बिच, स्पा अन् सकाळी 5 वाजता…पलाश-मेरी डिकॉस्टाच्या चॅटिंगमध्ये नेमकं काय काय?

पलाश मुच्छल स्मृती मानधनाला अंधारात ठेवून दुसऱ्या मुलीला बोलत होता, असा दावा केला जात आहे. तसे काही स्क्रीनशॉट शेअर केले जात आहेत. पलाश नेमकं काय बोलला हे आता विचारले जात आहे.

बिच, स्पा अन् सकाळी 5 वाजता...पलाश-मेरी डिकॉस्टाच्या चॅटिंगमध्ये नेमकं काय काय?
palash muchhal and smriti mandhana and mary dcosta
Image Credit source: instagram
| Updated on: Nov 25, 2025 | 6:37 PM

Palash Muchhal Cheating With Smriti Mandhana : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना हिचे लग्न संगीतकार पलाश मुच्छल याच्याशी होणार आहेत. 23 नोव्हेंबर 2025 रोजी होणाऱ्या या लग्नाची जय्यत तयारी झाली होती. परंतु लग्नाच्या काही तास अगोदर स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याने हे लग्न पुढे ढकलण्यात आले आहे. असे असतानाच आता मोठा आणि खळबळजनक दावा केला जातोय. पलाश मुच्छल एका मुलीशी चॅटिंगच्या माध्यमातून फ्लर्ट करत होता, तो स्मृती मानधनाचा विश्वासघात करत होता, असा दावा करणारे काही स्क्रीनशॉट शेअर केले जात आहे. असे असतानाच आता या पलाश आणि त्या त्रयस्त मुलीमध्ये नेमकी काय चर्चा चालू होती? चॅटिंगमध्ये नेमका काय संवाद झाला? हे समोर आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाला अवघे काही तास शिल्लक होते. त्याआधीच स्मृतीचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर श्रीनिवास मानधना यांना लगेच सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेनंतर स्मृतीचे लग्न काही काळासाठी पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली. स्मृतीचे लग्न पुढे ढकलल्यामुळे सर्वच पाहुण्यांना परत जाण्यास सांगण्यात आले होते. या सर्व घडामोडी घडत असतानाच आता पलाशचे एका मुलीसोबतचे कथित चॅटिंग समोर आले आहे. हे चॅटिंग नेमके कधीचे आहे, हे स्पष्ट झालेले नाही. सोबतच चॅटिंगच्या सत्यतेबाबतही स्पष्टता नाही. परंतु याच चॅटिंगचा आधार घेत पलाश मुच्छलने स्मृतीचा विश्वासघात केला, अशी भावना व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे या कथित चॅटिंगमध्ये माझे आणि स्मृतीचे नाते संपल्यातच जमा आहे, असे पलाशने कथितरीत्या म्हटल्याचे दिसत आहे.

पलाश नेमका कोणाशी चॅटिंग करायचा? नेमकं काय बोलणं झालं?

स्मृती-पलाश यांचे लग्न पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता सोशल मीडियावर काही स्क्रीनशॉट शेअर केले जात आहेत. या स्क्रीनशॉटप्रमाणे पलाश कथितपणे मेरी डिकॉस्टा नावाच्या तरुणीसोबत चॅटिंग करत होता. मेरी डिकॉस्टा ही एक कोरिओग्राफर असल्याचा दावा केला जातोय. सोबतच ती स्मृती आणि पलाश यांच्यासाठी कोरिओग्राफीही करणार होती, असे म्हटले जात आहे. पलाश या कथित चॅटिंगमध्ये मेरीला भेटण्याची विनंती करत असल्याचे दिसत आहे. सोबतच तो माझे तिच्यासोबतचे नाते संपल्यातच जमा आहे, आम्ही लाँग डिस्टन्समध्ये आहोत, असेही पलाश कथितपणे म्हणताना दिसतोय. या चॅटिंगमध्ये पलाश कथितरित्या मेरीला सकाळी पाच वाजता वर्सोवा बिचवर सकाळी पाच वाजता भेटायलाही बोलवत असल्याचा दावा या चॅटिंगमधून केला जातोय. सोबतच या चॅटिंगमध्ये स्पा, स्विमिंग यांचाही उल्लेख आहे. दरम्यान, ही चॅटिंग सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही चॅटिंग खरी असल्याचा कोणताही पुरावा अद्याप समोर आलेला नाही. तसेच पलाश किंवा स्मृतीनेही यावर अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.