Olympics 2024 Highlights And Update: भारताची पाचव्या दिवशी चांगली कामगिरी, गुरुवारी महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेला पदकाची संधी, जाणून घ्या 1 ऑगस्टचं वेळापत्रक

Paris Olympics 31July Updates Highlights In Marathi : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील आजचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी भारताना बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू आशेवर खरी ठरलीय. तिने प्री क्वार्टर फायनलमध्ये धडक मारली आहे. तसेच लक्ष्य सेन यानेही विजय मिळवला आहे.

Olympics 2024 Highlights And Update: भारताची पाचव्या दिवशी चांगली कामगिरी, गुरुवारी महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळेला पदकाची संधी, जाणून घ्या 1 ऑगस्टचं वेळापत्रक
Swapnil Kusale paris olympics
| Updated on: Aug 01, 2024 | 1:40 AM

भारताने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील पाचव्या दिवशी अर्थात 31 जुलै रोजी दमदार कामगिरी केली. भारताच्या अनेक खेळाडूंनी विविध प्रकारात विजय मिळवला, तर काही अपयशी ठरले. महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हीने 75 किलो वजनी गटात शानदार विजय मिळवला. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला. ऑलिम्पिकच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला. महिला तिरंदाज दीपिका कुमारी हीने वैयक्तिक स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकून प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहचली. महिला तिरंदाजीतील वैयक्तिक प्रकारात प्री क्वार्टर फायनलमध्ये दीपिका आणि भजन कौर दोघींनी धडक दिली.  तर काही खेळाडूंचे प्रयत्न प्रतिस्पर्ध्यांसमोर अपुरे पडले.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Aug 2024 01:25 AM (IST)

    भारताचं सहाव्या दिवसाचं वेळापत्रक

    भारताला पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतून सहाव्या दिवशी पदकांची संधी आहे. भारताचे 1 ऑगस्टला बॉक्सिंग, नेमबाजी आणि तिरंदाजीतील सामने होणार आहेत. भारताचे काही पदकाचे सामनेही आहेत. महाराष्ट्राच्या स्वप्निल कुसळे याला पदक जिंकण्याची संधी आहे. जाणून घ्या भारताचं सहाव्या दिवसाचं वेळापत्रक.

    टीम इंडियाचं 1 ऑगस्टचं वेळापत्रक

     

  • 01 Aug 2024 01:17 AM (IST)

    भारतीय खेळाडूंची पाचव्या दिवशी उल्लेखनीय कामगिरी

    भारताच्या खेळाडूंनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 स्पर्धेतील पाचव्या दिवशी चांगली कामगिरी केली. काही खेळाडूंनी विजय मिळवत मेडलच्या दिशेने आगेकूच केली आहे. तर काही खेळाडूंचं आव्हान संपुष्ठात आलं. महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हीने 75 किलो वजनीगटात शानदार विजय मिळवला. महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला. ऑलिम्पिकच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला. महिला तिरंदाज दीपिका कुमारी हीने वैयक्तिक स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकून प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहचली. महिला तिरंदाजीतील वैयक्तिक प्रकारात प्री क्वार्टर फायनलमध्ये दीपिका आणि भजन कौर दोघींनी धडक दिली.

  • 01 Aug 2024 01:08 AM (IST)

    वियेतनामच्या ले डक फॅट याचा पराभव

    बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय याने साखळी फेरीतील सामन्यात विजय मिळवला आहे. प्रणॉय याने वियेतनामच्या ले डक फॅट याच्यावर 16-21, 21-11 आणि 21-12 अशा फरकाने विजय मिळवला आहे.

  • 31 Jul 2024 11:52 PM (IST)

    प्रणॉयसमोर वियेतनामच्या ले डक फॅट याचं आव्हान

    एचएस प्रणॉयच्या सामन्याला सुरुवात झाली आहे. प्रणॉयसमोर बॅडमिंटन मेन्स डबल साखळी फेरीतील सामन्यात वियेतनामच्या ले डक फॅट याचं आव्हान आहे.

     

  • 31 Jul 2024 11:10 PM (IST)

    तरुणदीप राय ‘आऊट’, भारताला धक्का

    तिरंदाज तरुणदीप राय पुरुष एकेरी स्पर्धेतून बाहेर झाला आहे. तरुणचा राउंड 64 मध्ये ग्रेट ब्रिटनेच्या टॉम हॉल याने 6-4 अशा फरकाने पराभव केला आहे.

  • 31 Jul 2024 08:58 PM (IST)

    पीव्ही सिंधूच्या वाटेतील मोठा अडथळा दूर, काय झालं?

    भारतीय बॅडमिंटनपटू स्टार पीव्ही सिंधूला मोठा फायदा झाला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत सिंधूच्या वाटेतील मोठा अडथळा दूर झाला आहे. तायवानच्या ताई त्जु यिंग हीचं साखळी फेरीतच आव्हान संपु्ष्ठात आलं आहे. ताईने सिंधूला टोक्यो ऑलिम्पिकमधील सेमी फायनलमध्ये पराभूत केलं होतं.

     

  • 31 Jul 2024 07:26 PM (IST)

    दीपिका आणि भजन कौर दोघींची धडक

    महिला तिरंदाजीतील वैयक्तित प्रकारात प्री क्वार्टर फायनलमध्ये दीपिका आणि भजन कौर दोघींनी धडक दिली आहे. या दोघींचा पुढील सामना हा शनिवारी 3 ऑगस्ट रोजी होणार आहे.

  • 31 Jul 2024 06:35 PM (IST)

    मनिकासमोर जपानच्या म्यू हिरानोचं आव्हान

    महिला मनिका बत्रा टेबल टेनिस एकेरी प्रकारात प्री क्वार्टर फायलमध्ये पोहचली आहे. मनिकाचा पुढील सामना हा रात्री 8 वाजून 30 मिनिटांनी होणारआहे. मनिकासमोर जपानच्या म्यू हिरानो विरुद्ध होणार आहे.

  • 31 Jul 2024 04:56 PM (IST)

    महिला तिरंदाज दीपिका कुमारीची क्विंटी रोफनवर 6-2 ने मात

    महिला तिरंदाज दीपिका कुमारी हीने वैयक्तिक स्पर्धेत सलग दुसरा सामना जिंकला आहे. दीपिकाने राउंड 32 मध्ये नेदरलँड्सच्या क्विंटी रोफेनचा 6-2 असा पराभव केला आहे. दीपीकाने 4 पैकी 3 सेटमध्ये विजय मिळवला. दीपिका या विजयासह प्री क्वार्टर फायनलमध्ये पोहचली आहे.

  • 31 Jul 2024 04:48 PM (IST)

    बॉक्सर लवलीना बोरगोहेन मेडलपासून एक पाऊल दूर, पुढील सामना केव्हा?

    महिला बॉक्सर लवलीना बोरगोहेन हीने 75 किलो वजनीगटात शानदार विजय मिळवला आहे. लवलीना या विजयासह क्वार्टर फायलनमध्ये धडक मारली आहे. लवलीनाने नॉर्वेच्या सुन्नीवा हॉफस्टेड हीचा 5-0 ने धुव्वा उडवला. लवलीनाचा क्वार्टर फायनलमधील सामना हा 4 ऑगस्ट रोजी चीनची बॉक्सर कियान विरुद्ध होणार आहे. लवलीना पदकापासून एक पाऊल दूर आहे. त्यामुळे लवलीनाने आणखी एक विजय मिळवून भारताला पदक मिळवून द्यावं, आशी आशा भारतीयांना आहे.

     

  • 31 Jul 2024 04:03 PM (IST)

    महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसळेने इतिहास रचला

    भारतीय नेमबाज स्वप्नील कुसळेने इतिहास रचला आहे. ऑलिम्पिकच्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनच्या अंतिम फेरीत पोहोचणारा तो पहिला भारतीय ठरला आहे. नेमबाजीत आणखी एका पदकाची आशा उंचावली आहे. अंतिम सामना 1 ऑगस्ट रोजी दुपारी 1.30 वाजता होणार आहे.

  • 31 Jul 2024 04:02 PM (IST)

    श्रीजा अकुला 16व्या फेरीत पोहोचली

    मनिका बत्रानंतर, श्रीजा अकुला महिला टेबल टेनिस सिग्नलच्या 16 फेरीत पात्र ठरली आहे. अशी कामगिरी करणारी ती दुसरी भारतीय ठरली आहे. 26 वर्षीय श्रीजाने आपल्या वाढदिवसानिमित्त हा इतिहास रचला आहे. 32 च्या फेरीत तिने सिंगापूरच्या झेंग जियानचा 4-2 असा पराभव केला.

  • 31 Jul 2024 04:01 PM (IST)

    भारतीय हॉकी संघ उपांत्यपूर्व फेरीत

    भारतीय हॉकी संघाने पदकाच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. संघाने चमकदार कामगिरी केली आणि ब गटातून उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरले. भारताने न्यूझीलंड आणि आयर्लंडविरुद्ध विजय मिळवला होता. तसेच अर्जेंटिनाविरुद्ध अनिर्णित खेळ केला होता. आता या गटात बेल्जियमने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. यासह भारतीय संघ उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे.

  • 31 Jul 2024 03:51 PM (IST)

    बॉक्सिंगमधील 3 मेडल्सची संधी हुकली

    पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय बॉक्सर अपयशी ठरले. भारताला बॉक्सिंगमधून 3 पदकांची आशा होती. मात्र खेळाडू अपयशी ठरल्याने 3 पदकं जिंकण्याची संधी हुकली. अमित पंघाल, जेस्मीननंतर चौथ्या दिवशी प्रीत पवार हीचाही पराभव झाला आणि भारताच्या पदरी निराशा आली.