
टीव्ही9 कॉर्पोरेट फुटबॉल कप आणि इंडियन टायगर्स अँड टायग्रेसेसच्या यशानंतर टीव्ही9 नेटवर्क त्यांच्या पुढील क्रीडा स्पर्धेसाठी सज्ज झालं आहे. द न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. पद्मश्री पुलेला गोपीचंद यांच्या सहकार्याने, तीन दिवसांच्या या क्रीडा महोत्सवाद्वारे कॉर्पोरेट जगताला चालना मिळणार आहे. द न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नाही. तर वाढत्या कॉर्पोरेट आव्हानांना तोंड देण्यास मदत करण्यासाठी डिझाइन केलेली आहे.न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेच्या माध्यमातून भारतातील आघाडीच्या संस्थांमधील कर्मचारी स्पर्धा करण्यासाठी, सहयोग करण्यासाठी आणि रिचार्ज करण्यासाठी एकत्र येणार आहेत. जागतिक दर्जाच्या पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत 9 ते 11 मे 2025 दरम्यान या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या त्याचबरोबर एक सखोल संदेश दिला जाणार आहे.
पुलेला गोपीचंद बॅडमिंटन अकादमीत सायना नेहवाल, पीव्ही सिंधू, साई प्रणीत, पारुपल्ली कश्यप, श्रीकांत किदाम्बी यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन खेळाडू घडले आहेत. या अकादमीत खेळण्याची संधी मिळणं म्हणजे अद्भुत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंसाठी एक वेगळा अनुभव असेल. भारतीय क्रीडा क्षेत्रात या ठिकाणाला खूप महत्त्व आहे. कारण ते शिस्त, समर्पण आणि उत्कृष्टतेचे प्रतीक आहे.
न्यूज9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप ही केवळ एक स्पर्धा नाही तर त्यापेक्षाही त्याचं महत्त्व अधिक आहे. कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांच्या सहभागाला चालना देण्याची, ब्रँड मूल्यांचे प्रदर्शन करण्याची, खेळाद्वारे नेतृत्वगुण निर्माण करण्याची आणि देशातील शीर्ष संस्थांशी नेटवर्किंग करण्याची एक अनोखी संधी या माध्यमातून मिळणार आहे. ही स्पर्धा आरोग्य, उत्कृष्टता आणि संतुलित जीवनशैलीसाठी वचनबद्धता दाखवून कॉर्पोरेटना संघाचे मनोबल वाढविण्यास, निष्ठा निर्माण करण्यास आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना प्रेरित करण्यास मदत करेल.
भारतातील काही आघाडीच्या संस्था जसे की डॉ. रेड्डीज, इन्फोसिस, ई अँड वाय, टाइम्स ऑफ इंडिया, ब्रॉड्रिज, कॅपजेमिनी, जेनपॅक्ट, फिनमार्केट, एसपीए सॉफ्टवेअर, एक्सेंचर, श्रॅडिंजर, मेडिकोव्हर हॉस्पिटल्स, नॅशनल अकादमी ऑफ कन्स्ट्रक्शन, गार्डियन सिक्युरिटीज, हाय रेडियस, आर्सेसियम, वेल्स फार्गो, दिल्ली पब्लिक स्कूल, पल्लवी इंटरनॅशनल स्कूल, आर्सेसियम, ओल्गा टेक्नॉलॉजीज, एडीपी, ग्रोथ स्टोरीज, डॉ. केअर इत्यादी आधीच टीव्ही9 च्या ऐतिहासिक कॉर्पोरेट चळवळीत सामील झाल्या आहेत.