Euro 2020 : रशियाकडून फिनलँडचा पराभव, वेल्सकडून टर्कीवर मात, इटलीचा पुढील फेरीत प्रवेश

| Updated on: Jun 17, 2021 | 1:40 PM

युरो चषक स्पर्धेत बुधवारी तीन सामने पार पडले. ज्यात सर्वात आधी रशियाने फिनलँडला नंतर वेल्सने टर्कीला आणि अखेरच्या सामन्यात इटलीने स्वित्झर्लंडला पराभूत केलं.

Euro 2020 : रशियाकडून फिनलँडचा पराभव, वेल्सकडून टर्कीवर मात, इटलीचा पुढील फेरीत प्रवेश
वेल्स आणि टर्की सामन्यातील एक क्षण
Follow us on

रोम : युरोपियन देशात सुरु असलेली युरो चषक 2020 (Euro 2020) ही जागतिक फुटबॉल स्पर्धा दिवसेंदिवस रंगतदार होत आहे. हळूहळू काही संघ पुढच्या फेरीत तर काही स्पर्धेबाहेर होऊ लागले आहेत. दरम्यान बुधवारी देखील तीन सामने झाले ज्यामध्ये इटलीचा संघ पुढच्या फेरीत पोहचला. टर्कीचं आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. (In Euro 2020 Russia Beat Finland wales defeated turky and italy goes in round 16 with defeating Switzerland)

दिवसातील सर्वात पहिल्या सामन्यात रशियाने 1-0 च्या फरकाने फिनलँडला नमवत स्पर्धेत एक गुण मिळवला. रशियाच्या एलेक्सी मीरांचुकने (Aleksei Miranchuk) केलेल्या एकमेव गोलच्या जोरावर रशियाने हा विजय मिळवला. रशियाच्या सेंट पीटर्सबर्ग स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात दोन्ही संघांनी तोडीस तोड खेळ केला. सुरुवातीपासूनच दोन्ही संघ एकमेंकाच्या गोलपोस्टवर हल्ले करत होते. पण यश कोणालाच येत नव्हता. अखेर हाल्फ टाईम झाल्यानंतर देण्यात आलेल्या अतिरिक्त दोन मिनिटांत 47 व्या मिनिटाला रशियाच्या एलेक्सी मीरांचुकने (Aleksei Miranchuk) एक अप्रतिम गोल झळकावला आणि संघाला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर संपूर्ण सामन्यात दोन्ही संघाना एकही गोल करता न आल्याने अखेर रशिया 1-0 च्या फरकाने विजयी झाला.

वेल्सचा विजय टर्कीचे आव्हान संपुष्टात

बुधवारच्या दिवसातील दुसऱ्या सामन्यात वेल्सच्या संघाने टर्कीचा 2-0 च्या फरकाने नमवत आपलं स्पर्धेतील स्थान कायम ठेवलं. तर दुसरीकडे टर्कीला सलग दुसरा पराभव पत्करावा लागल्याने त्यांच स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आलं आहे. सामन्यात पहिला हाल्फ होण्यास 3 मिनिटं शिल्लक असताना वेल्सच्या आरॉन रामसेने गोल झळकावत वेल्सला 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर अतिरिक्त वेळे रॉबर्ट्सने 95 मिनिटाला आणखी एक गोल करत वेल्सचा विजय निश्चित केला. या विजयासह वेल्स ‘ए’ गटात अव्वल स्थानी पोहोचला आहे.

इटलीचं दमदार प्रदर्शन

दिवसातील अखेरच्या सामन्यात जागतिक फुटबॉलमधील बलाढ्य संघ इटलीने नावाला साजेसा खेळ करत स्वित्झर्लंडला 3-0 ने पराभूत करत पुढील फेरी गाठली. इटलीच्या अप्रतिम डिफेन्समुळे स्वित्झर्लंडला एकही गोल करता आला नाही, तर इटलीने संधीचे सोने करत 3 गोल दागले. सामन्यात इटलीच्या मॅनुएल लोकाटेलीने 26 व्या आणि 52 व्या मिनिटाला गोल करत संघाला 2-0 ची आघाडी मिळवून दिली. तर 89 व्या मिनिटाला इटलीचा स्टार खेळाडू सिरो इमोबाइलने एक गोल करत संघाला 3-0 ने विजय मिळवून दिला. या विजयासह सलग दोन विजय मिळवत इटलीचा संघ राऊंड 16 मध्ये पोहोचला आहे.

हे ही वाचा :

सर्जियो रामोसचा रिअल माद्रिदला अलविदा, 16 वर्षांच्या कराराचा अंत, 22 महत्त्वपूर्ण स्पर्धा जिंकवून देणारा कर्णधार

Euro 2020 : रोनाल्डोच्या विक्रमाने पोर्तुगालची विजयी सुरुवात, जर्मनी मात्र फ्रान्सकडून पराभूत

Euro 2020 : चेक रिपब्लिकचा स्कॉटलंडवर विजय, स्लोवाकियाचीही विजयी सुरुवात

(In Euro 2020 Russia Beat Finland wales defeated turky and italy goes in round 16 with defeating Switzerland)