AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : लॉर्ड्सवर खणखणीत शतक, न्यूझीलंडच्या सलामीवीराचं भारताला थेट चॅलेंज

भारत आणि न्यूझीलंड याच्यांत 18 जूनपासून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याला सुरुवात होणार आहे.

WTC Final : लॉर्ड्सवर खणखणीत शतक, न्यूझीलंडच्या सलामीवीराचं भारताला थेट चॅलेंज
डेवन कॉन्वे
| Edited By: | Updated on: Jun 03, 2021 | 12:58 PM
Share

साऊदम्पटन : कसोटी क्रिकेटचा वर्ल्ड कप समजल्या जाणाऱ्या वर्ल्ड टेस्ट  चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंडमध्ये 1 जूनपासून इंग्लंडमध्ये खेळवला जाईल. भारतीय संघ सध्या विलगीकरणात असून न्यूझीलंडचा संघ इंग्लंडविरोधात सराव सामना खेळत आहे. याच सामन्यात नुकतंच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा न्यूझीलंडचा सलामीवीर डेवन कॉन्वेने (Devon Conway) दणदणीत शतक ठोकलं आहे. पहिल्याच सामन्यान लॉर्ड्सवर इंग्लंडविरोधात अशी दमदार कामगिरी करत त्याने जणू WTC Final पूर्वी भारतीय संघाला चॅलेंजच दिलं आहे. (New Zealands Devon Conway Will play crucial role in WTC Final Against India)

आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत अव्वल क्रमांकावर असणारे संघ म्हणजे भारत आणि न्यूझीलंड. या दोन संघातच डब्लूटीसीची फायनल रंगणार असल्याने सामना घमासान होणार हे नक्की. दोन्ही संघाकडे दमदार फलंदाजीसह गोलंदाजीही तगडी आहे. काही विशिष्ट अष्टपैलू खेळाडूंमुळे सामना रंगतदार होणार असं म्हटलं जात आहे. त्यात न्यूझीलंड इंग्लंविरोधात सराव सामना खेळून WTC Final पूर्वीची तयारी करत आहे. तर भारतीय संघ विलगीकरणात असून देखील आपली रणनीती तयार करण्यात व्यस्त आहे.

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बडा मुकाबला पार पडणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

भारतीय संघ

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्याच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या संपूर्ण टीमचे नेतृत्त्व करणार असून कोहलीसह अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हेही या दौऱ्यात आहेत.

संबंधित बातम्या  

WTC Final : इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट म्हणाला, फायनल खेळणं ही तर आमची भूक!

World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

WTC Final : विराट, पुजारा, रहाणे, पंत नाही तर किवींविरुद्धच्या मागील सिरीजमध्ये या बॅट्समनच्या बॅटमधून सर्वाधिक रन्स!

(New Zealands Devon Conway Will play crucial role in WTC Final Against India)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.