भारतीय गोलंदाजाच्या वडिलांचं निधन, रवी शास्त्री म्हणाले वडिलांचा आशीर्वाद तुझ्यासोबत, तुला 5 विकेट्स मिळतील

| Updated on: Jun 03, 2021 | 8:30 PM

विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) इंग्लंड दौर्‍यावर (England Tour) रवाना झाला आहे.

भारतीय गोलंदाजाच्या वडिलांचं निधन, रवी शास्त्री म्हणाले वडिलांचा आशीर्वाद तुझ्यासोबत, तुला 5 विकेट्स मिळतील
रवी शास्त्री
Follow us on

मुंबई : विराट कोहलीच्या (Virat Kohli) नेतृत्वात भारतीय क्रिकेट संघ (Indian Cricket Team) इंग्लंड दौर्‍यावर (England Tour) रवाना झाला आहे. या दौर्‍यावर टीम इंडियाला न्यूझीलंड विरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चँपियनशिपची फायनल खेळणार आहे. त्यानंतर इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतही सहभागी होणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट आणि भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Head Coach Ravi Shahstri) यांनी पत्रकार परिषद घेत अनेक महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली. (Mohammed Siraj reveals what Ravi Shastri told him after his father’s death during Australia tour)

दरम्यान, भारतीय वेगवान गोलंदाज त्याच्या वडिलांच्या निधनानंतर खचून न जाता त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीबाबत व्यक्त झाला. हा गोलंदाज म्हणाला की, वडिलांच्या निधनानंतर टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्यांना खूप मदत केली. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) असं या गोलंदाजाचं नाव आहे. सिराज हा विराट कोहलीच्या आयपीएल संघाचा आणि आता भारतीय संघाचा महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. सिराज जेव्हा टीम इंडियासमवेत ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर होता तेव्हा त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. तेव्हा सिराजला खचून न जाता पुन्हा उभं राहण्यासाठी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी मदत केली होती.

एबीपी न्यूजशी बोलताना मोहम्मद सिराज याने आपल्या वडिलांच्या निधनानंतर प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी त्याला कशी प्रेरणा दिली ते सांगितले. सिराज म्हणाला की, रवी सर आणि गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण सर खूप सपोर्टिव्ह आहेत. रवी सर माझ्याकडे आले आणि म्हणाले, तू कसोटी सामना खेळ, तुला पाच विकेट्स मिळतील. तुझ्या वडिलांच्या प्रार्थना तुझ्यासोबत असतील. सामना संपल्यानंतरही रवी सर खूप आनंदाने म्हणाले, मी म्हणालो होतो की नाही, तुला पाच विकेट्स मिळतील म्हणून. आमच्या प्रशिक्षकाने मला असे प्रोत्साहन दिल्यावर माझा आत्मविश्वास खूप वाढला. ऐतिहासिक गाबा कसोटीच्या दुसर्‍या डावातही सिराजने पाच गडी बाद केले. आता सिराज वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासाठी तयारी करत आहे.

ऑस्‍ट्रेलिया दौऱ्यावर सर्वाधिक 13 विकेट

2020-21 च्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर भारताने ऐतिहासिक कसोटी मालिका विजय नोंदवला होता. मेलबर्न येथे खेळवल्या गेलेल्या दुसर्‍या कसोटी सामन्यात 25 वर्षीय वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने पदार्पण केलं होतं. या सामन्यात तो सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. तसेच संपूर्ण मालिकेतही त्याने भारताकडून सर्वाधिक बळी मिळवले होते. त्याने या मालिकेत 13 ऑस्ट्रेलियन फलंदाजांना पव्हेलियनचा रस्ता दाखवला. दरम्यान, सिराजने यावेळी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याचेही कौतुक केले. तो म्हणााला विराट भाई खूपच सपोर्टिव्ह आहे. दोन वर्षांपूर्वी मी जेव्हा आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरत होतो, तेव्हादेखील त्याने मला प्रोत्साहन दिलं होतं. माझ्या गोलंदाजीवर विश्वास दाखवला होता. याबद्दल मी त्याचा आभारी आहे.

इतर बातम्या

IPL 2021 : आयपीएलसाठी परदेशी खेळाडू न आल्यास कारवाई, BCCI पाऊल उचलणार

‘या’ दोन भारतीय गोलंदाजांविरोधात खेळताना घाम फुटायचा, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची कबुली

Happy Birthday Rafael Nadal : क्ले कोर्टचा अनभिषिक्त सम्राट, राफेल नदाल जिंकलेली प्रत्येक ट्रॉफी का चावतो?

(Mohammed Siraj reveals what Ravi Shastri told him after his father’s death during Australia tour)