MS धोनी की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो…

| Updated on: May 29, 2021 | 9:47 AM

महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) की विराट कोहली (Virat kohli), सर्वोत्तम कर्णधार कोण? अशी चर्चा भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये तसंच जगभरातील क्रिकेट रसिकांनामध्ये नेहमीच होत असते. (MS Dhoni is best Captain than Virat kohli Says England michael vaughan)

MS धोनी की विराट कोहली, सर्वोत्तम कर्णधार कोण? इंग्लंडचा माजी कर्णधार म्हणतो...
Virat Kohli And MS Dhoni
Follow us on

मुंबई :  महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) की विराट कोहली (Virat kohli), सर्वोत्तम कर्णधार कोण? अशी चर्चा भारतीय क्रिकेट रसिकांमध्ये तसंच जगभरातील क्रिकेट रसिकांनामध्ये नेहमीच होत असते. हाच प्रश्न इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉन (Michael Vaughan) याला विचारला गेला. त्यावेळी त्याने महेंद्रसिंग धोनी याचं नाव सांगितलं. (MS Dhoni is best Captain than Virat kohli Says England Michael Vaughan)

MS धोनी मार्गदर्शक….

क्रिकेट ट्रॅकर या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत मायकल वॉनने महेंद्रसिंग धोनीला सर्वोत्तम कर्णधार म्हटलं. तो म्हणाला, एम एस धोनी हा मार्गदर्शक आहे. खास करुन एकदिवसीय क्रिकेट आणि टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये त्याने भारताला एक वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेट मध्ये खेळाडूंकडून विशेष खेळ करून घेण्यात एम एस धोनी माहिर आहे. मला वाटतं धोनी मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम कर्णधार आहे, असं मायकल वॉन यांने म्हटलं.

धोनीच्या नेतृत्वाखालील संघाचा विजयरथ

एम एस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने आयसीसी च्या सगळ्या करंडकावर आपला हक्क सांगितला. ज्यामध्ये 2007 साली खेळलेला टी ट्वेन्टी वर्ल्ड कप, 2011 साली खेळलेला एकदिवसीय वर्ल्ड कप, 2013 साठी खेळलेली आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी तसंच आयसीसी टेस्ट गदा या सगळ्या स्पर्धांचा समावेश आहे. या चारही स्पर्धांमध्ये एम एस धोनीचे लाजवाब नेतृत्व भारतीय संघाच्या विजयाला कारणीभूत ठरलं, असं वॉन म्हणाला.

विराट कोहली नेतृत्वगुणसंपन्न

विराट कोहलीमध्ये देखील चांगले नेतृत्व संपन्न गुण आहेत. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सर्वाधिक टेस्ट विजय मिळवले आहेत. त्याच्याच कॅप्टन्सीखालील भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला नमवलं. तसेच आयसीसीच्या वर्ल्ड चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धडक मारली, असंही सांगायला मायकल वॉन विसरला नाही.

भारताचा इंग्लंड दौरा

भारतीय संघ 2 जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. कोहलीच्या नेतृत्वाखालील टीम इंडिया सध्या मुंबईत क्वारंन्टाईन आहे. 14 दिवसांपासून क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर 24 सदस्यीय भारतीय संघ 2 तारखेला इंग्लंडसाठी प्रयान करेल. न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा (WTC 2021) अंतिम सामना आणि इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिका भारताला इंग्लंड दौऱ्यात खेळायची आहे.

(MS Dhoni is best Captain than Virat kohli Says England Michael Vaughan)

हे ही वाचा :

भारत-इंग्लंड मालिकेत ‘हा’ खेळाडू सर्वांत जास्त रन्स करणार, इंग्लंडच्या दिग्गजाची आणखी एक भविष्यवाणी!

KKR चा फलंदाज राहुल त्रिपाठीवर पुणे पोलिसांची कारवाई, दंडही ठोठावला!

भारत विराट कोहलीपेक्षा जास्त रवी शास्त्रींची टीम, इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं वक्तव्य