AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘या’ दोन भारतीय गोलंदाजांविरोधात खेळताना घाम फुटायचा, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची कबुली

भारत आणि पाकिस्तान या दोघांतील क्रिकेट मैदानावरची खुन्नस जगजाहीर आहे. या दोन्ही संघाच्या सामन्याची सर्वच क्रिकेटप्रेमी आतुरतेने वाट पाहतात.

'या' दोन भारतीय गोलंदाजांविरोधात खेळताना घाम फुटायचा, पाकिस्तानच्या दिग्गज खेळाडूची कबुली
माजी भारतीय क्रिकेट संघ
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 4:43 PM
Share

कराची : क्रिकेट म्हटलंकी चुरस, स्पर्धा हे सारकाही आलच. त्यातही क्रिकेट जगतातील सर्वांत कट्टर प्रतिस्पर्धी म्हटलं तर भारत आणि पाकिस्तान (India and Pakistan). या दोन्ही संघातील सामन्यांना अधिक चुरशीचे बनवायचे ते दोन्ही संघाचे एकसे बढकर एक खेळाडू. दोन्ही संघाकडे तगडी फलंदाजी आणि गोलंदाजी होती. भारताचा वीरेंद्र सेहवाग (Virendra Sehwag) जसा पाकिस्तानच्या गोलंदाजाना सळो की पळो करायचा, तसेच दोन भारतीय गोलंदाजाना पाहून पाकिस्तानच्या फलंदाजाना घाम सुटायचा. ही गोष्ट स्वत: पाकिस्तानचा माजी कर्णधार शोएब मलिक (Shoaib Malik) याने मान्य केली आहे. हे दोन गोलंदाज म्हणजे भारतीय वेगवान गोलंदाजीचे माजी दिग्गज झहीर खान (Zaheer Khan) आणि आशिष नेहरा (Ashish Nehra). (Shoaib Malik Tells How Ashish Nehra and Zaheer khan troubled Pakistan Batsmans)

शोएबने क्रिकविकला (Cricwick) दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, “इरफानने जरी कसोटी सामन्यांत पाकिस्तानविरुद्ध हॅट्रीक घेतली होती. तरी त्याला खेळण आम्हाला तितकं अवघड नव्हतं. खरी अडचण तर झहीर खान आणि आशिष नेहरा यांच्यामुळे होत. ते दोघेही बॅटच्या किनाऱ्यांना टार्गेट करते ज्यामुळे फलंदाज पटकन बाद होत.”

वेगवान गोलंदाजाची फौज

पूर्वी भारतीय संघ म्हटलं की जास्त मदार ही फलंदाजावरच असायची. त्यात भारतीय गोलंदाजी म्हटलं की फिरकीपटूना अधिक महत्त्व दिल जात. मात्र जवागल श्रीनाथ (Jawahal Shrinath), कपिल देव (Kapil Dev) यांनी रचलेला वेगवान गोलंदाजीचा पाया झहीर, नेहरा यांनी मजबूत केला. सध्याच्या काळात भारताकडे युवा वेगवान गोलंदाजाची फौज आहे. ज्यात जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah), मोहम्मद सिराज(Mohammad Siraj), नवदीप सैनी (Navdeep Saini), टी नटराजन (T natrajan) अशा एकापेक्षा एक गोलंदाजाचा समावेश होतो.

हे ही वाचा :

ओव्हरमधला एक बॉल खेळून दाखव, एक बाईक गिफ्ट, शोएब अख्तरचं चॅलेंज, 6 बाईक देण्याची पैज!

भारतीय फलंदाजी ‘या’ खेळाडूमुळे बदलली, सर रिचर्डशीही तुलना, पाकिस्तानच्या माजी खेळाडूकडून कौतुक

ICC Meeting : क्रिकेट इतिहासातील ‘ती’ मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी

(Shoaib Malik Tells How Ashish Nehra and Zaheer khan troubled Pakistan Batsmans)

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...