लाईव्ह सामन्यात रेफरीला क्लबच्या मालकाचा बुक्का, फुटलबॉल लीग बंद, राष्ट्रध्यक्षांनी घेतली दखल, पाहा व्हिडीओ

| Updated on: Dec 12, 2023 | 7:33 PM

Turkish Football league : कोणत्याही स्पर्धेत वाद होणं काही नवीन नाही. कोणता खेळाडू कधी कोणाला भिडेल याचा काही नेम नाही. मात्र मैदानातील राडा कोर्टात गेलाय आणि लीगही बंद करण्यात आली आहे. नेमकं काय झालं ते जाणून घ्या.

लाईव्ह सामन्यात रेफरीला क्लबच्या मालकाचा बुक्का, फुटलबॉल लीग बंद, राष्ट्रध्यक्षांनी घेतली दखल, पाहा व्हिडीओ
Follow us on

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात राडे सुरू असताना आता फुटबॉल लीगमध्ये मोठ राडा झाल्याचं पाहायला मिळालं आहे. या राड्याची थेट देशाच्या पंतप्रधानांना दखल घ्यावी लागली आहे. फुटलबॉल क्लबच्या मालकाने रेफरीला मारल्याने इतका हे वाद जास्तच चिघळला. तुर्कस्थानमध्ये हा राडा झालेला हसून यामध्ये त्यांच्या देशाच्या पंतप्रधानांना हस्तक्षेप करावा लागला आहे. कारण हे प्रकरण पोलीस आणि आता कोर्टात पोहोचलं आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

तुर्कस्थानच्याी तुर्की फुटबॉल लीगमध्ये सोमवारी रात्री Ankaragucu आणि Rizespor यांच्यात झालेल्या सामन्यात राडा झाला. या सामन्यामध्ये 97 व्या मिनिटाला एका गोल झाल्यावर स्कोर 1-1 ने बराबरीत सुटला. काही कारणाने वातावरण तापू लागलं होतं त्यादरम्यान Ankaragucu संघाचे चाहते मैदानात घुसले. चाहते मैदानात आल्यानंतर वातावरण आणखीनत पेटत गेलं. Ankaragucu संघाचे अध्यक्ष फारूक कोका मैदानात आले आणि त्यांनी सामना रेफरी हलिल उमुत मेलर यांना जबरदस्त बुक्का मारला.

पाहा व्हिडीओ :-

 

रेफरींना तिथून सुरक्षित ठिकाणी ड्रेसिंग रूममध्ये नेण्यात आलं. हे प्रकरण न्यायालयात गेलं असून तुर्की फुटबॉल लीग अनिश्चित काळासाठी बंद केली गेली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी फारूका कोका यांना अटक करून दोन दिवसांची कोठडी सुनावण्यात आली आहे. या राड्यानंतर सर्व सामने थांबवण्यात आले असून न्यायालयाच्या आदेश येईपर्यंत पुढील कोणतेही सामने खेळवले जाणार नाहीत. ज्या रेफ्रीवर हल्ला झाले ते हलिल उमुत मेलर हे फिफा वरिष्ठ रेफरी असून त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये रेफ्री म्हणून काम केलं आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष एर्दोगन यांनी दखल घेतली. ट्विट करत हिंसाचाराची करण्याची गरज नाही. आरोपींवर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे असल्याचं म्हटलं आहे.