AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट म्हणाला, फायनल खेळणं ही तर आमची भूक!

ICC World Test Championship Final विराट म्हणाला, "WTC फायनलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कसोटी खेळणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही गेल्या 5-6 वर्षात ज्याप्रकारे संघबांधणी केली आहे, त्याचच फळ म्हणजे आम्ही फायनलमध्ये दाखल झालो आहे" 

WTC Final : इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी विराट म्हणाला, फायनल खेळणं ही तर आमची भूक!
Ravi Shastri_Virat Kohli
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 7:33 PM
Share

मुंबई : भारतीय क्रिकेट टीम (Indian Cricket Team) आज तीन महिन्यांच्या इंग्लंड दौऱ्यावर (England Tour) रवाना होत आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचा (Team India) कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी मीडियाशी बातचीत केली. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलला पोहोचणे हे 4 ते 6 वर्षांच्या मेहनतीचं फळ आहे, असं कर्णधार विराट कोहली म्हणाला. तर कसोटी फायनल ही एक ऐवजी तीन सामन्यांची हवी होती, असं रवी शास्त्री म्हणाले.

विराट म्हणाला, “WTC फायनलचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. कसोटी खेळणं हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. आम्ही गेल्या 5-6 वर्षात ज्याप्रकारे संघबांधणी केली आहे, त्याचच फळ म्हणजे आम्ही फायनलमध्ये दाखल झालो आहे. फायनलमध्ये खेळण्याची भूक आणि इच्छा होती.”

 इंग्लंडमध्ये टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची (ICC World Test Championship Final) अर्थात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची फायनल खेळणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात 18 जूनपासून कसोटीची फायनल खेळवण्यात येणार आहे.

2019 मध्ये आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप ही स्पर्धा सुरु झाली. या स्पर्धेच्या पॉईंट टेबलममध्ये भारतीय संघ टॉपवर होता. भारताने 17 कसोटी सामने खेळले, यापैकी 12 सामन्यात विजय मिळवला तर 4 सामने गमावले. केवळ एक सामना अनिर्णित राहिला.

दुसरीकडे फायनलला पोहोचलेला न्यूझीलंड संघाने गुणतालिकेत दुसरं स्थान पटकावलं आहे. आता एकमेव कसोटी सामन्यात कोण बाजी मारेल, तो कसोटी क्रिकेटमधील जगज्जेता ठरणार आहे.

WTC Final ड्रॉ झाली किंवा टाय झाली तर…?

18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या साऊथहॅम्प्टन (Southampton) येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात बडा मुकाबला पार पडणार आहे. आयसीसीने अंतिम सामन्यासाठी प्लेईंग कंडिशन जाहीर केल्या आहेत. सामना अनिर्णित किंवा टाय झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेते म्हणून ट्रॉफी देण्यात येईल, असं आयसीसीने जाहीर केलंय. तसंच 23 जून हा राखीव दिवस म्हणून ठेवण्यात आला आहे. पहिल्या पाच दिवसात जर 30 तासांचा खेळ शक्य नसल्यास राखीव दिवसाचा वापर केला जाईल.

भारतीय संघ 

इंग्लंड दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघात सध्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये असणाऱ्याच खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे. कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) या संपूर्ण टीमचे नेतृत्त्व करणार असून कोहलीसह अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), रोहित शर्मा, शुबमन गिल, मयंक अगरवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, रिषभ पंत, आर अश्विन, रविंद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव हेही या दौऱ्यात आहेत.

संबंधित बातम्या  

World Test Championship: न्यूझीलंडविरुद्ध द्रविडची बॅट आग ओकायची, राहुलचे शिष्य किवींना आस्मान दाखवणार?

WTC Final : विराट, पुजारा, रहाणे, पंत नाही तर किवींविरुद्धच्या मागील सिरीजमध्ये या बॅट्समनच्या बॅटमधून सर्वाधिक रन्स!

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.