लाखो रुपयांचं बक्षिस, न्यूज 9 कडून कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेचं आयोजन, जाणून घ्या
News9 Corporate Badminton Championship 2025 : न्यूज9 च्या वतीने कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशिप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 11 मे दरम्यान हैदराबादमधील पी गोपीचंद बॅडमिंटन अकॅडेमी येथे करण्यात आलं आहे.

न्यूज9 कडून याआधी कॉर्पोरेट फुटबॉल कप आणि इंडियन टायगर्स एन्ड टायग्रेसेस फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. या 2 स्पर्धांच्या यशस्वी आयोजनानंतर आता न्यूज9 कडून कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पियनशीप 2025 स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. कॉर्पोरेटमधील वाढत्या आव्हानांना तोंड देण्यासाठी संघटनांना मदत व्हावी, या उद्देशाने न्यूज9 च्या वतीने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.
या स्पर्धेचं आयोजन हे दिग्गज कोच आणि माजी भारतीय बॅडमिंटनपटू पी गोपीचंद यांच्या सहाय्याने करण्यात आलं आहे. या स्पर्धेचा एकूण 3 दिवस थरार रंगणार आहे. स्पर्धेचं आयोजन हे 9 ते 11 मे दरम्यान हैदराबादमधील पी गोपीचंद बॅडमिंटन अकॅडेमी येथे करण्यात आलं आहे.
स्पर्धेचं उद्दिष्ट काय?
कॉर्पोरेटमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शारिरीक-मानसिक या अशा समस्यांचा सामना करावा लागतो. या दररोजच्या धकाधकीच्या जीवनातून कर्मचाऱ्यांना मोकळा वेळ मिळावा, तसेच त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा, या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच आरोग्य आणि सहकार्याला प्रोत्साहन देणं, हे या स्पर्धेमागील प्रमुख उद्दीष्ट आहे.
कुणाला सहभागी होता येणार?
या कॉर्पोरेट बॅडमिंटन स्पर्धेचं आयोजन हे राउंड रॉबिन फॉर्मेटने करण्यात आलं आहे. अर्थात या स्पर्धेतील प्रत्येक संघ इतर संघांविरुद्ध 1-1 सामना खेळणार. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नोंदणी आवश्यक आहे. तसेच या स्पर्धेनिमित्ताने 2 कॉर्पोरेट्स कंपन्यांना एकत्र येता येईल.
आपल्या एमएनसीमधील कर्मचाऱ्यांना, बिजनेस लीडर्स आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी संबंधित कंपनीचे एचआर यात सहभागी होऊ शकतात. मात्र त्यासाठी एक अट आहे. कंपनीच्या स्थापनेला किमान 2 वर्ष झालेली असावीत आणि 10 कर्मचारी कार्यरत असावीत, अशी सहभागासाठी अट आहे. www.news9corporatecup.com आणि corporatecup@tv9.com या वेबसाईटद्वारे नोंदनी करता येईल.
कॅटेगरी आणि प्राईज
न्यूज 9 कॉर्पोरेट बॅडमिंटन चॅम्पिनयशीप 2025 स्पर्धेच पुरुष श्रेणीत एकेरी (Mens Single) आणि मिश्र दुहेरी (Mixed Double) सामने खेळवण्यात येतील. यासाठी कॉर्पोरेट कंपनी पसंतीनुसार नोंदणी करु शकते. तसेच ओपन कॅटेगरीत पुरुष एकेरी (Mens Single) , महिला एकेरी (Womens Single) आणि मिश्र दुहेरी यानुसार सामने खेळवण्यात येतील.
सहभागी होणाऱ्यांना पी गोपीचंद बॅडमिंटन अकॅडेमीत तज्ज्ञांकडून 2 दिवस ट्रेनिंग देण्यात येईल. तसेच विजेत्यांसाठी लाखो रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे. पहिल्या क्रमांकासाठी दीड लाख आणि दुसऱ्या क्रमांकासाठी 1 लाख रुपयांचं बक्षिस ठेवण्यात आलं आहे. तर तिसऱ्या क्रमांकासाठी 50 हजार रुपये बक्षिस दिलं जाणार आहे.
