Asia Cup 2022 : फायनल जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स, व्हिडीओ व्हायरल

आशिया चषकात अंतिम सामने अगदी अटीतटीचे झाले. दोन्ही खेळांडूमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. खूप वर्षांनी भारत आणि पाकिस्तान आमने सामने असल्याने प्रेक्षकांनी सामन्यांचा आनंद लुटला.

Asia Cup 2022 : फायनल जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स, व्हिडीओ व्हायरल
फायनल जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंचा नागिन डान्स, व्हिडीओ व्हायरल
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 12, 2022 | 3:17 PM

आशिया चषक (Asia Cup 2022) जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या (Shrilanka) खेळाडूंनी मोठा उत्साह साजरा केला. सुरुवातीला पाकिस्तान (Pakistan) एक हाती सामना जिंकेल अशी स्थिती असताना सुध्दा, गोलंदाजांनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे श्रीलंकेने सामना जिंकला. कालची फायनल मॅच पाहायला अधिक प्रेक्षक मैदानात आले होते.

आशिया चषक जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी मैदानात सुरुवातीला जल्लोष केला. त्यानंतर ड्रेसिंग रुमध्ये नागिन डान्स केला आहे. काही ड्रेसिंगरुममधील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. श्रीलंका टीमच्या चाहत्यांना डान्स व्हिडीओ अधिक आवडल्याचे त्यांनी कमेंटमध्ये सांगितले आहे. अनेकदा एखादा चषक जिंकल्यानंतर खेळाडू आपला उत्साह जोरात साजरा करतात. परंतु सध्या नागिन डान्स करण्याच फॅड अधिक आहे.

आशिया चषकात अंतिम सामने अगदी अटीतटीचे झाले. दोन्ही खेळांडूमध्ये संघर्ष पाहायला मिळाला. खूप वर्षांनी भारत आणि पाकिस्तान आमने सामने असल्याने प्रेक्षकांनी सामन्यांचा आनंद लुटला.

शादाब खान याने कालच्या सामन्यात गच्चाळ फिल्डींग केल्यामुळे त्याने त्यांच्या चाहत्यांची माफी मागितली आहे. त्याचबरोबर संघातील इतर खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. परंतु माझ्याकडून झालेल्या चुकांमुळे संघाचा पराभव झाला असंही तो म्हणाला आहे.