IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या विजेतेपदासाठी सज्ज, फायनलमध्ये कुणाशी भिडणार?

| Updated on: Nov 06, 2020 | 12:52 PM

मुंबईच्या टीमसमोर आता आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकवण्याचे लक्ष असेल. मात्र, दिल्लीकडे फायनलमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी उपलब्ध आहे. (Mumbai Indians reach to final of IPL 2020 after defeating Delhi Capitals)

IPL 2020 : मुंबई इंडियन्स पाचव्या विजेतेपदासाठी सज्ज, फायनलमध्ये कुणाशी भिडणार?
Follow us on

दुबई : आयपीएलच्या (IPL2020) पहिल्या क्वालिफायर मॅचमध्ये मुंबई इंडियन्सनं (Mumbai Indians) दिल्ली कॅपिटल्सचा (Delhi Capitals) 57 धावांनी पराभव करत अंतिम सामन्यातील स्थान पक्क केलं. मुंबई या विजयामुळं सहाव्यांदा आयीपएलच्या फायनलमध्ये पोहोचली आहे. मुंबईसमोर आता आयपीएलचे पाचवे विजेतेपद पटकवण्याचे लक्ष असेल. मात्र, दिल्ली कॅपिटल्सचं स्पर्धेतील आव्हान अजून संपलेले नाही, त्यांच्याकडे फायनलमध्ये पोहोचण्याची अजून एक संधी उपलब्ध आहे. (Mumbai Indians reach to final of IPL 2020 after defeating Delhi Capitals)

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा आश्विनच्या गोलंदाजीवर शुन्यावर बाद झाला. दुसऱ्या स्थानावर आलेल्या सूर्यकुमार यादव आणि क्विंटन डी कॉक यांनी मुंबईचा डाव सावरला. दोन्ही फलंदाजांनी दिल्लीच्या गोलंदाजांची धुलाई करत 77 धावांची भागिदारी केली. डी कॉकनं 25 चेंडूत 40 धावा केल्या. त्यापाठोपाठ सूर्यकुमार यादव 38 चेंडूत 6 षटकार आणि 2 चौकार लगावत 51 धावा केल्या. सूर्यकुमार यादव नंतर आलेल्या केरॉन पोलार्ड मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. आश्विन च्या गोलंदाजीवर केरॉन पोलार्डचा रबाडाने कॅच घेतला.

एका बाजूने मुंबईच्या विकेट जात असल्यातरी मुंबईची धावसंख्या वाढत होती. इशान किशन जोरदार फलंदाजी करत होता. कुणाल पांड्याच्या रुपात मुंबईला पाचवा धक्का बसला. कुणाल पांड्यानं 13 धावा केल्या. इशान किशन आणि हार्दिक पांड्या यांनी अखेरच्या 4 षटकांमध्ये जोरदार फटकेबाजी केली. मुंबईच्या फलंदाजांनी अखेरच्या 23 चेंडूमध्ये 60 धावा केल्या. इशान किशनच्या 30 चेंडूतील 4 चौकार आणि 3 षटकाराच्या 55 धावा आणि हार्दिक पांड्याच्या 14 चेंडूतील 37 धावांच्या खेळीमुळं मुंबईच्या 20 ओव्हरमध्ये 200 धावा झाल्या. हार्दिक पांड्यानं 5 षटकार खेचत 37 धावा केल्यामुळं मुंबईला 200 धावांचा टप्पा गाठता आला.

दिल्लीच्या गोलंदाजांची मुंबईच्या फलंदाजांनी जोरदार धुलाई केली. रबाडा, नॉर्किया आणि सॅम्स या तिघांनी 10 च्या सरासरीनं धावा केल्या. नॉर्कियानं 4 ओव्हरमध्ये 50, सॅम्सनं 4 ओव्हरमध्ये 44 धावा दिल्या.

दिल्लीची खराब सुरुवात

अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी 201 धावांचं आव्हान घेऊन उतरलेल्या दिल्लीच्या फलदांजांनी हाराकिरी केली. दिल्लीचे पहिले तीन फलंदाज शुन्यावर बाद झाले. यामध्ये पृथ्वी शॉ, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांचा समावेश होता. यानंतर दिल्लीचा डाव सावरेल असं वाटत असतानाच श्रेयस अय्यर 12 धावा करुन बाद झाला. यानंतर आलेला रिषभ पंतही चांगली कामगिरी करु शकला नाही तो 3 धावा करुन कुणाल पांड्याच्या गोलंदाजीवर बाद धाला. 41 धावसंख्येवर दिल्लीचा अर्धा संघ माघारी परतला होता.

दिल्लीचा निम्मा संघ माघारी परतला तरी स्टॉइनिस आणि अक्षर पटेल यांनी जोरदार फलंदाची करत 71 धावांची भागिदारी केली. मुंबईसाठी घातक ठरणारी भागिदारी बुमराह यानं स्टॉइनिसला बाद करुन तोडली. स्टॉइनिस यानं 65 धावांची खेळी केली. यानंतर डॅनियल सॅम्स शुन्यावर बाद झाला. अखेरच्या षटकात अक्षर पटेल 42 धावांवर बाद झाला. 20 ओव्हरमध्ये दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 8 बाद 143 धावा करता आल्या यासह मुंबईनं 57 धावांनी विजय मिळवला.

दिल्लीला पराभूत करुन मुंबई इंडियन्स सहाव्यांदा फायनलमध्ये पोहोचली आहे. दिल्लीचे चार फलंदाज बाद करणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले. मुंबईनं अंतिम सामन्यात स्थान पक्क केले आहे. तर दिल्ली कॅपिटल्सला फायनलमध्ये जाण्याची अजून एक संधी आहे. एलिमिनेटर सामन्यात बंगळुरू आणि हैदराबाद यांच्यामध्ये जो संघ विजयी होईल त्यांची लढत दिल्लीसोबत होईल. त्यानंतर क्वालिफायर 2 मध्ये दिल्लीला विजय मिळवून फायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, Qualifier 1, MI vs DC : जसप्रीत बुमराहची कमाल, दिल्लीवर 57 धावांनी मात, मुंबईची सहाव्यांदा फायनलमध्ये धडक

IPL 2020, MI vs DC, Qualifier 1 : हिटमॅन रोहित शर्माची निराशाजनक कामगिरी, खराब विक्रमाची नोंद

(Mumbai Indians reach to final of IPL 2020 after defeating Delhi Capitals)