IND vs PAK : पाकिस्तानच्या अली रजाने भारतीय कॅप्टनला ज्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं ती क्लासिक डिलिवरी चुकवू नका, एकदा पहाच VIDEO

IND vs PAK : भारत आणि पाकिस्तानचा क्रिकेट सामना कुठेही असो क्रिकेट चाहत्यांना नेहमीच सर्वोच्च दर्जाचं क्रिकेट पहायला मिळतं. आताही अंडर 19 आशिया कपमध्ये असाच सामना सुरु आहे.

IND vs PAK : पाकिस्तानच्या अली रजाने भारतीय कॅप्टनला ज्या चेंडूवर क्लीन बोल्ड केलं ती क्लासिक डिलिवरी चुकवू नका, एकदा पहाच VIDEO
IND vs PAK u19 asia cup
Image Credit source: Getty Images
| Updated on: Nov 08, 2026 | 1:27 PM

U19 Asia Cup 2026 : अंडर 19 एशिया कपमध्ये टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्ध खराब सुरुवात केली. भारताचा कॅप्टन लक्ष्य रायचंदानी दुसऱ्याच चेंडूवर आऊट झाला. ज्या गोलंदाजाने वैभव सूर्यवंशीला आऊट केलेलं, त्यानेच लक्ष्य रायचंदाची विकेट काढली. वैभव सूर्यवंशीला बाद केल्यानंतर त्याला हा गोलंदाज भिडला सुद्धा होता. अली रजा हा अंडर 19 लेवलवर पाकिस्तानचा अनुभवी गोलंदाज आहे. त्याने मॅचच्या दुसऱ्याच चेंडूवर कमाल केली. परफेक्ट टेक्निक असलेल्या लक्ष्य रायचंदानीला क्लीन बोल्ड केलं. अली रजाने हुशारीने बॉलिंग केली. त्याने आपल्या रणनितीने भारतीय कर्णधार लक्ष्य रायचंदानीला फसवलं.

आधी त्याने शॉर्ट ऑफ गुड लेंग्थ वर चेंडू टाकून बॉल बाहेर काढला. त्यानंतर पुढचा चेंडू त्याने त्याच टप्प्यावर टाकला. पण यावेळी चेंडूला बाहेर काढण्याऐवजी त्याने आत आणला. लक्ष्य रायचंदानीला वाटलं चेंडू बाहेर जाईल. म्हणून त्याने चेंडू सोडण्यासाठी वेल लेफ्टची Action केली. पण चेंडूने आता येऊन त्याच्या यष्टया वाकवल्या.

Loading...

टीम इंडियाने तो सामना गमावलेला

लक्ष्यचं बाद होण हे टीम इंडियासाठी एक मोठ्या झटक्यासारखं होतं. कारण लक्ष्य सध्या शानदार फॉर्ममध्ये आहे. मागच्याच सामन्यात त्याने शानदार अर्धशतक ठोकलं होतं. मागच्या अंडर 19 आशिया कपच्या फायनलमध्ये अली रजाने वैभव सूर्यवंशीला आऊट केलेलं. वैभव त्या सामन्यात खूप आक्रमक बॅटिंग करत होता. पण तो सुद्धा अली रजाच्या चेंडूवर फसला. वैभव 26 रन्सवर आऊट झाल्यानंतर टीम इंडियाने तो सामना गमावला. अली रजा आणि समीर मिन्हास यांनी पाकिस्तानला ती मॅच जिंकवून दिली होती.

आतापर्यंत त्याने काढलेत 34 विकेट

अली रजा तिसऱ्यांदा अंडर 19 आशिया कप खेळत आहे. पाकिस्तानचा हा गोलंदाज लहान वयापासून अंडर 19 लेवलवर खेळतोय. 140 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने तो गोलंदाजी करतो. PSL मध्ये अली रजा पेशावर जाल्मीकडून खेळतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये तो रावळपिंडीसाठी खेळतो. 8 फर्स्ट क्लास मॅचेसमध्ये आतापर्यंत त्याने 34 विकेट काढलेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us