FIFA WC 2022: मॅचआधीच ब्राझीलच्या ‘या’ स्टार प्लेयरच्या एक्स-गर्लफ्रेंडने समुद्रात लावली आग

ब्राझीलच्या मॅचआधी तिच्याच फोटोंची चर्चा

FIFA WC 2022: मॅचआधीच ब्राझीलच्या या स्टार प्लेयरच्या एक्स-गर्लफ्रेंडने समुद्रात लावली आग
bruna biancardi
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 24, 2022 | 2:47 PM

दोहा: FIFA वर्ल्ड कप 2022 मध्ये ब्राझीलची टीम सर्बिया विरुद्ध आपला पहिला सामना खेळणार आहे. ग्रुप जी चा हा सामना भारतीय वेळेनुसार, रात्री 12.30 वाजता सुरु होईल. या मॅचमध्ये टीमला आपला स्टार खेळाडू नेमारकडून भरपूर अपेक्षा आहेत. नेमार या मॅचमध्ये खेळण्याआधी सोशल मीडियावर त्याच्या एक्स-गर्लफ्रेंडचीच चर्चा आहे. ब्रूना बियानकार्डी त्याच्या एक्स गर्लफ्रेंडच नाव आहे.

टीमच्या जर्सीच्या रंगाची बिकिनी

ब्रूना बियानकार्डीने गुरुवारी इन्स्टाग्रामवर आपले फोटो पोस्ट केलेत. समुद्रात पोहण्यासाठी उतरण्याच्या तयारीत असल्याचे तिचे हे फोटो आहेत. बियानकार्डीने ब्राझील फुटबॉल टीमच्या जर्सीच्या रंगाची बिकिनी घातली आहे.

सध्या ती आहे कुठे?

ब्रूना सध्या मालदीवमध्ये आहे. तिथे ती सुटट्यांचा आनंद घेतेय. ब्राझीलच्या या मॉडेलने तीन दिवसांपूर्वी सुद्धा एक फोटो शेयर केला होता. सोशल मीडियावर हे फोटो व्हायरल झालेत.

ब्रेकअप कधी झालं?

ब्रूना आणि नेमारचा यावर्षी ऑगस्ट महिन्यात ब्रेकअप झालं. दोघे एक वर्ष सोबत होते. त्यानंतर दोघांचे मार्ग वेगळे झाले. ब्रून मॉडेल आहेच, पण त्या बरोबर ती सोशल मीडिया इन्फल्यून्सर सुद्धा आहे. तिची मोठी फॅन फॉलोइंग आहे. तिच्याकडे फॅशन बिजनेसची डिग्री आहे. डिजिटल मार्केटिंग आणि ई-कॉमर्समध्ये तिने शिक्षण घेतलं आहे.