AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

WTC Final : विराट, पुजारा, रहाणे, पंत नाही तर किवींविरुद्धच्या मागील सिरीजमध्ये या बॅट्समनच्या बॅटमधून सर्वाधिक रन्स!

विराटच्या नेतृत्वाखालील भारताचा हा इंग्लंड दौरा आशा अपेक्षांनी, करोडो स्वप्नांनी भरलेला असेल. त्याचं कारण म्हणजे विराटच्या नेतृत्वाखालील संघाने अजून कोणत्याही फॉरमॅटमधील आयसीसीचा करंडक आणखी जिंकलेला नाही. ((ICC Final 2021 mayank Agarawal)

WTC Final : विराट, पुजारा, रहाणे, पंत नाही तर किवींविरुद्धच्या मागील सिरीजमध्ये या बॅट्समनच्या बॅटमधून सर्वाधिक रन्स!
मयंक अग्रवाल
| Edited By: | Updated on: Jun 02, 2021 | 10:41 AM
Share

मुंबई :  इंग्लंड दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे (India Tour of England). अगदी काही तासांत विराटच्या (Virat kohli) नेतृत्वाखालील संघ इंग्लंडसाठी टेकऑफ करेल. विराटच्या नेतृत्वाखालील भारताचा हा इंग्लंड दौरा आशा अपेक्षांनी, करोडो स्वप्नांनी भरलेला असेल. त्याचं कारण म्हणजे विराटच्या नेतृत्वाखालील संघाने अजून कोणत्याही फॉरमॅटमधील आयसीसीचा (ICC) करंडक आणखी जिंकलेला नाही. आता वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (WTC Final 2021) निमित्ताने विराटला संधी चालून आली आहे. यशपासून केवळ काही पावलं विराट दूर आहे, या गोष्टी झाल्या भविष्यातल्या.. पण न्यूझीलंडविरुद्ध पाठीमागची मालिका भारतासाठी खडतर गेलीय. या दौऱ्यात एकाही स्टार फलंदाजाच्या बॅटमधून रन्स निघाले नाहीत…. विराट, पुजारा, रहाणे, पंत यापैकी कुणाचीच बॅट बोलली नाही, तर ती बोलली युवा खेळाडू मयंक अग्रवाल, त्याचीही बॅट बोलली म्हणता येणार नाही पण त्याने भारतीय फलंदाजांपैकी सर्वाधिक रन्स केले. (ICC Final 2021 mayank Agarawal best batsman Against New Zealand in previous Series)

मयंक अग्रवालच्या बॅटमधून सर्वाधिक धावा

दोन्ही संघांमधील शेवटची कसोटी मालिका न्यूझीलंडच्या भूमीवर पार पडली. दोन सामन्यांच्या कसोटी सामन्यांच्या मालिकेत न्यूझीलंडने पहिला सामना 10 गडी राखून जिंकला आणि दुसर्‍या कसोटीत 7 गडी राखून भारताला पाणी पाजलं. दुखापतीमुळे रोहित शर्मा या मालिकेत खेळू शकला नाही. सलामीवीर मयंक अग्रवालने दोन सामन्यांच्या मालिकेत भारतासाठी सर्वाधिक 102 धावा केल्या. त्याने एका अर्धशतकासह 25.50 च्या सरासरीने 102 धावा केल्या. त्याच्यापाठोपाठ चेतेश्वर पुजारा होता. त्याने अर्धशतकासह 25 च्या सरासरीने 100 धावा केल्या.

पृथ्वी शॉ दोन सामन्यांच्या मालिकेत अर्धशतकासह 24.50 च्या सरासरीने 98 धावा करू शकला. सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांमध्ये रहाणे चौथ्या तर हनुमा विहारी पाचव्या क्रमांकावर होता. रहाणेने 22.75 सरासरीने 91 धावा आणि हनुमाने 21.50 च्या सरासरीने 86 धावा केल्या. अर्धशतकविना रहाणेने 91 धावा काढल्या तर हनुमाने एक अर्धशतक झळकावलं.

दोन कसोटी सामन्यांमध्ये काय झालं होतं??

21 ते 24 फेब्रुवारी दरम्यान वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडने भारताचा 10 गडी राखून पराभव केला. भारतीय संघाने पहिल्या डावात 165 धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडच्या संघाने 348 धावा केल्या. टीम इंडिया दुसर्‍या डावातही चमत्कार करु शकली नाही. न्यूझीलंडने भारताचा दुसरा डाव 191 धावांत गुंडाळला. अशाप्रकारे न्यूझीलंडला विजयासाठी अवघ्या 9 धावांचे लक्ष्य मिळाले, जे त्यांनी एकही विकेट न गमावता पूर्ण केलं.

ख्राईस्टचर्चमध्ये 29 फेब्रुवारी ते 2 मार्च या दरम्यान दोन्ही संघांमध्ये दुसरा कसोटी सामना खेळला गेला. या सामन्यातही भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करत 242 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल न्यूझीलंडचा पहिला डाव 235 धावांवर ऑलआऊट झाला. मात्र टीम इंडियाला दुसर्‍या डावातही चमकदार कामगिरी करण्यात अपयश आलं.भारताचा दुसरा डाव 124 धावांवर आटोपला. न्यूझीलंडला दुसरी कसोटी आणि मालिका जिंकण्यासाठी 132 धावांचे लक्ष्य मिळाले. यजमान संघाने 3 गडी गमावून हे लक्ष्य पार केलं.

(ICC Final 2021 mayank Agarawal best batsman Against New Zealand in previous Series)

हे ही वाचा :

मोठी बातमी : प्रत्येक 2 वर्षानंतर टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, वनडे वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत ICC चा मोठा निर्णय

Virat kohli : विराटच्या अंड्यावरुन ट्विटरवर घमासान, शेवटी चाहते म्हणाले, ‘तू काय पण खा पण RCB ला कप जिंकवून दे!’

WTC Final : रोहित शर्माची जर बॅट चालली तर अंतिम सामन्यात दुहेरी शतक ठोकलंच म्हणून समजा…, पाकिस्तानच्या दिग्गजाची भविष्यवाणी

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.