Neeraj Chopra Marriage : ऑलिम्पिक मेडल विनर नीरज चोप्रा विवाहबंधनात, फोटो व्हायरल

Neeraj Chopra Wife Name : भारताला ऑलिम्पिकमध्ये एकूण 2 मेडल मिळवून देणारा भालाफेकपटून नीरज चोप्रा याने लग्न केलं आहे. नीरजने सोशल मीडियावरुन याबाबतची माहिती दिली आहे.

Neeraj Chopra Marriage : ऑलिम्पिक मेडल विनर नीरज चोप्रा विवाहबंधनात, फोटो व्हायरल
Neeraj Chopra Married
Image Credit source: Neeraj Chopra Instagram
| Updated on: Jan 20, 2025 | 12:07 AM

भारताचा स्टार आणि युवा भालाफेकपटू नीरज चोप्रा याने नव्या अध्यायाची सुरुवात केली आहे. भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता भालाफेकपरटू 19 जानेवारी रोजी विवाहबंधनात अडकला आहे. नीरज चोप्राने सोशल मीडियावरुन ही गोड बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे. नीरजने इंस्टाग्रामवर त्याच्या लग्नाचे 3 फोटो पोस्ट केले आहेत. “जीवनातील नव्या अध्यायाची सुरुवात कुटुंबियांसह केली आहे. या क्षणी आम्हाला एकत्र आणणाऱ्या प्रत्येक आशीर्वादाबद्दल आभारी आहे”, असं नीरजने त्याच्या इंस्टा पोस्टमध्ये म्हटलं आहे. तसेच नीरजने त्याच्या पत्नीचं नावही चाहत्यांसह शेअर केलं आहे. हिमानी असं नीरजच्या पत्नीचं नाव आहे.

नीरजची पत्नी हिमानी कोण?

नीरजची पत्नी हिमानी कोण आहे? असा प्रश्न आता नीरजच्या लग्नानंतर विचारला जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हिमानी ही परदेशात ‘स्पोर्ट्स मॅनेजमेंट’चं शिक्षण घेत आहे. तसेच हिमानीने राज्यशास्त्र आणि शारीरिक शिक्षण या विषयात पदवी घेतली आहे.

नीरजची चोप्राची कामगिरी

नीरज चोप्राने भालाफेकीत भारताला आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून दिली. नीरजने भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणि सिलव्हर असे एकूण 2 पदक जिंकले आहेत. तसेच नीरजने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत भारताचं नाव उंचावलं आहे.

नीरजने 2016 साली अंडर 20 वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पिनशीप स्पर्धेत विजय मिळवत आपली छाप सोडली होती. त्यानंतर नीरजने 2018 साली एशियन गेम्समध्ये सुवर्ण पदकाची कमाई केली. नीरजने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 2021 साली गोल्ड मेडल पटकावलं होतं. नीरजने तेव्हा 87.58 मीटर इतका लांब भाला फेकत सुवर्ण पदकावर आपली मोहर उमटवली. नीरज या कामगिरीनंतर घराघरात पोहचला. नीरजने यासह भालाफेकीत गोल्ड मेडल जिंकणारा पहिलावहिला भारतीय हा बहुमान मिळवला.

नीरज चोप्रा याच्या नव्या इनिंगची सुरुवात

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये रौप्य पदकाची कमाई

टोकियो ऑलिम्पिकमधील कामगिरीनंतर नीरजकडून भारतीयांच्या आशा वाढल्या. नीरजकडून पुन्हा एकदा पॅरिस ऑलिम्पिकमधून गोल्ड मेडलची अपेक्षा होती. नीरजला सलग दुसऱ्यांदा सुवर्ण पदक मिळवता आलं नाही. मात्र त्याने भारतीयांची निराशा केली नाही. नीरजने भारतासाठी दुसर्‍या क्रमांकाचं पदक मिळवून दिलं. नीरजने भारताला रौप्य पदक मिळवून दिलं.