IND vs WI : प्रसिद्ध कृष्णा दुखापतीमुळे OUT, विंडिज विरुद्ध तिसऱ्या वनडेसाठी त्याच्याजागी या गोलंदाजाची टीममध्ये एन्ट्री
IND vs WI : टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार विजय मिळवला. 400 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. पण आता तिसऱ्या वनडे आधी टीम इंडियात बदल होणार आहे.

टीम इंडियाने वेस्ट इंडिज विरुद्ध दुसऱ्या वनडे सामन्यात दमदार विजय मिळवला. 400 पेक्षा जास्त धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केला. पण आता तिसऱ्या वनडे आधी टीम इंडियात बदल होणार आहे. वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला दुसऱ्या वनडे मध्ये दुखापत झाली. तो तिसऱ्या वनडेत खेळू शकणार नाहीय. त्याच्याजागी युवा वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजचा टीममध्ये समावेश करण्यात आला आहे. गुवहाटीमध्ये दुसऱ्या वनडे सामन्यात प्रसिद्ध कृष्णाच्या डाव्या पायाला दुखापत झाली. फक्त पाच ओव्हर गोलंदाजी करुन तो मैदानाबाहेर गेला. आता पुढे रिहॅबिलिटेशनसाठी त्याला बंगळुरुच्या BCCI सेंटर ऑफ एक्सीलेंस मध्ये पाठवलं जाणार आहे.
प्रसिद्धच्या जागी अंशुल कंबोजचा तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये टीममध्ये समावेश केला जाणार आहे. चंदीगड येथे तो टीममध्ये सहभागी होईल. तिसरा वनडे सामना 1 ऑक्टोंबरला न्यू चंदीगडच्या नव्या PCA स्टेडिअम येथे होणार आहे. वेस्ट इंडिज विरूद्धच्या आगामी T20I सीरीजसाठी टीम इंडियात बदल झाला आहे. सीनियर सिलेक्शन कमिटीने टीम मॅनेजमेंटच्या सल्ल्यावरुन वॉशिंग्टन सुंदरला T20I स्क्वॉड मधून हटवण्याचा निर्णय घेतला आहे.
स्कॉडमध्ये बदल करावा लागलाय
न्यूझीलंड विरुद्ध आगामी टेस्ट सीरीज लक्षात घेऊन हा निर्णय घेतलाय. 11 ऑक्टोंबरपासून रणजी ट्रॉफीचा सीजन सुरु होतोय. वॉशिंग्टन सुंदर राज्याच्या टीमकडून रणजी खेळून टेस्ट सीरीजची तयारी करणार आहे. सुंदरच्या जागी T20 स्कॉडमध्ये नमन धीरचा समावेश केला आहे. वेस्ट इंडिज विरुद्ध सीरीजच्या पार्श्वभूमीवर भारताला आपल्या वनडे आणि टी20 स्कॉडमध्ये बदल करावा लागलाय.
वेस्टइंडीज सीरीज अपडेटेड टीम : भारतीय वनडे टीम : शुबमन गिल (कॅप्टन), रोहित शर्मा, विराट कोहली, ऋतुराज गायकवाड़, केएल राहुल (उपकर्णधार), ध्रुव जुरेल, नीतीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, अंशुल कंबोज, गुरनूर बरार, मोहम्मद सिराज, आकिब नबी, यशस्वी जायसवाल, नमन धीर.
वेस्टइंडीज सीरीजसाठी भारताची अपडेटेड टी20 टीम : श्रेयस अय्यर (कॅप्टन), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, ईशान किशन (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), तिलक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, कुलदीप यादव, अक्षर पटेल, नमन धीर, रवि बिश्नोई, नीतीश कुमार रेड्डी, अर्शदीप सिंह, प्रिंस यादव, मयंक यादव