पुरुष फुटबॉलर ब्रा का घालतात? कारण वाचून धक्काच…

पुरुष फुटबॉलर घालत असलेली 'स्पोर्ट्स ब्रा' ही खरं तर GPS ट्रॅकर वेस्ट असते. खेळाडूंच्या हालचाली, वेग, हृदय गती आणि अंतरासारख्या महत्त्वाच्या डेटाचे संकलन करून प्रशिक्षक त्यांच्या कार्यक्षमतेचे विश्लेषण करतात. ही वेस्ट खेळाडूंच्या शारीरिक स्थिती आणि रणनीती सुधारण्यासाठी वापरली जाते, ज्यामुळे मैदानातील प्रदर्शन वाढते.

पुरुष फुटबॉलर ब्रा का घालतात? कारण वाचून धक्काच...
male footballer
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 03, 2026 | 6:36 PM

जर तुम्ही पुरुषांचा फुटबॉल सामना पाहिला असेल तर तुम्हाला पुरुष खेळाडूंच्या शर्टाच्या आत एक वेगळीच गोष्ट नजरेस आली असेल. मॅच संपल्यावर किंवा गोलचा जल्लोष करताना खेळाडू जर्सी काढून उडवतात, तेव्हा त्यांच्या अंगात स्पोर्ट्स ब्रा सारखे कपडे आढळून येतात. यावरून पुरुष खेळाडू ब्रा घालत असल्याचं दिसून येतं. पण ते असं का करत असतील? नेमकी ती ब्रा आहे का? असे अनेक प्रश्न समोर येतात. त्यामागचं कारण शोधण्याचा आणि नेमका हा काय प्रकार आहे हे उलगडण्याचा हा प्रपंच.

उदहारण द्यायचं झालं तर युरो 2024 मॅच पार पडली होती. त्यावेळी स्कॉटलंडला पराभूत करण्यासाठी हंगेरीच्या केविन सोबोथने मॅचच्या शेवटच्या मिनिटात विजयाचा जल्लोष साजरा केला. त्यावेळी त्याने त्याने त्याचं शर्ट काढलं. त्यावेळी तो एक स्पोर्ट्स ब्रा सारखी हार्नेस घातलेला दिसला. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही वर्षापासून फुटबॉलर या उत्पादनाचा वापर करत आहेत. पण अमेरिकेत फुटबॉल संस्कृतीला मिळणारं प्रोत्साहन आणि खेळावर आधीपासून अधिक लोकांच्या नजरा असल्याने अनेक प्रेक्षक त्यांना पहिल्यांदा असं पाहत असल्याने थोडे संभ्रमित झाले आहेत. खेळाडूंनी स्पोर्ट्स ब्रा घातली तरी का? त्या मागचं कारण तरी काय आहे? असा सवाल प्रेक्षकांना पडला आहे.

ती ब्रा नाही तर…

छातीच्या मांसपेशींना सहारा देण्यासाठी हे कपडे घातले जात नाहीये. तर खेळाडू घालत असलेली स्पोर्ट्स ब्रा ही एक जीपीएस ट्रॅकर असलेली जॅकेट आहे. प्रत्येक जॅकेटच्या मागे एक ट्रॅकर लावलेला असतो. त्यातून कोच, प्रशिक्षक आणि खेळाडूंना शिकण्यासाठी भरपूर डेटा मिळतो. या ब्राला जीपीएस वेस्ट असं म्हटलं जातं.

पुरुष खेळाडू घालत असलेली वेस्ट हलकी हार्नेस असते. त्याला खांद्याला एक छोटा ट्रॅकिंग उपकरण लावलेलं असतं. या उपकरणात जीपीएस, एक्सेलेरोमीटर आणि कधी कधी हृदय गती मॉनिटरही असतो. प्रशिक्षण आणि मॅचच्या काळात त्यातून विस्तृत डेटा गोळा केला जातो.

डेटा संकलन

शरीराला चिपकून राहावे म्हणून या कपड्यांचा आकार ब्रा सारखा असतो. तसेच गतीला बाधा येणार नाही याची खबरदारीही त्यातून घेतली जाते. या ब्राची फिटिंग अशा पद्धतीने असते की सेशन कितीही तीव्र असली तरी डेटाचं सटिक संकलन होतं.

कोणत्या प्रकारचा डेटा गोळा होतो…

निश्चित करण्यात आलेलं अंतर

शीर्ष गती

स्प्रिंट आणि त्वरण

हृदय गती

खेळाडूंच्या हालचालींचे हिट मॅप

खेळाडू लोड आणि रिकव्हरी मॅट्रिक्स

Follow Us