कोणत्या रोबोटपेक्षा कमी नाहीत Nike चा ‘हा’ शूज… पायानुसार बदलेल आकार

Nike ने Adapt BB नावाचा शूज लाँच केला आहे. हा एक प्रकारचा ‘बास्केटबॉल’ शू आहे. त्याच्या लेस स्वतः घट्ट किंवा सैल होतात, शिवाय यात ब्लुटूथदेखील देण्यात आलेली आहे. या लेखातून या शुजबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

कोणत्या रोबोटपेक्षा कमी नाहीत Nike चा ‘हा’ शूज... पायानुसार बदलेल आकार
file photo
Image Credit source: nike.com
| Updated on: May 07, 2022 | 6:03 PM

शूज मार्केटमध्ये नाईके (Nike) च्या शुजची लोकप्रियता आपण सर्वांनाच माहिती आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार Nike आपल्या शुजच्या पॅटर्नमध्येही अनेक बदल केले आहेत. Nike कडून नुकतेच नवीन शूज लाँच करण्यात आले आहेत. परंतु हे काही साधे शूज नाहीत तर एक प्रकारे रोबोटीक शूज आहेत. अशा शुजबाबत आपण आजपर्यंत केवळ कल्पनाच (Imagination) केलेली असेल. परंतु आज हे शूज आपल्याला प्रत्यक्ष घालता येणार आहेत. हे शूज नीट कंफर्टेबल झाल्यावर पूर्णत: ऑटोमॅटीक (Automatic) पध्दतीने काम करणार आहेत. पूर्णपणे स्वयंचलित होणार असून, हे शूज तुम्ही फक्त एका अॅपद्वारे नियंत्रित करू शकता. या शूजमध्ये अनेक वैशिष्ट्ये आहेत जी तुम्हाला कोणत्याही सामान्य शूजमध्ये पाहायला मिळत नाहीत.

Nike ने Adapt BB नावाचे शूज लाँच केले आहेत. हे एक प्रकारचे ‘बास्केटबॉल’ शूज आहेत. त्याच्या लेस स्वतः घट्ट किंवा सैल होतात. जर तुम्ही हे शूज तुमच्या पायात घातले तर ते पायानुसार आपोआप घट्ट होतील, असा कंपनीचा दावा आहे. कंपनीचे म्हणणे आहे, की हे शूज बनवताना त्यांना बास्केटबॉल खेळाडूंना अनुसरुन तयार करण्यात आले आहे.

रक्तदाबही तपासता येतो

हे शूज घातल्यानंतर, जर तुम्ही खूप चालत असाल आणि पायाला सूज आली असेल तर ते तुमच्या शरीराच्या रक्तदाबानुसार स्वतःमध्ये बदल करतील. म्हणजेच जेव्हा गरज असेल तेव्हा हे शूज स्वतःच सैल होतील. याचा फायदा असा की तुम्हाला दिवसभर शूज घट्ट किंवा सैल करावे लागणार नाहीत. तुम्ही हे शूज केवळ अॅपद्वारे पूर्णपणे नियंत्रित करू शकता. म्हणजेच शुजवरून तुम्हाला नक्की काय हवे आहे हे कळेल.

Adapt BB हे शूज आहेत जे बनवताना कंपनीने इतर गोष्टींची काळजी घेतली आहे. Nike ने आधीच Nike + iPod आणि Nike + Training लाँच केले आहे. लोकांना हे शूज खूप आवडले असून आता लोकांनाही हा शुजदेखील आवडेल अशी कंपनीला आशा आहे. सध्या कंपनीने हे शूज भारतात लाँच करण्याची तारीख जाहीर केलेली नसली तरी Nike बुटाचे चाहते आता या शुजचीही खूप आतुरतेने वाट पाहत आहेत, हे नक्की.