बाबो! लाईव्ह मॅचमध्ये विषारी सापाची एन्ट्री, थोडक्यात वाचला खेळाडू, व्हिडीओ तुफान व्हायरल

| Updated on: Dec 31, 2023 | 4:50 PM

Snake in Tennis Court live Match vidoe : क्रीडा विश्वातून मोठी बातमी समोर आली आहे. लाईव्ह सामन्यात सापाने एन्ट्री केल्याने सर्वत्र गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. हा साप विषारी जातीचा होता, याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

बाबो! लाईव्ह मॅचमध्ये विषारी सापाची एन्ट्री, थोडक्यात वाचला खेळाडू, व्हिडीओ तुफान व्हायरल
snake in tennis court brisbane
Follow us on

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात अनेकदा साप आल्याच्या घटना आपण पाहिल्या असतील. भर सामन्यात सापाने एन्ट्री केल्याने अनेकदा सामना थांबवून सापाला सन्मानाने बाहेर काढलं जातं. क्रिकेटनंतर टेनिसच्या कोर्टमध्ये साप निघाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. साप दिसला आणि प्रेक्षकांनी आरडाओरडा केला. शेवटी सामना थांबवावा लागला, सापाला रेस्कू करण्यात आलं, तोपर्यंत सामना थांबवण्यात आला होता.

नेमका कसा आणि कुठे निघाला साप?

ब्रिस्बेन आंतरराष्ट्रीय टूर्नामेंटच्या पात्रता फेरीच्या सामन्यावेळी हा प्रकार घडला. जवळपास 50 सेमी लांब असलेला विषारी साप टेनिस कोर्ट जवळ आला होता. बॉल बॉय यांच्यापासून काही अंतरावर साप आढळला होता. यावेळी माजी अमिरिका ओपन चॅम्पियन डोमिनिक थिएम आणि 20 वर्षीय जेम्स मैककाबे यांच्यात सामना सुरू होता. सामन्यादरम्यान निघालेला साप हा प्रेक्षकांना दिसला त्यांनी लगोलग सुरक्ष रक्षकांना याची माहिती दिली. ऑस्ट्रेलियातील हा सर्वात विषारी असलेल्या सापांपैकी एक मानला जातो.

पाहा व्हिडीओ:-

 

साप कोर्टावर आल्यावर खेळाडू आणि प्रेक्षकही घाबरले होते. सापा कोर्टावर सरपटत होता, सुरक्षा रक्षकांनी सापाला रेक्यू केलं. यामध्ये जवळपास ४० मिनिट खेळ थांबवण्यात आला होता. चॅम्पियन थिएम म्हणाला की, मला प्राणी आवडतात पण हा विषारी साप होता त्यावेळी बॉल किड्स जवळपासच होते त्यामुळे ही धोकादायक स्थिती झाली होती. माझ्यासोबत असं कधीच झालं नाही आणि मी हे कधीच विसरू शकणार नाही.

दरम्यान, डोमिनिक थिएम याने 2-6, 7-6, 6-4 विजय मिळवला आहे. आता तो राफेस नदाल याच्याशी सामना असणार आहे. साप निघाल्याने या घटनेची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे. आता मागे बांगलादेशचा कॅप्टन शाकिब अल हसन याच्या पायाजवळ साप निघाल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.