AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ICC Meeting : क्रिकेट इतिहासातील ‘ती’ मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) एक महत्त्वाची बैठक नुकतीच दुबईमध्ये पार पडली. यामध्ये विश्वचषकांसंबधी काही महत्त्वाचे निर्णय झाले. तसेच आयसीसीचा ‘मिनी वर्ल्ड कप’ म्हणून ओळखली जाणारी ‘चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा’ ही पुन्हा घेणार असल्याचं आयसीसीने जाहिर केलं. 2025 आणि 2029 साली चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यासोबतच आयसीसी 14 संघांसह 2027 सालचा एकदिवसीय विश्वचषक […]

ICC Meeting : क्रिकेट इतिहासातील 'ती' मोठी स्पर्धा पुन्हा खेळवली जाणार, भारताला पाकिस्तानकडून बदला घेण्याची सुवर्णसंधी
आयसीसीचा मोठी निर्णय
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 1:10 PM
Share

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची (ICC) एक महत्त्वाची बैठक नुकतीच दुबईमध्ये पार पडली. यामध्ये विश्वचषकांसंबधी काही महत्त्वाचे निर्णय झाले. तसेच आयसीसीचा ‘मिनी वर्ल्ड कप’ म्हणून ओळखली जाणारी ‘चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा’ ही पुन्हा घेणार असल्याचं आयसीसीने जाहिर केलं. 2025 आणि 2029 साली चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. यासोबतच आयसीसी 14 संघांसह 2027 सालचा एकदिवसीय विश्वचषक खेळण्याचाही विचार करत आहे. तसेच टी -20 वर्ल्ड कपही दर दोन वर्षांनी खेळवला जाईल, हा महत्त्वाचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. (ICC will Take Champions Trophy Tournament Schedule Announced in meeting at dubai)

भारत बदल्यासाठी तयार

2017 साली शेवटची चॅम्पियन्स ट्रॉफीची स्पर्धा पार पडली होती. ज्यामध्ये भारत अंतिम सामन्यापर्यंत पोहचला होता. मात्र अंतिम सामन्यात भारताला पाकिस्तानकडून 180 धावांनी दारुण पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या अनेक वर्षात भारत महत्त्वाच्या स्पर्धांमध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाला नव्हता. मात्र चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनल याला अपवाद ठरली. त्यामुळे भारत चॅम्पियन्स ट्रॉफीत विजय मिळवून पाकिस्तानशी पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज झाला आहे.

धोनीने रचला होता इतिहास

भारताला आयसीसीच्या तिन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवून देणारा एकमेव कर्णधार म्हणजे महेंद्र सिंह धोनी. 2007 मध्ये टी-20 विश्वचषक, त्यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषकात विजय मिळवून दिल्यानंतर धोनीने 2013 साली चॅम्पियन्स ट्रॉफीही भारताला मिळवून दिली. अंतिम सामन्यात इंग्लंडच्या संघाल नमवत भारताने हा विजय मिळवला.

वन डे वर्ल्ड कपमध्ये पुन्हा सुपर सिक्स फॉरमॅट?

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, आयसीसीला पुन्हा वन डे वर्ल्ड कपमध्ये सुपर सिक्स फॉरमॅट परत आणायचा आहे. हा फॉरमॅट 1999 ते 2007 या दरम्यानच्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेवेळी होता. पण 2007 च्या विश्वचषकातून भारताचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आल्यानंतर तो फॉरमॅट बदलला गेला. त्यानंतर 2011 आणि 2015 च्या विश्वचषकात क्वार्टर फायनल खेळले गेले. एकदिवसीय सुपर लीगचा फायदा झाल्याचे आयसीसीने मान्य केले. यामुळे सहयोगी देशांपर्यंत क्रिकेटचा विस्तार करण्यास मदत झाली.

टी ट्वेन्टी वर्ल्ड कपमध्ये 20 संघ

एकदिवसीय विश्वचषकातील 14 संघांच्या निर्णयानंतर आयसीसीने टी -20 विश्वचषकातही संघांच्या विस्तारास हिरवा कंदील दर्शवला आहे. आयसीसीच्या म्हणण्यानुसार २2024 ते 2030 दरम्यान दर दोन वर्षांनी टी २० वर्ल्ड कप आयोजित केला जाईल. त्याशिवाय चॅम्पियन्स करंडक पुन्हा सुरु करण्याची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार आठ संघांदरम्यान चॅम्पियन्स ट्रॉफी खेळली जाईल आणि यात चार संघांचे दोन गट तयार केले जातील. यानंतर उपांत्य फेरी आणि अंतिम सामने खेळले जातील.

हे ही वाचा :

मोठी बातमी : प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय

WTC Final : रोहित शर्माची जर बॅट चालली तर अंतिम सामन्यात दुहेरी शतक ठोकलंच म्हणून समजा…, पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी

WTC च्या अंतिम सामन्याआधी न्यूझीलंडच्या संघाला मोठा झटका, ‘हा’ हुकूमी एक्का होऊ शकतो संघाबाहेर

(ICC will Take Champions Trophy Tournament Schedule Announced in meeting at dubai)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.