Naseem Shah : नसीम शाहने ही मौल्यवान वस्तू दान केली, लोकांनी केलं ट्रोल

ज्या बॅटने नसीम खानने दोन षटकार मारले ती बॅट शाहिद आफ्रिदीच्या एका संस्थेला दान केली आहे.

Naseem Shah : नसीम शाहने ही मौल्यवान वस्तू दान केली, लोकांनी केलं ट्रोल
नसीम शाह
Image Credit source: tv9marathi
| Updated on: Sep 16, 2022 | 12:41 PM

आशिया चषकात (Asia Cup 2022) खराब कामगिरी केल्यामुळे अनेक खेळाडूंवरती टीका झाली. परंतु काही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्यामुळे ते पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. पाकिस्तानचा (Pakistan) खेळाडू नसीम शाह (Naseem Shah) सुद्धा सलग दोन षटकार खेचल्याने प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. त्याच्या दोन षटकारामुळे पाकिस्तान संघ अफगाणिस्तान विरुद्ध विजयी झाला.

नसीम खान हा पाकिस्तानचा गोलंदाज आहे. परंतु अंतिम षटकात पाकिस्तानला धावांची गरज होती. त्यावेळी त्याने सलग दोन षटकार खेचल्याने पाकिस्तान संघ विजयी झाला. तेव्हापासून त्याची सोशल मीडियावर अधिक चर्चा आहे. त्याचबरोबर त्याच्या चाहत्यांची संख्या देखील अधिक वाढली आहे.

ज्या बॅटने नसीम खानने दोन षटकार मारले ती बॅट शाहिद आफ्रिदीच्या एका संस्थेला दान केली आहे. त्यामुळे पुन्हा नसीम खानची चर्चा सुरु झाली आहे. काही चाहत्यांनी त्यांच्या नादाला न लागण्याचा सल्ला दिला आहे. तर काही चाहत्यांनी तुला बिघडवून ठेवेल असं म्हटलं आहे.

मागच्या काही दिवसांपासून पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे तिथली अनेक लोकं बेघर झाली आहेत. आफ्रिदीची संस्था त्या लोकांना मोठ्या प्रमाणात मदत करीत आहे.