AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PKL 2021-22 LIVE Score and Updates, Bengal Warriors vs Gujarat Giants: गुजरातला चूका भोवल्या, बेंगाल वॉरिअर्सचा निसटता विजय

| Edited By: | Updated on: Dec 25, 2021 | 6:13 AM
Share

PKL 2021-22 LIVE Score and Updates : प्रो कबड्डी लीगचा (Pro Kabaddi League) आज तिसरा दिवस आहे. यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्लीने (U Mumba vs Dabang Delhi) आजच्या दिवसांच्या लढतींना सुरुवात होणार आहे.

PKL 2021-22 LIVE Score and Updates, Bengal Warriors vs Gujarat Giants: गुजरातला चूका भोवल्या, बेंगाल वॉरिअर्सचा निसटता विजय

बंगळुरु: एक-एक गुणासाठी संघर्ष सुरु असलेल्या सामन्यात गतविजेत्या बेंगाल वॉरिअर्सने गुजरात जायंटसला तीन गुणांच्या फरकाने 31-28 असे पराभूत केले. शेवटपर्यंत रंगतदार ठरलेल्या या सामन्यात गुजरातच्या राकेश नरवालने दमदार खेळ दाखवला व 12 गुण मिळवले. पण गुजरातने टॅकल म्हणजेच पकडीमध्ये अनेक चुका केल्या, त्याचा फायदा बेंगाल वॉरिअर्सला झाला. गुजरातचा संघ मजबूत डिफेन्ससाठी ओळखला जातो. पण या सामन्यात दुसऱ्या हाफमध्ये त्यांनी अनेक चुका केल्या. बेंगाल वॉरिअर्सने सांघिक कामगिरीच्या बळावर विजय मिळवला.

पहिला हाफमध्ये बेंगाल वॉरिअर्सकडे पाच पॉईंटसची आघाडी होती. 16-11ने ते पुढे होते. रेड पेक्षा टॅकल म्हणजे पकडीमध्ये दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. टॅकलमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी सहा पॉईंटस मिळवले होते. रेडमध्ये बेंगालने आठ आणि गुजरातने चार पॉईंट मिळवल होते.

बेंगळुरुने असा मिळवला विजय बेंगळुरु बुल्सने प्रो कबड्डी लीग स्पर्धेत पहिल्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी तमिळ थलायवाजला 38-30 अशा आठ गुणांच्या फरकाने पराभूत केले. (Tamil Thalaivas vs Bengaluru Bulls) बेंगळुरुचा स्टार पवन कुमारने आज नावाला साजेशी कामगिरी केली. त्याने नऊ पॉईंटस मिळवले. पण बेंगळुरुने सांघिक कामगिरीच्या बळावर हा सामना जिंकला. दुसऱ्या हाफमध्ये अगदी एक-एक गुण मिळवत बेंगळुरुने आघाडी वाढवली. मोक्याच्या क्षणी कुठलीही चूक न करता रेड आणि टॅकलमध्ये सरस कामगिरी केली.

अभिषेकनं केलं निराश नवीन कुमारच्या शानदार खेळाच्या बळावर दबंग दिल्लीने यू मुंबावर मात केली आहे. दिल्लीचा स्पर्धेतील हा सलग दुसरा विजय तर मुंबईचा पहिला पराभव आहे. काल दबंग दिल्लीने पुणेरी पलटनला हरवलं होतं, तर यू मुंबाने सलामीच्या लढतीत बेंगळुरु बुल्सचा पराभव केला होता. नवीन कुमारच्या दमदार रेड आजच्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्टय ठरलं. प्रो कबड्डीच्या इतिहासात सर्वात कमी सामन्यांमध्ये रेडमध्ये 500 पॉईंटचा टप्पा त्याने ओलांडला. अवघ्या 47 सामन्यांमध्ये नवीन कुमारने ही कामगिरी करुन दाखवलीय. नवीन कुमारने आजच्या सामन्यात 17 पॉईंटस मिळवले. दुसऱ्या बाजूला मागच्या सामन्यातील यू मुंबाचा स्टार अभिषेक सिंह निष्प्रभ ठरला.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Dec 2021 10:44 PM (IST)

    गुजरातचा पहिला पराभव

    गतविजेत्या बेंगाल वॉरिअर्सने तीन गुणांच्या फरकाने गुजरात जायंटसला पराभूत केलं व सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली.

  • 24 Dec 2021 10:31 PM (IST)

    काही मिनिटांचा खेळ बाकी

    टाइम आऊट झाल असून बेंगाल वॉरिअर्सकडे चार गुणांची आघाडी आहे. 27-23 ने पुढे आहेत. काही मिनिटांचा खेळ बाकी असून सामन्यात काही होऊ शकते.

  • 24 Dec 2021 10:21 PM (IST)

    मनींनदरची दमदार रेड

    मनींनदर सिंहने चढाईमध्ये दोघांना बाद केलं व वॉरिअर्सची आघाडी 24-18 ने वाढवली.

  • 24 Dec 2021 10:18 PM (IST)

    गुजरात जायंटस ऑलआऊट

    गुजरात जायंटस ऑलआऊट. वॉरिअर्सकडे 22-17 आघाडी.

  • 24 Dec 2021 10:16 PM (IST)

    गुजरातने पॉईंटसमधील अंतर कमी केलं

    मागच्या पाच मिनिटात गुजरात जायंटसने चार पॉईंटस मिळवले. वॉरिअर्सला फक्त एक गुण मिळाला. गुजरातकडून पकडीचा सुंदर खेळ.

  • 24 Dec 2021 10:08 PM (IST)

    पहिल्या हाफमध्ये बेंगालकडे आघाडी

    पहिला हाफ झाला असून बेंगाल वॉरिअर्सकडे पाच पॉईंटसची आघाडी आहे. 16-11ने ते पुढे आहेत. रेड पेक्षा टॅकल म्हणजे पकडीमध्ये दोन्ही संघांनी चांगली कामगिरी केली. टॅकलमध्ये दोन्ही संघांनी प्रत्येकी सहा पॉईंटस मिळवलेत, तर रेडमध्ये बेंगालने आठ आणि गुजरातने चार पॉईंट मिळवलेत.

  • 24 Dec 2021 09:58 PM (IST)

    गुजरात आणि बेंगालचे समान गुण

    गुजरात जायंटस आणि बेंगाल वॉरिअर्समध्ये समसमान आठ गुण झाले आहेत.

  • 24 Dec 2021 09:38 PM (IST)

    तिसरा सामना बेंगाल वॉरिअर्स आणि गुजरात जायंटसमध्ये

    बेंगाल वॉरिअर्स आणि गुजरात जायंटसमध्ये दिवसातील तिसरा सामना होणार आहे. दोन्ही संघांनी सलामीचे सामने जिंकले आहेत. बेंगाल वॉरिअर्सने यूपी योद्धा तर गुजरात जायंटसने जयपूर पिंक पॅथर्सला पराभूत केलं होतं.

  • 24 Dec 2021 09:37 PM (IST)

    बेंगळुरु बुल्सचा पहिला विजय

    प्रो कबड्डी लीग स्पर्धेत बेंगळुरु बुल्सने पहिल्या विजयाची नोंद केली आहे. त्यांनी तमिळ थलायवाजला 38-30 ने पराभूत केले.

  • 24 Dec 2021 09:33 PM (IST)

    तमिळ थलायवाजवर आघाडी

    बेंगळुरु बुल्सकडे पाच पॉईंटसची आघाडी आहे. ते 34-29 ने पुढे आहेत.

  • 24 Dec 2021 09:25 PM (IST)

    बेंगळुरु बुल्स पुढे

    बेंगळुरु बुल्सने तमिळ थलायवाजला ऑलआऊट करुन पाच गुणांची आघाडी घेतली आहे. सध्या बेंगळुरु 31-27 ने पुढे आहे.

  • 24 Dec 2021 09:16 PM (IST)

    टाइमआऊटला दोन्ही संघ बरोबरीत

    टाइमआऊट झाला असून थलायवाज आणि बुल्स दोघेही 25-25 असे बरोबरीत आहेत.

  • 24 Dec 2021 09:10 PM (IST)

    तमिळ थलायवाजचं कमबॅक

    दुसऱ्या हाफमध्ये तमिळ थलायवाजचं कमबॅक. बेंगळुरुला केलं ऑलआऊट. 21-19 ने थलायवाज पुढे

  • 24 Dec 2021 09:07 PM (IST)

    तमिळ थलायवाजने मिळवले दोन पॉईंट

    दुसऱ्या हाफच्या सुरुवातीला तमिळ थलायवाजने दोन पॉईंट मिळवलेत. त्यांचे 15 पॉईंट झालेत.

  • 24 Dec 2021 09:01 PM (IST)

    पहिल्या हाफमध्ये बेंगळुरुकडे आघाडी

    पहिल्या हाफचा खेळ संपला असून बेंगळुरु बुल्सकडे सहा पॉईंटची आघाडी आहे. बेंगळुरुचे 19 तर तमिळ थलायवाजकडे 13 पॉईंट आहेत.

  • 24 Dec 2021 08:55 PM (IST)

    बेंगळुरुची चांगली सुरुवात

    तमिळ थलायवाज आणि बेंगळुरु बुल्समध्ये आजच्या दिवसातील दुसरा सामना सुरु आहे. बेंगळुरुकडे तीन गुणांची 12-9 ची आघाडी आहे.

  • 24 Dec 2021 08:31 PM (IST)

    दबंग दिल्लीची यू मुंबावर मात

    दबंग दिल्लीने यू मुंबावर चार पॉईंटसने मात केली आहे. दबंग दिल्लीने 31-27 असे पराभूत केले. नवीन कुमारने सरस खेळ केला.

  • 24 Dec 2021 08:25 PM (IST)

    नवीन कुमारची दमदार रेड

    मोक्याच्या क्षणी नवीन कुमारची दमगार रेड. यू मुंबाच्या तिघांना बाद केलं आणि आघाडी 29-24 अशी वाढवली.

  • 24 Dec 2021 08:21 PM (IST)

    रेडमध्ये नवीन एक्स्प्रेस सुसाट

    प्रो कबड्डी लीगमध्ये दिल्लीच्या नवीन कुमारने रेड म्हणजेच चढाईमध्ये 500 पॉईंटसचा टप्पा गाठला आहे.

  • 24 Dec 2021 08:12 PM (IST)

    दिल्लीचं जोरदार कमबॅक, पाच मिनिटात मिळवले नऊ पॉईंटस

    दिल्लीने जोरदार कमबॅक केलं आहे. पाच मिनिटात दिल्लीने नऊ पॉईंटस कमवत यू मुंबाशी बरोबरी केली. दोन्ही संघ 20-20 असे बरोबरीत आहेत.

  • 24 Dec 2021 08:06 PM (IST)

    मुंबईकडे मोठी आघाडी

    दुसऱ्या हाफच्या खेळाला सुरुवात झाली आहे. यू मुंबाच्या अभिषेक सिंहने दिल्लीच्या दोघांना बाद करुन ऑलआऊट केलं. यू मुंबा 19-10 ने पुढे आहे.

  • 24 Dec 2021 07:54 PM (IST)

    पहिल्या हाफमध्ये यू मुंबाकडे दोन गुणांची आघाडी

    मुंबई ऑलआऊटच्या उंबरठ्यावर असताना नवीन कुमारला यू मुंबाने पकडून सुपर टॅकलचे दोन गुण मिळवले. सध्या यू मुंबई 12-10 अशा दोन गुणांनी आघाडीवर आहे.

  • 24 Dec 2021 07:46 PM (IST)

    रेडमध्ये यू मुंबाची चांगली कामगिरी

    यू मुंबाने आतापर्यंत रेडमध्ये चार आणि पकड म्हणजे टॅकलमध्ये दोन गुण मिळवले आहेत. दबंग दिल्लीने रेड आणि टॅकलमध्ये प्रत्येकी दोन पॉईंटस मिळवले आहेत.

  • 24 Dec 2021 07:38 PM (IST)

    यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली सामना सुरु

    यू मुंबा विरुद्ध दबंग दिल्ली सामना सुरु झाला आहे. मुंबई 5-3 ने आघाडीवर आहे.

  • 24 Dec 2021 07:15 PM (IST)

    दिल्ली आणि मुंबईत सर्वात जास्त सामने कोणी जिंकले?

    यू मुंबा आणि दबंग दिल्लीमध्ये आतापर्यंत 16 सामने झाले आहेत. यू मुंबाने 12 तर दिल्लीने तीन सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला होता.

  • 24 Dec 2021 07:10 PM (IST)

    सुपर रेडर कोण ठरणार अभिषेक सिंह की नवीन कुमार

    बेंगळुरु बुल्स विरुद्धच्या सामन्यात यू मुंबाचा अभिषेक सिंह सुपर रेडर ठरला होता. त्याने 19 गुणांची कमाई केली होती. दुसऱ्या बाजूला दिल्लीचा नवीन कुमार आहे. पुण्याविरुद्ध खेळताना दिल्लीकडून नवीन कुमारने शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. जवळपास प्रत्येक रेड म्हणजे चढाईमध्ये त्याने दबंग दिल्लीसाठी गुण मिळवले. रेडमध्ये नवीन कुमारने 14 पॉईंट मिळवले.

  • 24 Dec 2021 07:02 PM (IST)

    दबंग दिल्ली संघ

    रेडर्स: नवीन कुमार, आशु मलिक, नीरज नारवाल, एमएड सेडाघाट निया, अजय ठाकुर, सुशांत सैल, ऑलराउंडर्स: विजय कुमार, बलराम, संदीप नारवाल, मंजीत चिल्लर, डिफेंडर्स: सुमित, मोहित, जोगिन्दर नारवाल, मोहम्मद मालक, जीवा कुमार, विकास, रविंदर पहल,

  • 24 Dec 2021 07:00 PM (IST)

    यू मुंबा संघ

    रेडर्स: अभिषेक सिंह , नवनीत, अजित कुमार, राहुल राणा, जशनदीप सिंह, ऑलराउंडर्स: अजिंक्य कापरे, मोहसिन, पंकज, आशीष कुमार, डिफेंडर्स: फजल, हरेंद्र कुमार, रिंकू, अजीत, सुनील सिद्धगवाली,

Published On - Dec 24,2021 6:57 PM

Follow us
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.