World Athletics Championships 2025 : Neeraj Chopra कडून निराशा, सचिन यादवने मनं जिंकली, मेडल मिळालं?

World Athletics Championships Javelin Throw Final 2025 Result : भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा या स्पर्धेत सुवर्ण पदक कायम राखण्यात अपयशी ठरला. नीरज या स्पर्धेत आठव्या स्थानी राहिला.

World Athletics Championships 2025 : Neeraj Chopra कडून निराशा, सचिन यादवने मनं जिंकली, मेडल मिळालं?
Neeraj Chopra Javelin Throw
Image Credit source: PTI
Updated on: Sep 18, 2025 | 6:48 PM

वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशीप 2025 स्पर्धेतील फायनलमध्ये भारताचा गोल्डन बॉय भालाफेकपटू नीरज चोप्रा याने निराशा केली आहे. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवून देणाऱ्या नीरज चोप्रा याच्याकडून या स्पर्धेतून भारताला गोल्डची आशा होती. मात्र नीरज भारतीयांच्या आशेवर खरा उतरू शकला नाही. नीरजला टॉप 6 मध्येही स्थान मिळवता आलं नाही. त्यामुळे नीरजचं आव्हान संपुष्टात आलं. तसेच पाकिस्तानचा भालाफेकपटू अर्शद नदीम यालाही काही खास करता आलं नाही. नीरजप्रमाणे अर्शदही टॉप 6 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरला.

नीरजला जपानमध्ये आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतील अंतिम फेरीत 84.03 मीटर लांब भाला फेकता आला. नीरजने पहिल्या प्रयत्नात 83.65 मीटर दूर भाला फेकला. मात्र त्यानंतर नीरजच्या कामगिरीत घसरण झाली. परिणामी नीरजचं पदक जिंकण्याचं स्वप्न भंगलं. तर अर्शद नदीम याला 82.73 मीटर दूर भाला फेकता आला. अर्शदची ही या अंतिम फेरीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली. ऑलिम्पिक स्पर्धेत आपली छाप सोडणारे हे 2 स्टार या स्पर्धेत आपली छाप सोडण्यात अपयशी ठरले.

नीरज चोप्राची कामगिरी

नीरज 5 पैकी 2 थ्रोमध्ये अपयशी ठरला. नीरजचे 2 थ्रो फाऊल ठरले. नीरजने पहिलाच थ्रोमध्ये 83.65 मीटर इतकं अंतर कापलं. नीरजने पहिल्या थ्रोच्या तुलनेत दुसरा थ्रो काही मीटरने लांब फेकला. नीरजने दुसऱ्या थ्रोमध्ये 84.03 मीटर इतका दूर भाला फेकला.

नीरज तिसऱ्या प्रयत्नात अपयशी ठरला. नीरजचा तिसरा थ्रो फाऊल ठरला. नीरजच्या चौथ्या थ्रोमध्ये घट झाली. नीरजने चौथ्या प्रयत्नात भाला 82.86 मीटर दूर फेकला. तर पाचव्या प्रयत्नात नीरज अपयशी ठरला.

सचिनचं पदक थोडक्यात हुकलं

नीरजने अपेक्षाभंग केला. मात्र सचिन यादव याने दम दाखवला. सचिनने अर्शद आणि नीरज या दोघांपेक्षा जास्त अंतर कापलं. सचिनने 86.27 मीटर लांब भाला फेकत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यामुळे सचिन भारताला मेडल मिळवून देईल, अशी आशा होती. मात्र सचिनचं मेडल अवघ्या एका स्थानाने हुकलं. सचिनला चौथ्या स्थानी समाधान मानावं लागलं. सचिनची ही त्याच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम कामगिरी ठरली.

गोल्ड मेडल कुणाला?

दरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगोचा भालाफेकपटू वेलकॉट नंबर 1 ठरला. वेलकॉट याने सुवर्ण पदक पटकावलं. वेलकॉटने 88.16 मीटर थ्रो करत गोल्ड मेडलवर आपली मोहर उमटवली. तर ग्रेनाडाचा भालाफेकपटू पीटर्स याने 87.38 मीटर दूर थ्रो करत रौप्य पदक पटकावलं. अमेरिकेचा कर्टिस थॉम्पसन् याने 86.67 मीटर लांब भालाफेकत कांस्य पदक मिळवलं.