Nagpur : भारत-ऑस्ट्रेलियाचा सामन्यावर पावसाच सावट ? जाणून घ्या हवामानाची स्थिती

टीम इंडियाने पहिली मॅच हारली आहे. आजची मॅच टीम इंडियाला जिंकावी लागेल.

Nagpur : भारत-ऑस्ट्रेलियाचा सामन्यावर पावसाच सावट ? जाणून घ्या हवामानाची स्थिती
nagpur stadium
Image Credit source: twitter
| Updated on: Sep 23, 2022 | 3:24 PM

आज भारत (India) आणि ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सामन्यावर पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मागच्या काही दिवसांपासून नागपूरात (Nagpur) पावसाचं वातावरण आहे. तसेच काल नागपूरात मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. त्यामुळे मैदाच्याबाहेर चिखल झाल्याची स्थिती आहे. आजच्या सामन्यात पाऊस आल्यास काय होणार अशी चिंता क्रिकेट शौकीनांना पडली आहे.

टीम इंडियाने पहिली मॅच हारली आहे. आजची मॅच टीम इंडियाला जिंकावी लागेल. आज सायंकाळी सात वाजता भारतीय वेळेनुसार मॅच सुरु होईल.

नागपूरात आज दिवसभर ढगाळ वातावरण आहे. तसेच हवामान खात्याने 80 टक्के पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे मॅच होण्याची शक्यता कमी आहे.

टीम इंडिया

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव.

टीम ऑस्ट्रेलिया

अॅरॉन फिंच, शॉन अॅबॉट, अॅश्टन अगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवेल , केन रिचर्डसन, डॅनियल सॅम्स, स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू वेड, अॅडम झाम्पा.