मुंबईच्या संघात मोठा उलटफेर, थेट कर्णधारच बदलला, नवीन कॅप्टन कोण? रोहित शर्माशी खास संबंध
मुंबईच्या संघात मोठे बदल पाहायला मिळत आहे. आता संघाचा कर्णधारच बदलण्यात आला आहे. तर संघातून लॉर्ड शार्दुल ठाकूरलाही संघातून डच्चू देण्यात आला आहे.

रणजी ट्रॉफीच्या इतिहासात सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबईने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईने सर्वाधिक 42 वेळा रणजी ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले आहे. इतर कोणत्याही राज्याच्या किंवा असोसिएशनच्या संघाला मुंबईच्या या विक्रमाच्या आसपासही आतापर्यंत पोहोचता आलेले नाही.

आता आगामी सिझनसाठी मुंबईने मोठा निर्णय घेतला आहे. आगामी रणजी ट्रॉफीसाठी मुंबई क्रिकेट असोशिएशनने थेट कर्णधारच बदलला आहे. मागील वर्षीही मुंबईने कर्णधार बदलला होता. मागील वर्षी अजिंक्य राहणे यांच्याकडून ही जबाबदारी काढून घेऊन ती शार्दुल ठाकुरला देण्यात आली होती.

शार्दुल ठाकूर याला धक्का देत एकही इंटरनॅशनल मॅच न खेळणाऱ्या खेळाडूला म्हणजे सिद्धेश लाडलाही जबाबदारी दिली आहे. सलग दुसऱ्या रणजी ट्रॉफी हंगामासाठी मुंबईला नवा कर्णधार मिळणार असून अनुभवी खेळाडू सिद्धेश लाड याला आगामी हंगामासाठी कॅप्टन म्हणून नियुक्त केले आहे.

मुंबई क्रिकेटने निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही खेळाडूंशी सल्लामसलत करण्यात आली होती, असेही पवार यांनी सांगितलं आहे. सिद्धेश लाड हा रोहित शर्माचे कोच दिनेश लाड यांचा मुलगा आहे.