2022 फॉर्म्यूला रीजनल एशियन चॅम्पियनशिपमध्ये मुंबई फाल्कन्सची धमाकेदार सुरुवात

2022 फॉर्म्यूला रीजनल एशियन चॅम्पियनशिपमध्ये मुंबई फाल्कन्सची धमाकेदार सुरुवात
Mumbai-Falcons

मुंबई फाल्कन्सने येस मरीना सर्किटमध्ये 2022 फॉर्म्यूला रीजनल एशियन चॅम्पियनशिपमध्ये एक विजय आणि दोन पोडियम मिशनसह दमदार सुरुवात केली आहे. एफआयएच्या F3 श्रेणीचा इव्हेंट अबुधाबीमध्ये तीन रेससह पार पडला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Jan 25, 2022 | 12:19 AM

मुंबई : मुंबई फाल्कन्सने येस मरीना सर्किटमध्ये 2022 फॉर्म्यूला रीजनल एशियन चॅम्पियनशिपमध्ये एक विजय आणि दोन पोडियम मिशनसह दमदार सुरुवात केली आहे. एफआयएच्या F3 श्रेणीचा इव्हेंट अबुधाबीमध्ये तीन रेससह पार पडला. 7 टीमपैकी एक मुंबई फाल्कन्सने मोंटे कार्लोच्या आर्थर लेकलर (Arthur Leclerc), स्वीडनच्या डीनो बेगानोविक (Dino Beganovic) आणि युवा कोलंबियन सबेस्टियन मॉन्टोयाची (Sebastian Montoya) एका मजबूत टीम उतरवली.

रेस 1

Mumbai-Falcons-1

Mumbai-Falcons

फॉ्म्यूर्ला वनचे ड्रायव्हर आणि कई इंडी 500 चे विजेता प्लॅबो मॉन्टोया यांचा मुलगा सबेस्टियन मॉन्टोया यांनी आपल्या जीवनातील पहिल्या रेसमध्ये पोल पोझिशन मिळवली. तेही इसाक हदजर आणि पॉल अरॉन अशा दिग्गजांना टक्कर देत त्यांनी ही कामगिरी केली आहे. त्यांच्या टीमचे ड्रायव्हर आर्थर आणि डीनो यांनी टॉप सहा मध्ये जागा बनवली. मॉन्टोया ने जोरदार सुरुवात करत सुरुवातीपासूनच रेसमध्ये पुढे राहिले. दोन सेफ्टी कार पिरेडनंतरही त्यांनी दोन वेगवान लॅप्स घेत दुसऱ्या स्पर्धकांना मागे सोडलं. शेवटच्या टप्प्यात थर्ड स्टोपेजनंतर सेफ्टी कारनुसार रेस संपली आणि मॉन्टोया यांना आपल्या जीवनातील पहिल्या एफआरएसी रेसचा विजेता घोषित करण्यात आलं.

लेक्लरने मिळवला पोडियम फिनिश

फेरारी फॉर्म्यूला वन स्टार चार्ल्स लेक्लरचा छोटा भाऊ आर्थर लेक्लरने ग्रिडवर पाचव्या स्थानापासून सुरुवात केल्यानंतर पोडियम फिनिश (P3) मिळवला. एकवेळ असं वाटत होतं की तो पोडियम फिनिशन (P2) मिळवेल. मात्र, हायटेक ग्रां पी ड्रायव्हर गॅबरिले मिनीने आक्रमकतेनं युवा मॉनेको ड्रायव्हरला ओव्हरटेक करत दुसरं स्थान मिळवलं. डीनो बोगानोविक ग्रिडवर सातव्या स्थानावरुन सुरुवात करत पाचव्या स्पॉटला पोहोचला.

रेस 2

रिव्हर्स ग्रिड नियमानुसार फाल्कन ने ड्रायव्हर मॉन्टोयाला दहाव्या, लोक्लरला आठव्या आणि बेगानोविकला सहाव्या स्थानावरुन सुरुवात करावी लागली. तिघांनीही कार इतक्या वेगाने चालवली की ते मिडलवरन फ्रंट वर आले. खासकरुन लेक्लरने जोरदार ड्रायव्हिंग केली आणि तो पोडियम पोझिशनचा दावेदार मानला जाऊ लागला.

मिडल पॅकवर चांगलं प्रदर्शन केल्यानंतरही डीनोला नशिबाने साथ दिली नाही आणि त्याची कार बाहेरुन ओव्हरटेक करताना गॅबरिले मिनीच्या कारला धडकली. टकरीनंतर दोन्ही ड्रायव्हरला रेसच्या बाहेर करण्यात आलं. दरम्यान, मॉन्टोयाने जोरदार प्रदर्शन केलं आणि शेवटच्या टप्प्यात एकाच झटक्यात दोन्ही कारला मागे टाकत चौथ्या स्पॉटवर पोहोचला. कोलंबियन रेसर पोडियम पोझिशन मिळवण्यापासून चुकले असले तरी पहिल्याच रेलमध्ये पी 10 वरुन पी 4 पर्यंत पोहोचणं असाधारण मानलं जातं. आस-एस जीपी ने गॅब्रियल बोर्तोलेटो सीझनच्या सुरुवातीची दुसरी रेस जिंकली. त्याचे टीममेट लोरेंजो प्लक्सा आणि आर्थर लेक्लर त्याच्या मागे राहिले.

Mumbai-Falcons

Mumbai-Falcons

रेस 3

अबुधाबीमध्ये रेसिंग ड्रायव्हर आमना अल कुबैसी आणि इवेंस जीपी रेसर सेम बोलुकबासी यांनी गाड्यांची टक्कर झाल्यामुळे काही वेळासाठी रेस थांबवण्यात आली. या रेड प्लॅग घटनेमुळे काही प्रमाणात फाल्कन ड्राव्हरच्या वेगावर नियंत्रण आणलं. मात्र सर्व अडचणींनंतरही लेक्लरने किमया करत फ्रंट पॅकमध्ये आला.

Mumbai-Falcons

Mumbai-Falcons

दरम्यान, रेसमध्ये काही वेळासाठी दिसून आलेली त्याची दमदार कामगिरी पोडियम पोझिशन मिळवण्यात मात्र सफल होऊ शकली नाही आणि मोनेकोचा ड्रायव्हर चॅम्पियनशिपमध्ये काही महत्वपूर्ण अंक मिळवत पी 5 वर आला. या दरम्यान मॉन्टोया आणि बेगानोविक क्रमश: दहाव्या आणि अकराव्या स्थानावर राहिले.

सोहिश शाहने फॉर्म्यूला 4 मध्ये प्रभावित केलं

या दरम्यान 20 जानेवारीला यस मरीना सेर्किटमध्ये फॉर्म्यूला 4 सीरिजने एका नव्या भारतीय रेसिंग सुपरस्टारला जन्म दिला. सोहिल मागील काही काळापासून चर्चेतील युवा ड्रायव्हरपैकी एक आहे. मात्र, फॉर्म्यूला 4 यूएई सिरीजमध्ये त्याने आपली दमदार कामगिरी दाखवून दिली. एफ 1 ड्रायव्हर बनण्याचं स्वप्न उराशी बाळगणाऱ्या सर्वश्रेष्ठ 27 जुनियर स्पर्धांमध्ये मुंबई फाल्कनच्या युवा ड्रायव्हरने वेग दाखवत रेस 1 आणि रेस 2 मध्ये पाचवं स्थान मिळवलं. मात्र, बंगळुरूचा हा युवा ड्रायव्हर टर्न वन मध्ये वाइड झाला.

मुंबई फाल्कनच्या युवा ड्रायव्हरने मोठ्या हिमतीनं मुकाबला केला आणि रेड प्लॅगने भरलेल्या रेसमध्ये 10 वं स्थान मिळवलं. रेस 2 मध्ये ट्रॅकवर चूक केल्यानंतर शाहला डिमोट करुन पी8 वर पाठवण्यात आलं. तो फ्रंट आणि मिडल पॅकच्या मागे 10 व्या स्थानावर पोहोचला. सहाव्या स्थानावर पोहोचण्यासाठी बंगळुरूच्या ड्रायव्हरनने शानदार ओव्हरटेकींग केलं. मात्र पुन्हा एकदा पिटलेन उल्लंघन केल्यामुळे त्याला दंड मिळाला आणि दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

sohil-shah

sohil-shah

रेस 3 मे शाह ने पी 15 वर फिनिश केलं. तो 10 व्या स्थानापर्यंत पोहोचला मात्र सुरुवातीच्या घटनेनंतर 25 व्या स्थानी पोहोचला. एका सन्मानजनक स्थानी आल्यावर या युवा रेसरच्या ओव्हरटेकिंग क्षमतेचं पुन्हा एकदा प्रदर्शन झालं. चौथा आणि शेवटचा टप्पा शाहसाठी दुर्दैवी ठरवा आणि शेवटच्या स्टेजवर चूक केल्यामुळे त्याला वेळेपूर्वी रिटायरमेंट घ्यावी लागली. मुंबई फाल्कन्सचे सीईओ मोईद तुंगेकर सीझनच्या सुरुवातीला टीमच्या प्रदर्शनामुळे चांगेलच आनंदी झाल्याचं पाहायला मिळालं. “अनेक यांत्रिक अडचणींचा सामना करत निश्चितपणे एक चांगली सुरुवात झाली. आम्ही फॉर्म्यूला 4 साठी फॉर्म्यूला रिजनल अॅन्ड एक्ससीइएल मोटरस्पोर्टससाठी प्रेमाला धन्यवाद देऊ. आम्हाला आशा आहे की पुढे येणाऱ्या रेसमध्ये आम्ही अधिक यश मिळवू”, असं ते म्हणाले. 2022 फॉर्म्यूला रीजनल चॅम्पियनशिप आता जास्त दूर नाही. 29 आणि 30 जानेवारीला दुबई ऑटोड्रॉममध्ये पुढील तीन रेस होतील.

इतर बातम्या :

Video : डेव्हिड वॉर्नरच्या मुलींचा अल्लु अर्जुनच्या गाण्यावर भन्नाट डान्स, कमेंट करत अल्लु अर्जुन म्हणाला…

ICC Women’s Cricketer 2021: विराट-रोहितला जमलं नाही ते सांगलीच्या स्मृती मानधनाने करुन दाखवलं

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें