जीवे मारण्याची धमकी देण्याचे आरोप केले होते. यानंतर ते दोघेही वेगळे राहतात.