Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताच्या 655 एथलीट्सचा समावेश, जाणून घ्या वेळापत्रक आणि स्पर्धा

Asian Games 2023 : एशियन गेम्स 2023 स्पर्धेला दिमाखात सुरुवात झाली आहे. भारताच्या एकूण 655 खेळाडूंना सहभाग घेतला. यात 328 महिला आणि 325 खेळाडूंचा समावेश आहे.

Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताच्या 655 एथलीट्सचा समावेश, जाणून घ्या वेळापत्रक आणि स्पर्धा
Asian Games 2023 : एशियन गेम्समध्ये भारताच्या 655 एथलीट्सचा समावेश आणि स्पर्धा, असं आहे शेड्यूल
Follow us
| Updated on: Sep 20, 2023 | 3:31 PM

मुंबई : एशियन गेम्स 2023 स्पर्धेला चीनच्या हांगझू येथे सुरुवात झाली आहे. ही स्पर्धा 7 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे. 8 ऑक्टोबरला क्लोजिंग सेरेमनी असणार आहे. खरं तर या स्पर्धेचं आयोजन गेल्या वर्षी होणार होतं. मात्र कोरोना संकटामुळे आयोजन रद्द करण्यात आलं होतं. त्यामुळे यंदा 19 व्या पर्वाचं आयोजन करण्यात आलं आहे. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा 23 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. पण क्रिकेट, फुटबॉल, वॉलिबॉल आणि बीच वॉलिबॉल स्पर्धेला 19 सप्टेंबरपासून सुरुवात झाली आहे. पुढच्या 15 दिवसात 41 स्पर्धा पार पडणार आहेत. भारताकडून 655 खेळाडूंनी विविध स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. यात 328 महिला आणि 325 पुरुष खेळाडूंचा समावेश आहे. वॉलिबॉल पुरुष गट भारत विरुद्ध कंबोडिया यांच्यात पार पडला. या सामना 3-0 ने जिंकत भारताने विजयी सलामी दिली. दुसरीकडे फुटबॉलमध्ये भारतीय संघाला चीनने 5-1 ने मात दिली. आता 20 सप्टेंबरपासून पुढच्या स्पर्धा कशा असतील याबाबत जाणून घ्या..

भारताचं एशियन गेम्स 2023 मधलं संपूर्ण वेळापत्रक

 • आर्चरी : 1 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा 10 गटात होणार आहेत. तसेच 16 खेळाडू भाग घेणार आहेत. धीरज बोम्मदेवरा, अतनु दास, तुषार शेल्के, मृणाल चौहान, अभिषेक वर्मा, ओजस देवताले, रजत चौहान, प्रथमेश जावकर, प्राची सिंह, अंकिता भकत, भजन कौर, सिमरनजीत कौर, अवनीत कौर, ज्योति सुरेखा वेन्नम, अदिति स्वामी, परनीत कौर हे स्पर्धक आहेत.
 • एथलेटिक्स : ही स्पर्धा 29 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान असणार आहे. ही स्पर्धा 48 गटात होणार आहेत आणि 28 खेळाडू सहभागी होणार आहेत.
 • बॅडमिंटन : ही स्पर्धा 28 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा 7 गटात होणार असून 19 खेळाडू सहभागी झाले आहेत. एचएस प्रणॉय, किदांबी श्रीकांत, पीवी सिंधु, अश्मिता चालिहा, सात्विक/चिराग, ध्रुव/अर्जुन, गायत्री/ट्रीसा, तनीषा/अश्विनी, साई प्रतीक/तनिषा, रोहन/सिक्की हे खेळाडू आहेत.
 • बास्केटबॉल (5×5) : ही स्पर्धा 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. यात दोन गट असून 12 खेळाडू असणार आहेत.
 • बास्केटबॉल (3×3) : ही स्पर्धा 25 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान होणार आहे. ही स्पर्धा दोन गटात पार पडेल आणि 8 खेळाडू असणार आहेत.
 • बॉक्सिंग : 24 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. 13 गटात ही स्पर्धा असणार आहे. यात एकूण 12 खेळाडूंनी सहभाग घेतला आहे.
 • ब्रिज : 27 सप्टेंबर ते 7 6 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात 3 गट असून 18 खेळाडू सहभागी होणार आहेत.
 • क्रिकेट : 19 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडेल. यात पुरुष आणि महिला असे 2 गट असून भारताच्या 30 खेळाडूंचा समावेश आहे.
 • बुद्धिबळ : 24 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. एकूण 4 गटात ही स्पर्धा पार पडणार असून 10 खेळाडूंनी सहभाग घेतला.
 • कॅनोई स्लॅलोम : 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. ही स्पर्धा 4 गटात पार पडणार आहे. यात भारताच्या 4 खेळाडूंचा समावेश आहे.
 • कॅनोई स्प्रिंट : 30 सप्टेंबर ते 3 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 12 गट असून 13 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • सायक्लिंग ट्रॅक : 26 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 12 गट असून 14 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • डायविंग : 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 10 गट असून 2 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • घोडस्वारी: 26 सप्टेंबर ते 6 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 6 गट असून 10 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • ईस्पोर्ट्स: 24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 7 गट असून 15 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • फुटबॉल: 19 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 2 गट असून 44 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • फेंसिंग: 24 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 12 गट असून 9 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • गोल्फ: 28 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 4 गट असून 7 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • हॉकी: 24 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 2 गट असून 36 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • हँडबॉल: 24 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 2 गट असून 16 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • जुडो: 24 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 15 गट असून 4 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • जू जिस्तू: 5 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 8 गट असून 11 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • कबड्डी: 2 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 2 गट असून 24 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • कुराश: 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 7 गट असून 6 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • मॉडर्न पेंटाथलॉन: 20 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 2 गट असून 12 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • रग्बी सेवेंस: 24 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 2 गट असून 12 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • रोइंग: 20 सप्टेंबर ते 25 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 14 गट असून 33 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • रोलर स्केटिंग: 20 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 10 गट असून 33 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • सेलिंग: 21 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 10 गट असून 33 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • सेपक: टकरा 24 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 6 गट असून 16 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • शूटिंग: 24 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 33 गट असून 33 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • स्क्वाश: 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 5 गट असून 8 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • सॉफ्ट टेनिस: 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 5 गट असून 10 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • स्विमिंग: 24 सप्टेंबर ते 29 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 41 गट असून 21 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • स्पोर्ट्स क्लायबिंग: 3 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 6 गट असून 7 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • टेनिस: 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 5 गट असून 9 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • टेबल टेनिस: 22 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 7 गट असून 10 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • वॉलिबॉल: 19 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 2 गट असून 24 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • वेटलिफ्टिंग: 30 सप्टेंबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 14 गट असून 2 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • रेसलिंग: 4 ऑक्टोबर ते 7 ऑक्टोबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 18 गट असून 19 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
 • वुशू: 24 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान ही स्पर्धा पार पडणार आहे. यात एकूण 15 गट असून 10 खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे.
Non Stop LIVE Update
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही
राजीनाम्याच्या मागणीवर भुजबळ म्हणाले, तर मी एक क्षणसुद्धा थांबणार नाही.
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?
... तेव्हा दमडी दिली नाही, बुटानं हाणलं पाहिजे, खडसेंचा निशाणा कुणावर?.
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा
ठाकरे शिंदे यांना पुन्हा नालायक म्हणाले अन् मांडली अन्नदात्याची व्यथा.
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट
... आम्हाला गाफील ठेवलं गेलं, अजितदादांचा त्या गुप्तभेटीवर गौप्यस्फोट.
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं..
लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी या जागा लढवणार, अजित दांदानी थेट म्हटलं...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्...
छगन भुजबळ यांच्या जीवाला धोका? सलग आले १२ धमकीचे मॅसेज अन्....
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?
मुख्यमंत्र्यांसंबंधित प्रकरणात दत्ता दळवींना जामीन, का झाली होती अटक?.
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो
मोदी Vs गांधींची लढाई, ५ राज्यांच्या निकालाआधीचा Exit Poll काय सांगतो.
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले...
छगन भुजबळ यांचा थेट शरद पवार यांनाच सवाल; थेट म्हणाले....
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास
असला बुके कधी पाहिलाय? अजितदादांना १,३६९ गुलाबांच्या फुलांचा गुच्छ खास.