Rohit Sharma: तू असशील मुंबईचा राजा, मी पण…रोहित शर्माला राखी सावंतने दिली थेट धमकी, Video Viral

Rakhi Sawant Video: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात तिने रोहित शर्मावर गंभीर आरोप केले आहेत.

Rohit Sharma: तू असशील मुंबईचा राजा, मी पण...रोहित शर्माला राखी सावंतने दिली थेट धमकी, Video Viral
| Updated on: Sep 20, 2026 | 8:08 AM

Rakhi Sawant On Rohit Sharma: बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंत ही नेहमीच चर्चेत असते. आता पुन्हा एकदा राखी एका नव्या वादामुळे सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.  यावेळी तिने मुंबईचा राजा रोहित शर्माला टारगेट केले आहे.  रोहित शर्माची तक्रार करत भररस्त्यावर तिने हंगामा केला. रोहित शर्मावर तिने अनेक आरोप केले. ज्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

नेहमीप्रमाणे पॅपराजींशी बोलताना राखी सावंत बोलत असताना ती आक्रमक अंदाजात दिसली. तिच्या हातात एक चपाती सारखं काय तरी होतं. ही चपाती काही खरी नव्हती कपड्याची होती. ती चपाती दाखवत राखी म्हणाली, “रोहित शर्मा, तू हे अजिबात चांगले केलेले नाही. तू माझ्या पोटावर अशी लाथ मारू शकत नाहीस. मला माझ्या घरात खायला चपाती हवी आहे. तू माझ्या रोजीरोटी इतकी जोरात लाथ मारलीस की माझं पोटच आता आत गेलंय.” राखीचा हा कॅमेडी अंदाज नेहमीच पाहायला मिळतो. तिचा हा अंदाज पाहून तिथे उपस्थित असलेले सगळ्यांनाच हसू अनावर झाले.

रोहित शर्माला थेट प्रश्न विचारत राखी पुढे म्हणाली, “रोहित शर्मा, तू कुठे जाणार माझ्या पोटावर लाथ मारून? तुला मुंबईत राहायचे आहे की नाही?” रोहितने त्याच्या शोमधील तिचे सीन्स एडिट करून काढून टाकल्याचा दावा तिने केला आहे. “मला तुझ्या रिअॅलिटी शोमध्ये यायचे आहे, यायचे आहे आणि यायचे आहे. तू असा माझा रोल कट करू शकत नाहीस,” असेही तिने बजावून सांगितले.

पॅपराजींशी बोलताना राखीने रोहित शर्माला थेट ठणकावले. ती नेहमीप्रमाणे अत्यंत फिल्मी स्टाईलमध्ये म्हणाली, “रोहित, तू स्वतःला खूप मोठा समजतोस का? तू असशील मुंबईचा राजा पण, तर लक्षात ठेव मी सुद्धा आहे मुंबईची राणी. तू माझा असा रोल कट करू शकत नाहीस.” जर रोहित शर्मा या इंडस्ट्रीमध्ये स्वतःला राजा समजत असेल, तर तीही रिअॅलिटी शोची ‘क्वीन’ आहे, त्यामुळे तिला हलक्यात घेण्याचे काम नाही, असा दम तिने दिला आहे.

जेव्हा पत्रकारांनी तिला या शोमधील तिच्या भूमिकेबद्दल विचारले असता, राखीने स्वतःची तुलना एका ब्रँडशी केली. ती म्हणाली, “मी स्वतः एक ब्रँड आहे समजलं ना? भारतातला पहिला बिग बॉस मीच गाजवला आहे. मी देशातील प्रत्येक रिअॅलिटी शोची आई आहे त्यामुळे माझ्यासोबत पंगा घेणे आता रोहितला महागात पडेल.”

हा वाद काही गंभीर नाही,  राखी सावंत नेहमीच प्रसिद्धीसाठी काही ना काही स्टंट करत असते, सध्या रोहित शर्माच्या  ‘फॅमिली फुल हाऊस विथ रोहित शर्मा’ या नवीन टीव्ही रिअॅलिटी शो सुरु आहे. शोच्या प्रमोशनसाठी राखीने तिच्या खास ड्रामा स्टाईलचा वापर केल्याचे म्हटले जात आहे, तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. अजून तरी रोहित शर्माने यावर आपली काही प्रतिक्रिया दिलेली नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us