IND vs Pak U 19 Asia Cup Final : धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपची पाकिस्तानी टीमने वाट लावली, असे नाचत होते की..एकदा हा VIDEO बघा

IND vs Pak U 19 Asia Cup Final : काल आशिया कप अंडर 19 च्या फायनलमध्ये पाकिस्तानने भारतावर विजय मिळवला. त्यानंतर पाकिस्तानी टीमने धुरंधर चित्रपटातील अक्षय खन्नाच्या गाण्यावर डान्सचा प्रयत्न केला. पण त्यांना तो जमला नाही. त्यांनी वाट लावून टाकली. एकदा हा VIDEO बघा.

IND vs Pak U 19 Asia Cup Final : धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेपची पाकिस्तानी टीमने वाट लावली, असे नाचत होते की..एकदा हा VIDEO बघा
Pak U 19 Cricket Team
Image Credit source: Screenshot/ACC
| Updated on: Dec 22, 2025 | 10:25 AM

सध्या भारतात रणवीर सिंह, अक्षय खन्ना यांच्या धुरंधर चित्रपटाची धूम आहे. रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चर्चेत आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट कमाईचे नवीन उच्चांक प्रस्थापित करत आहे. परदेशातही या चित्रपटाची चर्चा आहे. पण पाकिस्तानसह काही इस्लामिक देशांनी या चित्रपटावर बंदी घातली आहे. कारण या चित्रपटामुळे पाकिस्तानची प्रतिमा खराब होते, असं त्या देशांचं म्हणणं आहे. पाकिस्तानात सुद्धा या चित्रपटावर बंदी आहे. पण पाकिस्तानी मात्र या चित्रपटाच्या गाण्यांवर नाचत आहेत. अंडर 19 आशिया कपमध्ये हे पहायला मिळालं. फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला हरवून किताब जिंकला. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी धुरंधरमधील अक्षय खन्नाच्या गाण्यावर ठेका धरला.

रविवारी 21 डिसेंबरला दुबईमध्ये आयसीसी अकादमीमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये अंडर 19 आशिया कप 2025 ची फायनल झाली. या मॅचमध्ये पाकिस्तानी टीमने भारतावर एकतर्फी 191 धावांनी मोठा विजय मिळवला. पाकिस्तानचा अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये हा पहिला विजय आहे. त्यामुळे पाकिस्तानी खेळाडू आनंदी होणं स्वाभाविक आहे. पण या आनंदात ते बॉलिवूड ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’ चित्रपटाच्या गाण्यावर नाचत होते. महत्वाचं म्हणजे अक्षय खन्नाने आपल्या डान्सने सर्व प्रेक्षकांची मनं जिंकली. पण या पाकिस्तानी खेळाडूंनी नाचताना त्या गाण्याची वाट लावून टाकली.

 

विचित्र पद्धतीने डान्स

आशियाई क्रिकेट काऊन्सिलने पाकिस्तानच्या विजयानंतर एक व्हिडिओ पोस्ट केलाय. त्यात सर्व पाकिस्तानी खेळाडू डान्स करत होते. अक्षय खन्नाच्या एन्ट्रीच जे गाणं आहे, ‘फस्ला’ (FA9LA) त्यावर हे पाकिस्तानी खेळाडू नाचत होते. बहरीनचा रॅपर फ्लिपराचीने हे गाणं गायलं आहे. DJ आउटलॉने हे गाणं कंपोज केलय. हे गाणं आणि त्यावरील बलोच डान्स सगळीकडे हिट झालय. यावर अनेक व्हिडिओ/रिल्स बनवण्यात येत आहेत. पाकिस्तानी खेळाडू मात्र या गाण्यावर खूप विचित्र पद्धतीने डान्स करताना दिसले.

संपूर्ण टीम 156 रन्सवर ऑलआऊट

कालच्या फायनलमध्ये पाकिस्तानी टीमने पहिली बॅटिंग केली. ओपनर समीर मिन्हासच्या दमदार शतकाच्या बळावर पाकिस्तानने 347 धावांची विशाल धावसंख्या उभारली. मिन्हासने फक्त 119 चेंडूत 172 धावा फटकावल्या. या टुर्नामेंटमधील त्याचं हे दुसरं शतक होतं. या धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाज लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. संपूर्ण टीम 156 रन्सवर ऑलआऊट झाली. पाकिस्तानी टीमने 191 धावांसह मॅच आणि ट्रॉफी जिंकली.