Corporate Cup | News 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल टुर्नामेंटला शुक्रवारपासून सुरुवात

| Updated on: May 05, 2023 | 5:15 PM

Corporate Cup : भारतात फुटबॉल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. लवकरच जागतिक पटलावर फुटबॉलमध्ये भारताने आपला ठसा उमटवलेला पहायला मिळेल.

Corporate Cup | News 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल टुर्नामेंटला शुक्रवारपासून सुरुवात
Zabardast zenith vs zs associate
Follow us on

पुणे : फुटबॉलचा जगातील लोकप्रिय खेळामध्ये समावेश होतो. अबालवृद्धांमध्ये फुटबॉल विशेष लोकप्रिय आहे. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतात क्रिकेट लोकप्रिय आहे. पण म्हणून फुटबॉल मागे नाहीय. भारतात फुटबॉलही तितकच लोकप्रिय आहे. भारतात दिवसेंदिवस फुटबॉल बद्दलची क्रेझ वाढत चाललीय. भारतात फुटबॉल पाहणाऱ्या प्रेक्षकांची संख्या मोठी आहे. लवकरच जागतिक पटलावर फुटबॉलमध्ये भारताने आपला ठसा उमटवलेला पहायला मिळेल.

भारतातील फुटबॉलची हीच वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन न्यूज 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेच आयोजन करण्यात आलं आहे. पुणे बालेवाडी क्रीडा नगरीमध्ये आजपासून न्यूज 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेला सुरुवात झालीय. भारतात शालेय स्तरावर फुटबॉल लोकप्रिय आहेच. पण कॉर्पोरेट विश्वातही फुटबॉलबद्दल तितकच आकर्षण, क्रेझ आहे.

कॉर्पोरेटमध्ये फुटबॉलची क्रेझ

कॉर्पोरेटमध्ये काम करणारे अनेकजण वेळात वेळ काढून फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटतात. कॉर्पोरेटमध्ये प्रोफेशनल स्तरावर फुटबॉल खेळणाऱ्यांची संख्या कमी नाहीय. त्यांच्या याच कौशल्याला न्यूज 9 कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेने वाट मोकळी करुन दिली.

कॉर्पोरेट कपमध्ये किती टीम्स?

6-A साइड टुर्नामेंट असं कॉर्पोरेट कपच स्वरुप असणार आहे. 3 दिवस ही स्पर्धा चालेलं. एकूण 26 टीम्स कॉर्पोरेट कप फुटबॉल स्पर्धेत सहभागी होतील. एकूण 8 ग्रुप असतील. दोन ठिकाणी एकाचवेळी 4 मैदानात ही स्पर्धा पार पडणार आहे. चांगल्या, चांगल्या कॉर्पोरेट टीम्स या स्पर्धेत सहभागी झाल्या आहेत.