ओव्हरमधला एक बॉल खेळून दाखव, एक बाईक गिफ्ट, शोएब अख्तरचं चॅलेंज, 6 बाईक देण्याची पैज!

पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoiab Akhtar), ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस नावाने देखील ओळखलं जातं तसंच ज्याची जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान आणि धोकादायक गोलंदाज म्हणून होती.

ओव्हरमधला एक बॉल खेळून दाखव, एक बाईक गिफ्ट, शोएब अख्तरचं चॅलेंज, 6 बाईक देण्याची पैज!
Shoaib Akhtar

मुंबई :  पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर (Shoiab Akhtar), ज्याला रावळपिंडी एक्सप्रेस नावाने देखील ओळखलं जातं तसंच ज्याची जागतिक क्रिकेटमध्ये सर्वांत वेगवान आणि धोकादायक गोलंदाज म्हणून होती. निवृत्तीनंतरही अख्तर सतत या ना त्या कारणाने चर्चेत असतो. आता तो चर्चेत आलाय एका पाकिस्तानी अभिनेत्याला दिलेल्या चॅलेंजमुळे… ओव्हरमधला एक बॉल खेळून दाखव, तुला एक बाईक गिप्ट करतो, असं चॅलेंज त्याने अभिनेता फहाद मुस्तफाला दिलं. त्याने शोएबच्या चॅलेंजवर आणखी काही उत्तर दिलं नाही. पण दुसऱ्याच व्यक्तीने शोएबचं स्वीकारलंय… हे प्रकरण नेमकं काय आहे ते आपण पाहूयात…. (Pakistan Former Bowler Shoaib Akhtar challenge Actor Fahad mustafa Syed Z bukhari twiter war)

पाहा चॅलेंज प्रकरण काय?

काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने ट्विटरवरून पाकिस्तानचा अभिनेता फहाद मुस्तफा याला एक चॅलेंज दिलं. माझी ओव्हर खेळून दाखव मी तुला एक बाईक गिफ्ट करतो., असं चॅलेंज शोएबने दिलं. शोएबच्या चॅलेंजवर मुस्तफाने आणखी कुठलंही उत्तर दिलं नाही. परंतु पाकिस्तानच्या पंतप्रधानांचे माजी असिस्टंट सय्यद जुल्फिकार बुखारी यांनी या चॅलेंज प्रकरणात उडी घेतलीय.

बुखारी यांनी आपल्या ट्विटर हँडलवरुन शोएबचं चॅलेंज आपण कबूल करत असल्याचं म्हटलं. यावर शोएब मात्र चांगलाच हैरान झाला. आपण चॅलेंज दिलं एकाला आणि स्वीकारलं दुसऱ्याने… शोएबने देखील मजा घेत म्हटलं.. हेअर वी गो…. आणखी एक चॅलेंजर्स…. खैरियत हैं…?

बुखारी यांनी या ट्विटला उत्तर देत म्हटलं, “दोस्त मी ठीक आहे…. मी तुझा एकही बॉल मिस केला तर मी प्रत्येक बॉलला एक बाईक देईन….”

त्यांचं उत्तर ऐकून शोएबला आणखीनच हैरानी झाली. शोएब म्हणाला, अरे हे प्रकरण तर गंभीर होत चाललंय. ‘असं असेल तर तुम्ही माझ्या बॉलला टच जरी केलं तरी मी प्रत्येक बॉलवर बाईक देईन’

शोएबने हे देखील विचारलं की बुखारी आपण हे चॅलेंज कधी स्वीकारणार आहात… तर बुखारी यांनी आतापर्यंत शोएबच्या प्रश्नाचं उत्तर दिलेलं नाही.

(Pakistan Former Bowler Shoaib Akhtar challenge Actor Fahad mustafa Syed Z bukhari twiter war)

हे ही वाचा :

IPL 2021 पूर्वीच दिग्गज क्रिकेटर्सचा टी-20 धमाका, क्रिकेट रसिकांसाठी पर्वणी

Video : जेव्हा राहुल द्रविडने बोलिंगने मॅच पलटवली होती, एक ओव्हर दोन विकेट आणि…!

WTC Final : लॉर्ड्सवर खणखणीत शतक, न्यूझीलंडच्या सलामीवीराचं भारताला थेट चॅलेंज

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI