Kho Kho World Cup : भारताची उपांत्य फेरीत धडक, बांगलादेशचा 109-16 गुणांनी उडवला धुव्वा

भारतीय महिला खो खो संघाने उपांत्यपूर्व फेरीत बांगलादेशचा धुव्वा उडवला. यासह भारताने उपांत्य फेरीत धडक मारली आहे. भारताचं वर्ल्डकप जेतेपद फक्त दोन विजय दूर आहे. भारताने चौथ्या सामन्यात 100 गुणांचा आकडा पार केला आहे. भारताचा उपांत्य फेरीत सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे.

Kho Kho World Cup : भारताची उपांत्य फेरीत धडक, बांगलादेशचा 109-16 गुणांनी उडवला धुव्वा
| Updated on: Jan 17, 2025 | 8:19 PM

भारतीय महिला संघाने उपांत्यपूर्व फेरीत जबरदस्त खेळी केली. भारतीय कर्णधार प्रियांका इंगळे हीने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम अटॅक करण्याचा निर्णय केला. पहिल्या डावात भारताने एकही ड्रीम रन दिला नाही. त्यामुळे पहिल्या डावात भारताने 50-0 अशी आघाडी मिळवली होती. ही आघाडी कमी करण्याचं मोठं आव्हान बांगलादेशपुढे होतं. पण बांगलादेशने हा फरक कमी करण्याऐवजी 6 ड्रिम प्वॉइंट दिले. तर अटॅक करताना फक्त 8 गुण मिळवले. म्हणजेच दुसऱ्या डावात बांगलादेशकडे फक्त 2 गुण होते. तर भारताकडे 48 गुणांची आघाडी होती. तिसऱ्या डावात अटॅक करताना भारताने आक्रमक अटॅक केला. एका पाठोपाठ एक बॅच तंबूत पाठवत होते. त्यामुळे भारताच्या पारड्यात एका पाठोपाठ एक गुण मिळत होते. तिसऱ्या डावात भारताकडे 106 गुण होते. त्यामुळे तिसऱ्या डावातच भारताचा विजय पक्का झाला होता.  कारण 98 धावांची आघाडी भारताकडे होती. त्यामुळे चौथ्या डावात अटॅक करून 98 धावांचा फरक कमी करणं कठीण होतं. त्यात भारताने चौथ्या डावातही ड्रीम रनही मिळवला. भारताने हा सामना 109-16 गुणांनी जिंकला.

भारत बांगलादेश उपांत्यपूर्व फेरीत अटॅकसाठी मगई मांझीला पुरस्कार मिळाला. तर डिफेंससाठी बांगलादेशच्या रितू सेनला गौरविण्यात आलं. तर सामनावीराचा पुरस्कार हा अश्विनी शिंदेला पुरस्कार मिळाला. उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी होणार आहे. तर दुसऱ्या उपांत्य फेरीत नेपाळ आणि युगांडा यांच्यात सामना होणार आहे. नेपाळने उपांत्यपूर्व फेरीत इराणचा पराभव करत सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. नेपाळने हा सामना 103-8 ने जिंकला.

भारतीय महिला संघ : प्रियांका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू,मोनिका, नाझिया बीबी.